इतर काही ठिकाणांच्या अगदी उलट मुलांसोबत मलेशियामध्ये सुट्टीचा आनंद घेणे सोपे आहे. येथे सर्व वयोगटांना अनुभवण्यासारखे इतके काही आहे की पालकांना आपल्या लहानग्यांना व्यस्त ठेवण्याकडे फारसे काही लक्ष द्यावे लागतच नाही. या देशामध्ये सर्वकाही आहे जसे की नैसर्गिक अभयारण्ये, थीम पार्क, समुद्रकिनारे, डोंगर, संग्रहालय आणि पर्यटकांसाठी विविध आकर्षणे. एका अविस्मरणीय आणि तणावमुक्त सहलीसाठी मलेशियामधील या मुलांच्या आवडत्या रिसॉर्ट्समध्ये वास्तव्य करण्याचा विचार अवश्य करा.
पार्करॉयल सर्व्हिस्ड सूट्स शहरातील सर्वात प्रसिद्ध लँडमार्क दी पेट्रोनास टॉवर्सपासून थोड्याच अंतरावर असून अत्यंत आरामदायक निवास सुविधा सादर करीत आहे. सुमारे 287 प्रशस्त स्टुडिओज आणि दिवाणखान्यासहित एक आणि दोन बेडरुम सूट्स उपलब्ध आहेत ज्यापैकी काहींमध्ये तर स्वयंपाकघराचीही व्यवस्था आहे व मोफत वाय-फाय आणि फ्लॅट स्क्रीन टीव्ही यासारख्या सुविधाही आहेत. एका रूफटॉप पूलासह दोन स्विमिंग पूल, एक फिटनेस सेंटर आणि एक इन-हाउस लायब्ररी आहे. मुलांसाठी पार्करॉयल सर्व्हिस्ड सूट्समध्ये मुलांचे स्विमिंग पूल, फक्त मुलांसाठीचा प्ले एरिआ आणि निवडक उपक्रमांची रेलचेल आहे.
किंमत: रु. 8,000 प्रति रात्रपासून सुरुवात
ठिकाण: नं. ऑफ, 1, जालान नागासारी, बुकिट बिंटांग, 50200 क्वालालंपुर
Book Your Stay at PARKROYAL Serviced SuitesBook Your Stay at PARKROYAL Serviced Suites
बेरजाया टाईम्स स्क्वेअर हे एक ट्वीन टॉवर कॉम्प्लेक्स आहे ज्यामध्ये एक हॉटेल, कोंडोमिनिअम, इनडोअर अॅम्युजमेंट पार्क आणि शॉपिंग सेंटर आहे. बेरजाया हॉटेल आपल्या खोल्या आणि सूट्समध्ये अत्यंत आरामदायक निवास व्यवस्था सादर करीत आहे, ज्यापैकी काहींमध्ये कुटुंबांसाठी विविध खोल्या व बैठकीच्या खोल्यांचा समावेश आहे. हॉटेलमध्ये मनोरंजनासाठी बऱ्याच सुविधा आहेत जसे रूफटॉप स्विमिंग पूल, स्पा, स्कॉश कोर्ट आणि मुलांसाठी प्ले एरिआ. प्रत्येकास हमखास मौज-मस्तीची खात्री देणारे अॅम्युजमेंट पार्क अगदी जवळ असल्याने बेरजाया हॉटेलची तुलना इतर कोणत्याही हॉटेलशी होऊ शकत नाही!
किंमत: रु. 6,700 प्रति रात्रपासून सुरुवात
ठिकाण: 1, जालान इम्बी, इम्बी, 55100 क्वालालंपुर
Book Your Stay at Berjaya HotelBook Your Stay at Berjaya Hotel
मोफत वाय-फाय आणि फ्लॅट स्क्रीन टीव्ही यासारख्या काही सुविधा सनवे पुत्रा हॉटेलच्या प्रशस्त खोल्या आणि सूट्समध्ये आढळतात. शहराच्या व्यावसायिक केंद्राच्या अगदी मध्यभागी हे पंचतारांकित हॉटेल मोक्याच्या जागी स्थित आहे आणि सिनेमागृह असलेल्या सनवे पुत्रा मॉलच्या अगदी समोर आहे. सनवे पुत्रा हॉटेलच्या सुविधांमध्ये एक 25-मीटर लांब स्विमिंग पूल व मुलांसाठीही एक पूल यांचा समावेश आहे.
किंमत: रु. 4,500 प्रति रात्रपासून सुरुवात
ठिकाण: 100, जालान पुत्रा, चौ किट, 50350 क्वालालंपुर
Book Your Stay at Sunway Putra HotelBook Your Stay at Sunway Putra Hotel
हॉटेल इस्ताना क्वालालंपुर सिटी सेंटरमध्ये राजेशाही वास्तव्यासाठी 515 खोल्या आणि सूट्स उपलब्ध आहेत ज्यातील सुविधांमुळे संपूर्ण कुटुंबास आरामदायक वास्तव्याची खात्री दिली जाते. क्लासिक आणि आधुनिक वैशिष्ट्यांसह हॉटेलमध्ये आउटडोअर स्विमिंग पूल, फिटनेस सेंटर, टेनिस कोर्ट आणि सुसज्ज स्पा आहे. हॉटेल इस्ताना क्वालालंपुर सिटी सेंटर बेबीसिटिंग सेवा प्रदान करते जेणेकरून पालक कुठल्याही काळजीशिवाय शहरामध्ये नाइट आउटचाही आनंद घेऊ शकतात.
किंमत: रु. 6,500 प्रति रात्रपासून सुरुवात
ठिकाण: 73, जालान राजा चुलान, बुकिट बिंटांग, 50200 क्वालालंपुर
Book Your Stay at Hotel Istana Kuala Lumpur City CentreBook Your Stay at Hotel Istana Kuala Lumpur City Centre
पॅव्हेलिअन क्वालालंपुर शॉपिंग मॉलपासून थोड्याच अंतरावर असलेले ग्रँड मिलेनिअम क्वालालंपुर हे एक लक्झरी हॉटेल आहे ज्यामध्ये शहराचे नयनरम्य दृश्य बघण्याकरीता जमिनीपासून तर छतापर्यंत खिडक्या असलेल्या 468 खोल्या आणि सूट्स आहेत. मोफत वाय-फाय आणि फ्लॅट-स्क्रीन टीव्ही सारख्या सुविधांचा समावेश आहे. हॉटेलमध्ये भोजनासाठी चार रेस्टॉरंट आहेत ज्यामुळे मुलांकरीता अनुकूल असे मेनू आहे ग्रँड मिलेनिअम क्वालालंपुरच्या मनोरंजनात्मक सुविधांमध्ये एक आउटडोअर स्विमिंग पूल, फिटनेस सेंटर आणि स्पा यांचा समावेश आहे. हॉटेलमध्ये बेबीसिटिंग आणि चाइल्ड केअर सेवाही उपलब्ध आहेत.
किंमत: रु. 8,000 प्रति रात्रपासून सुरुवात
ठिकाण: 60, जालान बुकिट बिंटांग, बुकिट बिंटांग, 55100 क्वालालंपुर
Book Your Stay at Grand Millenium Kuala LumpurBook Your Stay at Grand Millenium Kuala Lumpur
अत्याधुनिक मेरिटस पेलांगी बीच रिसॉर्ट अँड स्पाचा स्वत:चा समुद्रकिनारा आहे आणि त्याची निर्मिती मानवनिर्मित तलाव आणि लगून शैलीच्या स्विमिंग पूलच्या सभोवताल करण्यात आली आहे. रिसॉर्ट मोफत वाय-फाय आणि इतर निवडक सुविधांसह 355 प्रशस्त खोल्या आणि सूट्स प्रस्तुत करीत आहे. मुले चिल्ड्रन्स क्लबमधील धम्माल उपक्रम आणि मनोरंजनामध्ये व्यस्त राहतात आणि प्रौढ स्पा आणि स्विम-अप आइसलँड बारमध्ये आराम आणि विश्रांती घेऊन ताजेतवाने होतात!
किंमत: रु. 12,811 प्रति रात्रपासून सुरुवात
ठिकाण: पेंटाई सेनांग, 07000 लांगकावी
Book Your Stay at Meritus Pelangi Beach Resort & Spa
बाटू फिरिंघी बीचवर स्थित पार्करॉयल पेनांग रिसॉर्ट हे कुटुंबांसाठी लक्झरी ट्रॉपिकल रिसॉर्ट आहे. रिसॉर्टमध्ये वाय-फाय, एलसीडी टीव्ही आणि डीव्हीडी प्लेअरसारख्या सुविधांसह कौटुंबिक श्रेणीच्या प्रशस्त खोल्या आहे. मुलांसाठी कोको-नट किड्स क्लब हे असे ठिकाण आहे जेथे लहानगे चित्रकारी, पान रंगवणे आणि चित्रपटांसारख्या उपक्रमांनी धम्माल मजा करू शकतात. पार्करॉयल पेनांग रिसॉर्टमध्ये एक आउटडोअर संरक्षित प्ले एरिआ, बेबी वेडिंग पूलसहित स्वच्छंदपणे पोहण्यासाठी एक फ्री फॉर्म स्विमिंग पूल आणि दोन वॉटर स्लाईडही आहेत.
किंमत: रु. 4,463 प्रति रात्रपासून सुरुवात
ठिकाण: जालान बाटू फिरिंघी, 11100 बाटू फिरिंघी, पेनांग
Book Your Stay at PARKROYAL Penang ResortBook Your Stay at PARKROYAL Penang Resort
हार्ड रॉक हॉटेल पेनांग हे एक रॉक एन रोल थीमचे लक्झरी हॉटेल आहे जे संपूर्ण कुटुंबासाठी मस्तीने भरलेले वास्तव्य सादर करते. येथे मागणीनुसार मोफत चित्रपट, मोफत वाय-फाय आणि बोस साउंड सिस्टीम सारख्या सुविधांनी सज्ज असलेल्या 250 खोल्या आणि सूट्स प्रस्तुत आहे. हॉटेलमध्ये मुलांसाठी चिक्कार वैशिष्ट्यपूर्ण सुविधा आहेत जसे रचनात्मक उपक्रमांचा समावेश असलेले रॉक्झिटी किड्स क्लब, खेळ आणि खेळणी आणि मोठ्या मुलांसाठी टाबू टीन्स क्लबमध्ये रोमांचक व्हिडिओ गेम्ससह विशेष जागा आणि खासगी मूव्ही रुम उपलब्ध आहेत. हार्ड रॉक हॉटेल पेनांगमधील इतर सुविधा आहेत वॉटर स्लाईडसह स्विमिंग पूल आणि हॉटेलच्या भोजनकक्षामध्ये मुलांसाठी अनुकूल असे रेस्टॉरंट.
किंमत: रु. 6,589 प्रति रात्रपासून सुरुवात
ठिकाण: 11100 बाटू फिरिंघी, पेनांग
Book Your Stay at Hard Rock Hotel Penang
10 Things that Make Malaysia the Best Holiday Destination for Indians
Arushi Chaudhary | Feb 6, 2023
A Comprehensive Guide to the Kuala Lumpur Airport
Meena Nair | Feb 6, 2023
Take a Trip to Malaysia in Under Rs. 25,000—Flights Included!
Ritika Jain | Feb 6, 2023
Top 5 Hotels for Christmas in Kuala Lumpur without Breaking the Bank
Shruti Vakhariya | Apr 3, 2017
Kid-friendly Hotels in Malaysia
Devika Khosla | Oct 3, 2019
Malaysia: A Quick and Handy Travel Guide
Devika Khosla | May 31, 2019
The Holiday of a Lifetime in Mind-blowing Malaysia
Devika Khosla | Apr 3, 2017
Malaysia is Like Bollywood. It Has Something for Everyone
Saanya Malhotra | Sep 24, 2019
Encounter MP’s Wildlife Wonders at These Wow Jungle Resorts!
Surangama Banerjee | Mar 3, 2020
Experience Seekers Alert! These 7 Dreamy CGH Earth Resorts Are for You
Surangama Banerjee | Dec 26, 2019
Luxury Hotels in New South Wales that Offer the Best Window Views
Namrata Dhingra | Oct 17, 2019
Your Guide to Enjoying the Best Daycation in Delhi NCR!
Devika Khosla | Mar 17, 2020
Live the Luxe Life with an Experiential Stay at the Postcard Hotels!
Tabassum Varma | Aug 9, 2019
Pick These Unconventional Properties, to Holiday in Goa the Postcard Way!
Sunny Mishra | Aug 21, 2019
Whispering Palms Beach Resort Goa: A Dreamy Beachfront Stay
Surangama Banerjee | May 6, 2019
Top Hotels in Navi Mumbai for a Splendid Stay
Tabassum Varma | Apr 30, 2019