मुंबईजवळ आवर्जून भेट देण्याजोगी 10 सहलीची ठिकाणे

Chandana Banerjee

Last updated: Sep 24, 2019

Want To Go ? 
   

मुंबईतील रेटारेटी आणि धावपळीमुळे आपल्याला नेहमीच शहरात विकेंड साजरा करण्याच्या अनुभवापासून दूर कुठेतरी निवांत जागी विकेंड साजरा करण्याची इच्छा होत असते. त्यामुळे, आपल्याला शहराच्या बाहेर एखाद्या साहसी ट्रेकवर जायचे असेल किंवा निर्सगाच्या सहवासात काही काळ शांतपणे घालवायचा असेल तर मुंबईजवळील सहलीच्या 10 आवडत्या ठिकाणांची आमची यादी आपला निश्चितच अपेक्षाभंग करणार नाही.

1. सुला वाईनयार्ड्स: एक दिवस वाईन व सूर्यप्रकाशाच्या सहवासात

Sula-vineyard-nasik

मुंबईपासून सुमारे 230 किमी अंतरावरच्या या द्राक्षांच्या मळ्यांमध्ये आपण झोकात निवांत होऊन टवटवीत होऊ शकता. मग आपल्याला संपूर्ण वाईनयार्ड व वायनरीच्या सहलीसोबत ग्रेप-टू-ग्लासचा अनुभव घ्यायचा असेल किंवा सुला बियाँड या विलक्षण इन-हाउस व्हिलामध्ये निवास करायचा असेल तर सुला वाईनयार्ड एक दिवसाच्या सहलीसाठी किंवा तेथे थांबून विकेंड साजरा करण्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे. इथल्या सर्ववेळ सुरू असणाऱ्या कॅफे रोज या रेस्टॉरंटमध्ये जेवण करा, स्विमिंग पूलमध्ये मनसोक्त विहार करा किंवा गावातल्या रस्त्यांवर सायकलने फेरफटका मारा.

सुला वाईनयार्डकडे जात असताना वळसा घेऊन आपण वैतरणा धरणालाही जाऊ शकता ज्याला मोडक सागर धरण असेही म्हटले जाते जे वैतरणा नदीवर बांधलेले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे हे धरण नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे स्थित आहे व आपल्या सुंदर सरोवर आणि नयनरम्य परिसरासाठी प्रसिद्ध आहे.

2. कोलाड: जलक्रीडा अनुभवण्यासाठी

kolad-mumbai

महाराष्ट्रातील साहसी क्रीडाप्रकारांचे केंद्रस्थान असलेले रायगड जिल्ह्यातील कोलाड हे ठिकाण त्याच्या कुंडलिका नदीमधील व्हाईट वॉटर राफ्टिंग आणि ट्रेकिंगच्या पायवाटांसाठीही प्रसिद्ध आहे. सह्याद्री पर्वतरांगांच्या पुढ्यात वसलेले व मुंबईपासून 121 किमी अंतरावरील कोलाड हे नेहमीच साहसी क्रीडाप्रकारांनी गजबजलेले असते. राफ्टिंगशिवाय येथे निवड करण्यासाठी कॅनोइंग, कायाकिंग, पॅराग्लायडिंग, रॅपलिंग, रॉक क्लायम्बिंग आणि रिव्हर झिप लाईन क्रॉसिंगचे पर्यायही उपलब्ध आहेत. परागकणांवर जशा मधमाशा आकर्षित होतात त्याचप्रकारे वॉटरफॉल रॅपलिंग आणि माउंटन बायकिंग यासारख्या क्रीडाप्रकारांकडे साहसी क्रीडाप्रकारांचे चाहते आकर्षित होऊन कोलाडला येत असतात.

3. माथेरान: परंपरागत पद्धतीच्या डोंगराळ निरवतेचा आस्वाद घेण्यासाठी

matheran-mumbai

मुंबईपासून फक्त 90 किमी अंतरावर असलेले हे शांतताप्रिय हिल स्टेशन पश्चिम घाटांमध्ये समुद्रसपाटीपासून 800 मीटर उंचीवर वसलेले आहे. हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र जगातील काही मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे जेथे वाहनांना परवानगी नाही, ज्यामुळे त्याची निरवतेची पातळी उंचावण्यास मदत मिळाली आहे. येथे असताना आपण वृक्षाच्छादित भागांमधून पायीच लांब फेरफटका मारू शकता, घोडेस्वारीने संपूर्ण नगरभ्रमण करू शकता, लुईसा व हनीमून पॉईंटदरम्यान झीप-लायनिंगचा प्रयत्न करू शकता, संपूर्ण हिल स्टेशनवर पसरलेल्या विविध पॉईंटवरील नयनरम्य निसर्गसौंदर्याचा आनंद घेऊ शकता व शेरर्लोट लेकसमोर पिकनिकच्या तयारीला लागू शकता.

4. कर्नाळा: निसर्गाचा आस्वाद व इतिहासाच्या चाहुलीसाठी

karnala

पिकनिकसाठी आलेल्यांना पक्षी निरीक्षण, नैसर्गिक पाऊलवाटांवरून ट्रेकिंग करणे आणि कर्नाळा किल्ल्याला भेट देण्याची संधी कर्नाळा प्रदान करतो. पनवेलपासून 12 किमी अंतरावर असलेले कर्नाळा पक्षी अभयारण्य 12.11 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. हे एक विलक्षण दुर्मिळ ठिकाण आहे जेथे निवासी पक्ष्यांच्या 150 प्रजातींचे व स्थलांतरित पक्ष्यांच्या 37 प्रजातींचे निवासस्थान आहे. कर्नाळा किल्ल्याची निर्मिती देवगिरीच्या यादवांनी केली होती व नंतर त्याला तुघलकाने काबीज केले होते. आपण अवश्य भेट द्यावी अशा काही ठिकाणांपैकी हे एक आहे. यावर चढण्यासाठी आपल्याला जरी एक तास पाहिजे असला मात्र एकवेळा येथे पोहोचल्यानंतर येथून मुंबई बंदराचे विहंगम दृश्य आपल्या नजरेस येते.

5. लोणावळा: एका निसर्गरम्य सुट्टीसाठी

lonavala

मुंबईपासून फक्त 96 किमी अंतरावर असलेले हे हिल स्टेशन जितके आपल्या चिक्कीसाठी प्रसिद्ध आहे तितकेच निसर्गरम्य दृश्यांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. लोणावळा हे मुंबईकरांसाठी अतिशय सुलभ असे सहलीचे ठिकाण आहे जेथे पिकनिकसाठी आलेल्यांना आसपासच्या डोंगर व दऱ्यांमध्ये चिक्कार पॉईंट्स आढळतात जेथे निसर्गसौंदर्याचा खजिना लुटू शकतात. बऱ्याच लोकांचा राजमाची हा आवडता पॉईंट आहे जेथून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमाची या प्रसिद्ध किल्ल्याचे मनसोक्त निरीक्षण करू शकतात. टायगर पॉईंट ज्याला टायगर्स लीप (वाघाची झेप) सुद्धा म्हटले जाते, हे आणखी एक स्थळ आहे जेथे प्रवासी वारंवार भेट देत असतात. येथे 650 मीटरची सरळ दरी आहे आणि फक्त पावसाळ्यात सक्रिय होणारा एक लहानसा धबधबासुद्धा आहे, ज्यामुळे पर्यावरण प्रेमींसाठी येथे भेट देणे क्रमप्राप्तच ठरते.

6. मांडवा: समुद्रकिनाऱ्यावर एक दिवस, उत्तम मेजवानी व साहसी जलक्रीडा

madwa

गेटवे ऑफ इंडियापासून फेरीद्वारे मुंबईपासून 102 किमी अंतरावर असलेले समुद्रकिनाऱ्यावरील हे उबदार गाव मांडवा आपल्या चमकदार समुद्रतटांसाठी, स्वादिष्ट मेजवानीसाठी व जलक्रीडांसाठीही प्रसिद्ध आहे. जरी आपण येथे एक दिवसाच्या सहलीसाठी आला असलात किंवा संपूर्ण विकेंड साजरा करण्यासाठी आला असलात तरी हे निवांत गाव बघत, जुन्या आरसीएफ जेट्टीच्या आसपासच्या परिसरात चिंब भिजून घेत, मांडवाच्या किनाऱ्यावर पायी चालत व स्थानिक कोळी लोकांसोबत संवाद साधत आपण आपला दिवस मनमुरादपणे जगू शकता.

7. एलिफंटा बेट: मनसोक्त पायपीट आणि इतिसाला साद घालणारा दिवस

elephanta island

फेरीद्वारे एक तास (गेटवे ऑफ इंडियापासून) अंतरावर असलेले एलिफंटा बेट हे मुंबईपासून 10 किमी पूर्वेस आहे. येथे हाताने कोरलेल्या भिंतीवरील चित्रांच्या सात प्राचीन लेण्या आहेत ज्यांचे अजिंठा व वेरुळच्या लेण्यांशी बरेच साधर्म्य आहे. या लेण्या बघितल्यानंतर आपण कॅनॉन हिलवर चढू शकता जेथे शिखरावर एक जुनी तोफ ठेवलेली आहे. हे सर्व बघितल्यानंतर आपल्याला भुक लागणे साहजिकच आहे व आपण आपल्या पिकनिक बास्केटमधल्या उपहारांचा फडशा पाडण्यास आतुर झालेले असाल. मात्र त्यापूर्वी अशी जागा निवडण्यास विसरू नका जेथे तेथे राहणाऱ्या बंदरांचा फारसा वावर नसेल.

8. येऊरचे डोंगर: एक दिवस धबधब्याखाली चिंब भिजण्यासाठी

yeoor hills

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पूर्वेकडील भागात असलेले येऊरचे डोंगर हे सहा लहान वस्त्या व तेथील रहिवाशी असलेल्या आदिवासींचे घर आहे. धबधबे आणि एक गडद वृक्षाच्छादित आवरण असलेला हा नयनरम्य भाग म्हणजे जंगलातील पायवाटांवर संपूर्ण दिवसभर भटकंती करणे आवडणाऱ्या निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग आहे. हौशी पक्षी निरीक्षक व शाळेची मुले येथे नेहमी भेट देत असतात. येऊरच्या डोंगरावर काही रिसॉर्टही आहेत जेथे आपण आरामात आपला दिवस घालवू शकता व स्वादिष्ट मेजवानीचा आस्वादही घेऊ शकता. मुंबईपासून फक्त 25 किमी अंतरावर आहे आणि मुंबईकरांसाठी सहज पोहोचता येणारे असे हे सहलीचे ठिकाण आहे.

9. अॅम्बी व्हॅली: मित्रांच्या ग्रुपसह एका आरामदायक व अविस्मरणीय सहल

aamby-valley

संपूर्ण दिवस भरगच्च कार्यक्रम आणि रोमांचक घडामोडींनी घालवण्याची आवड असणाऱ्यांसाठी व आरामदायक मजेशीर सहलीसाठी पैसे खर्च करण्याची तयारी असणाऱ्यांसाठी अॅम्बी व्हॅली हे एक परिपूर्ण ठिकाण आहे. 10,000 एकरावर पसरलेल्या या लक्झरी रिसॉर्टमध्ये इनडोअर व आउटडोअर मौजमस्ती करण्यासाठी बरीच आकर्षणे आहेत. लोणावळापासून फक्त 30 मिनिट व मुंबईपासून 105 किमी अंतरावर असलेल्या या अॅम्बी व्हॅली रिसॉर्टमध्ये एक 7 स्टार रेस्टॉरंट, एक 18 होल्सचे गोल्फ कोर्स, एक अत्याधुनिक वॉटर पार्क व मुलांसाठी एक विशेष भाग आहे. ज्यामुळे आठवडा अतिशय व्यस्ततेत गेल्यानंतर विकेंडला रिलॅक्स होण्यासाठी हे मुंबईकरांसाठी एक आदर्श असे कौटुंबिक सहलीचे ठिकाण आहे.

10. पाचगणी: सुखद निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी विलक्षण ठिकाण

panchgani

कधी एकेकाळी निवृत्त झाल्यानंतर स्थायिक होण्यासाठी आदर्श ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले पाचगणी आता मुंबई व पुणे येथील सहलप्रेमींचेही आवडते ठिकाण बनलेले आहे. सह्याद्री पर्वत रांगांमधील पाच डोंगर आणि गावांच्या दरम्यान वसलेले हे ठिकाण मुंबईपासून 285 किमी दूर आहे व आपल्या आरोग्यवर्धक हवामानासाठी प्रसिद्ध आहे. येथे आल्यानंतर सिडनी पॉईंटला अगत्याने भेट द्या, जेथून आपण धोम धरण व डेव्हिल्स किचन बघू शकता, ज्याविषयी पौराणिक कथांमध्ये म्हटले जाते की तेथे पांडवांनी काही काळ वास्तव्य केले होते व पारसी पॉईंटलाही भेट द्या, जेथून आपण कृष्णा खोऱ्याचे विहंगम दृश्य बघू शकता. पाचगणीविषयी एक रोचक बाब म्हणजे या भागाला वेढणाऱ्या पाच डोंगरांवर असलेले ज्वालामुखीचे पठार हे आशियामधले दुसरे सर्वात उंच पठार आहे आणि त्याचा क्रमांक अगदी तिबेटच्या पठारानंतर येतो.

तर मुंबईकरांनो, आता जेव्हा आपल्याला आपली पिकनिक बॅग भरून एखाद्या चित्तवेधक ठिकाणी एक दिवसासाठी किंवा विकेंडला जायचे असेल तेव्हा आमच्या या यादीमधून एखादे ठिकाण निवडा आणि एक भन्नाट व विलक्षण अनुभव घेण्यास सज्ज व्हा.

Book Your Flight to Mumbai Now!