या मार्चमध्ये आपण 10 हजारांपेक्षा कमी खर्चात सुट्ट्यांचा

Mayank Kumar

Last updated: Jul 13, 2017

Author Recommends

Do

Agartala: Visit the famous pineapple and orange gardens, litchi orchards, and cashew orchards
Kaziranga: Visit the tea gardens of Hathkhuli, Difalu, Methoni, and Behora
Kangra Valley: The 9-kilometer trek from McLeod Ganj to Triund for spectacular views of the Dhauladhar peaks and the valley below
Hampi: Ride the coracle (a circular shaped boat) on the waters of Tungabhadra River

See

Agartala: Ujjayanta Palace, Jagannath Temple, Kunjaban Palace, and Neermahal
Banaras: Ganga Aarti at Dashaswamedh Ghat in the evening
Kaziranga: The Kakochang Waterfalls and the coffee and rubber plantations on way to it
Hampi: The Indian sloth bear at the Daroji Bear Sanctuary, southeast of Hampi

Shop

Banaras: Muslin, silk fabrics, perfumes, ivory, and sculpture
Kangra Valley: Traditional clothes and chunky jewellery

Click

Banaras: Spectacular pictures of the sun rising on the ghats
Kaziranga: Capture the endangered great one-horned rhinoceros
Hampi: Breathtaking views of Hampi from Matang Hill, the highest point in the area

Filmy

Banaras: ‘Raanjhanaa’, ‘Masaan’, and ‘Laaga Chunari Mein Daag’ have been shot here
Kangra Valley: Scenes from the Bollywood films ‘Rockstar’, ‘Lunch Box’, and ‘Mary Com’ have been shot here

Want To Go ? 
   

उत्तम हवामान, प्रेक्षणीय ठिकाण आणि प्रवासाची आवड या गोष्टी म्हणजे आदर्श सुट्ट्यांकरिता आवश्यक घटक आहेत. मात्र, खर्चाची बाब आपल्याला नेहमी मागे खेचत असते, ज्यामुळे आपल्या प्रवासाच्या इच्छेचा आणि आनंदाचा हिरमोड होतो. आपली भटकंतीची आवड आणि इच्छेवर त्यामुळे पाणी फेरले जाते. आपली भटकंतीची आवड पूर्ण करण्यासाठी आणि त्या बहुप्रतिक्षित सुट्टीचे प्लॅनिंग करण्यासाठी फक्त रु.10 हजारांखालील विलक्षण ठिकाणांची यादी आम्ही बनवलेली आहे. ती आपण येथे बघू शकता:

काझीरंगा, आसाम

kaziranga-national-park-in-assam

वन्यजीव प्रेमींकरिता आणि निसर्ग प्रेमींकरिता काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट देणे आवश्यकच आहे, कारण की हे दुर्मिळ एक शिंगी गेंड्यांचे आणि पाण्यातील जंगली म्हशींचे घर आहे, आणि येथे त्यांची सर्वात जास्त संख्या आहे. सोबतच हे जागतिक वारसा स्थळ व्याघ्रप्रकल्प सुद्धा आहे, येथे जगातील वन्यजीव अभयारण्यांमध्ये वाघांची सर्वात जास्त संख्या आहे. यासोबतच, मोठ्या संख्येने हत्ती, दलदलीतील हरणे आणि इतर सस्तन प्राणी आणि पक्षी विपुल संख्येने आहेत. या अभयारण्यांना भेट देण्यासाठी मार्च महिना उत्तम आहे, कारण की वसंत ऋतूमध्ये उमललेल्या फुलांनी जंगल नयनरम्य बनलेले असते आणि या रम्य वातावरणात पाण्याच्या साठ्यांच्या बाजूला वाघ आणि गेंडे सहजपणे बघता येतात.

वन्यजीवांचे निरीक्षण आणि रेकॉर्डिंग करण्यासाठी आपल्यासोबत दुर्बीण आणि हाय-स्पीड कॅमेरे घेण्यास विसरू नका!

काय करावे:

गुवाहाटीपासून अंतर: 228 किलोमीटर

हॉटेल: रु.1,600 प्रति रात्र. सोयिस्कर ठिकाणी वसलेले आणि किफायतशीर ड्युतास कॉटेज हा एक चांगला पर्याय आहे.

जेवण: रु.1,000 प्रति दिवशी. स्थानिक आसामी पाककृती जसे लक्सा, खार, टेंगा आणि मासळी व भाताच्या खाद्यपदार्थांची लज्जत चाखून बघा. हॉटेल आणि लॉज व्यतिरिक्त स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी मैहांग रेस्टॉरंट आणि लैमा मणिपुरी ढाबा हे सुद्धा उत्तम पर्याय आहेत.

प्रवास: रु.800 किंवा कमी खर्चामध्ये गुवाहाटीपासून राउंड ट्रीप उपलब्ध आहे. गुवाहाटी ते काझीरंगाच्या 5 तासांच्या आरामदायक प्रवासाकरिता बऱ्याच एसी/नॉन-एसी बसचा पर्याय उपलब्ध आहे.

2 रात्री आणि 3 दिवसांच्या प्रवासाचा एकूण खर्च: रु.3,200 (हॉटेल) + रु.2,000 (जेवण) + रु.800 (प्रवास) + रु.1,000 (खरेदी, किरकोळ खर्च) = रु.7,000

Book Your Stay at Kaziranga Deutas HotelBook Your Stay at Kaziranga Deutas Hotel

हम्पी, कर्नाटक

hampi-in-karnataka

प्राचीन विजयनगर साम्राज्याच्या मंदिरांच्या शहराला म्हणजेच हम्पीला भेट देऊन त्या काळाची सफर करा. हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ जुनी स्मारके, भव्य अवशेष आणि मंदिरांनी भरलेले आहे, ज्यामुळे या ठिकाणी फक्त इतिहास प्रेमी आणि वास्तुकलेचे अभ्यासकच आकर्षित होत नाहीत तर स्थळदर्शन करणारे आणि उत्साही फोटोग्राफर्सचे सुद्धा हे आवडते ठिकाण आहे. हम्पीला महत्त्वाचे धार्मिक स्थळ मानले जाते कारण की येथील भव्य विरूपाक्ष मंदिर तीर्थयात्रेचे प्रमुख केंद्र आहे.

काय करावे:

बंगळुरूपासून अंतर: 363 किलोमीटर

हॉटेल: रु.1,400 प्रति रात्र किंवा त्यापेक्षा कमी. हॉटेल रॉक रिजेन्सी, रॉकी गेस्ट हाउस, किंवा गोपी गेस्ट हाउस आणि रूफ रेस्टॉरंट यामधून एकाची निवड करा.

जेवण: रु.1,000 प्रति दिवशी. स्थानिक दक्षिण भारतीय मेजवानीसोबतच बऱ्याचशा रेस्टॉरंटमध्ये इटालियन आणि इस्रायली पाककृती सुद्धा सादर केल्या जातात. स्वादिष्ट मेजवानीसाठी मँगो ट्री, वॉटरफॉल्स आणि उडपी श्री कृष्ण भवनला भेट देऊन बघा.

प्रवास: रु.1,600 बंगळुरूपासून राउंड ट्रीप. बंगळुरूहून होसपेटपर्यंत बसने जा आणि मग हम्पीकरिता कॅब बुक करा.

2 रात्री आणि 3 दिवसांच्या प्रवासाचा एकूण खर्च: रु.2,800 (हॉटेल) + रु.2,000 (जेवण) + रु.1,600 (प्रवास) + रु.1,000 (खरेदी, किरकोळ खर्च) = रु.7,400

Book Your Stay at Rock Regency HotelBook Your Stay at Rock Regency Hotel

कांगडा व्हॅली, हिमाचल

kangra-valley-himachal-pradesh
Photo Courtesy:Flickr/Zirano

धौलाधार पर्वत रांगांच्या पायथ्याशी वसलेली कांगडा व्हॅली नेत्रदीपक दृश्ये आणि नयनरम्य हिरव्यागार परिसरासाठी प्रसिद्ध आहे. उंच पर्वतांवर ट्रेकिंग करा, खळखळत्या बारमाही प्रवाहांमध्ये आपले पाय डूबवून नदीकाठी विश्रांती घ्या किंवा फक्त शांतपणे बसून निसर्गसौंदर्याचा आनंद घ्या, ही आनंददायक व्हॅली सोडून जाण्याची आपली इच्छाच होणार नाही. येथील प्रसिद्ध शहरे मॅकलॉडगंज आणि धर्मशाळा हजारो भारतीय आणि विदेशी पर्यटकांना दरवर्षी आपल्याकडे आकर्षित करतात, जे येथील शांत वातावरण, तिबेटी संस्कृती, मोहक कॅफे आणि बौद्ध धर्म, योग आणि ध्यानधारणेच्या अभ्यासक्रमांचा लाभ घेण्यास येतात.

काय करावे:

दिल्लीपासून अंतर: 462 किलोमीटर

हॉटेल: रु.1,100 प्रति रात्र. किफायतशीर हॉटेल ग्रोव्हर किंवा कटोच होमस्टे यामधून एकाची निवड करा. या व्हॅलीच्या सर्वोत्तम अनुभवाकरिता तंबू किंवा एखाद्या कॅम्पिंग स्थळावर वास्तव्य करा.

जेवण: रु.1,000 प्रति दिवशी. स्थानिक पहाडी मेजवानीसाठी विविध ढाबे आणि छोट्या रेस्टॉरंटकडे मोर्चा वळवा. कलन के पकोडे, भ्रूणी, नाशपाती सब्जी, सीरा आणि रोडोड्रेंडॉनचे लोणचे चाखून बघा. युरोपिअन, तिबेटी आणि भूतानी पाककृती सादर करणाऱ्या विलक्षण कॅफेंकरिता मॅकलॉडगंज प्रसिद्ध आहे, यापैकी कॅफे इल्लिटेरटी, तिबेट किचन, शिवा कॅफे आणि सीड कॅफे यांना आपण अवश्य भेट द्यावी.

प्रवास: रु.1,400 मध्ये बसद्वारे परतीचा प्रवास. दिल्ली ते कांगडा व्हॅली जाण्याकरिता 10 तासांचा रात्रभराचा बस प्रवास सर्वात आरामदायक आहे.

2 रात्री आणि 3 दिवसांच्या प्रवासाचा एकूण खर्च: रु.2,200 (हॉटेल) + रु.2,000 (जेवण) + रु.1,400 (प्रवास) + रु.1,000 (खरेदी, किरकोळ खर्च) = रु.6,600

Book Your Stay at Grover HotelBook Your Stay at Grover Hotel

आगरतळा, त्रिपुरा

agartala-in-tripura
Photo Courtesy:Flickr/John Steedman

भारतातील राज्यांच्या इतर गजबजलेल्या राजधानींच्या उलट आगरतळामध्ये आरामदायक आणि शांतपणे सुट्टी व्यतित करण्याचा आनंद मिळतो. याची समृद्ध सांस्कृतिक विविधता शहरातील विविध धार्मिक स्थळांद्वारे दिसून येते आणि येथे बरेच हिंदू आणि आदिवासी उत्सव साजरे केले जातात. हावरा नदीच्या काठी वसलेले हे राजधानीचे शहर आपल्या सुंदर राजवाडे, बगिचे, तलाव आणि संग्रहालयांद्वारे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करते. येथे भेट देण्याकरिता मार्च महिना उत्तम आहे.

काय करावे:

कोलकातापासून अंतर: 490 किलोमीटर

हॉटेल: रु.1,200 प्रति रात्र.

आगरतळामध्ये सरकारी अतिथी गृहांपासून बजेटमधील लक्झरी हॉटेलपर्यंत वास्तव्याचे अनेक पर्याय आहेत. आरामदायक आणि किफायतशीर वास्तव्याकरिता आम्ही हॉटेल वुडलँड पार्कची शिफारस करतो.

जेवण: रु.1,000 प्रति दिवशी.

आगरतळामधील पाककृतींवर बंगाली आणि उत्तर-पूर्वेच्या पाककलेचा प्रभाव आहे. करी क्लब, गरम तवा आणि दी माणिक्य कोर्ट सारख्या रेस्टॉरंटमधील स्थानिक मेजवानींची लज्जत चाखा. स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध असणाऱ्या आगरतळामधील मुख्य रस्ता आणि बाजारांमध्ये जेवणाकरिता असंख्य पर्याय उपलब्ध आहेत, विशेषत: संध्याकाळी.

प्रवास: रु.4,000 राउंड ट्रीप.

कोलकातापासून आगरतळा जाण्याचा सर्वात सोयिस्कर मार्ग म्हणजे विमानप्रवास. किफायतशीर विमानप्रवासाच्या पर्यायांकरिता आगाऊ बुकिंग करा.

2 रात्री आणि 3 दिवसांच्या प्रवासाचा एकूण खर्च: रु.2,400 (हॉटेल) + रु.2,000 (जेवण) + रु.4,000(प्रवास) + रु.1,000 (खरेदी, किरकोळ खर्च) = रु.9,400

Book Your Stay at Woodland Park HotelBook Your Stay at Woodland Park Hotel

बनारस, उत्तर प्रदेश

banaras-up

आपण धार्मिक असाल किंवा नसालही, मात्र बनारस या पवित्र शहराच्या विलक्षण शांततेने आणि आध्यात्मिक अनुनादाने आपण भारावून गेला नाहीत तर नवलच. गंगा नदीने वेढलेली ही ‘भारताची आध्यात्मिक राजधानी’ असंख्य मंदिरांचे आणि पवित्र स्थळांचे घर आहे. हिच्या सुंदरतेमध्ये आणि गजबजलेल्या घाटांवरच्या गूढतेमध्ये हरवून जा, धार्मिक विधी आणि समारंभ पार पाडणाऱ्या भाविकांच्या गर्दीमध्ये सामिल व्हा किंवा पवित्र गंगेमध्ये आंघोळ करून मोक्ष प्राप्त करा. बनारसच्या उन्मुक्त आणि बेधुंद होळीची मजा लुटण्यासाठी मार्च महिन्यात येथे भेट द्या. यावेळी येथील प्रेक्षणीय घाट रंगाच्या महासागरात डुंबलेले असतात.

काय करावे:

दिल्लीपासून अंतर: 815 किलोमीटर

हॉटेल: रु.1,100 प्रति रात्र किंवा त्यापेक्षा कमी.

घाटाजवळ किफायतशीर निवासाकरिता हॉटेल गणेश, हॉटेल इशान किंवा गेस्ट हाउसचा पर्याय आपण निवडू शकता.

जेवण: रु.1,000 प्रति दिवशी.

आपल्या स्वादिष्ट व लज्जतदार स्ट्रीट फूडकरिता बनारस जगप्रसिद्ध आहे, ज्यामध्ये कचोरी, आलू पूरी, लस्सी, थंडाई आणि पान यांचा समावेश होते.

प्रवास: रु.900 दिल्लीपासून परतीचा ट्रेन प्रवास.

ट्रेनच्या मुबलक उपलब्धतेद्वारे, दिल्लीपासून बनारसला जाण्यासाठी 11 तासांचा रेल्वे प्रवास सर्वात सोयिस्कर मार्ग आहे. येथे पोहोचण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे रु.2,500 मधील 1 तास 20 मिनिटांचा विमान प्रवास आहे.

2 रात्री आणि 3 दिवसांच्या प्रवासाचा एकूण खर्च: रु.2,200 (हॉटेल) + रु.2,000 (जेवण) + रु.900 (प्रवास) + रु.1,000 (खरेदी, किरकोळ खर्च) = रु.6,100.

Book Your Stay at Ganesha HotelBook Your Stay at Ganesha Hotel

 

More Travel Inspiration For Varanasi

More Blogs For Summer Ideas