भारत काही विस्मयजनक प्राचीन हेरिटेज हॉटेल्सचे घर आहे. जेव्हा हेरिटेज हा शब्द आपल्या कानी पडतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर बहुधा भव्य राजवाड्यांचे चित्र उभे राहते ज्यांना आता मोठ्या हॉटेलमध्ये बदलण्यात आले आहे, असे बरेचशे प्राचीन घर, इस्टेट आणि किल्लेसुद्धा आहेत ज्यांची डागडुजी करून विलक्षण भव्यता प्रदान करण्यात आलेली आहे. आपल्या पुढील सुट्ट्यांमध्ये खालील 5 पैकी कोणत्याही एका अज्ञात हेरिटेज वास्तूमध्ये वास्तव्य करण्याचा विचार करा. आपल्याला त्यांच्या मोहकतेची आणि आकर्षणाची भुरळच पडेल...
सीजीएच अर्थची ही एक प्रमुख मालमत्ता आहे, दी ब्रुनटोन बोटयार्डची ऐतिहासिक पाळेमुळे थेट 1895मध्ये जातात जेव्हा कोचीन ही फ्रेंच वसाहत होती. जीओ ब्रुनटोन ज्यांच्या नावावर या हेरिटेज हॉटेलचे नामकरण झालेले आहे, त्यांचा त्या काळी जहाज बांधणीचा व्यवसाय होता आणि त्यांच्याच व्हिक्टोरियन शिपयार्डवर आज ब्रुनटोन बोटयार्ड उभे आहे. आपल्या डच-पोर्तुगीज शैलीच्या वास्तुरचनेमधील काही सामग्री जसे लाकडी तुळया आणि टेराकोटा टाईल्स हे ब्रुनटोन यांच्या व्यवसायातीलच सामग्री आहे आणि या फाईव्ह स्टार हॉटेलच्या उभारणीत त्यांचा वापर करण्यात आला आहे. याचा भव्य वारसा ब्रुनटोन बोटयार्डमध्ये ठायी ठायी दिसून येतो, ज्यामध्ये येथील 26 सी-फेसिंग खोल्या आणि सुईट यांचा समावेश आहे ज्या फोर-पोस्टर बेडसारख्या वसाहतकालीन अंतर्गत सजावटीने सुसज्ज आहेत. आउटडोअर पूल आणि स्पासारख्या मनोरंजन सुविधांसह या हेरिटेज हॉटेलमध्ये सादर केल्या जाणाऱ्या पाककृती या पोर्तुगीज, डच आणि इंग्रजांच्या प्रभावाचे मिश्रण आहेत. ब्रुनटोन बोटयार्डमधील आपल्या वास्तव्याचे आकर्षण वाढवण्यासाठी हॉटेलद्वारे कोचीन बंदरावर सूर्यास्ताच्या वेळी मोफत बोट सफर, मोफत सायकल रपेट, योग सत्र आणि पाककलेचे प्रदर्शन असे फायदे सादर केले जातात.
Book Your Stay at Brunton Boatyard
जे कोलकाताला कलकत्ता म्हणून ओळखतात ते आपल्याला सांगतील की ओबेरॉय ग्रँड ही एक प्रतिष्ठित संस्था आहे जी चौरींघीच्या केंद्रभागी स्थित आहे, जेथे शहराच्या समृद्ध आणि ओझरत्या संस्कृतीची झलक पाहायला मिळते. 18व्या शतकापासून राजकारणी आणि राज्य प्रमुखांची वर्दळ असलेल्या या हेरिटेज हॉटेलमधील बिना खांबाचे भव्य बॉलरूम बऱ्याचशा बॉल आणि कोरोनेशनचे आयोजन स्थळ राहिलेले आहे. आजसुद्धा, ओबेरॉय ग्रँड लक्झरी आणि आतिथ्याच्या संकल्पनांची व्याख्या करीत आहे आणि आपण लॉबीमध्ये प्रवेश केल्यापासून आपल्यावर प्रभावी ठसा उमटवायला सुरुवात होते, जेथे एक विशाल झुंबर लावलेले आहे आणि एक हस्तनिर्मित शतकाहून जुना पियानो ठेवलेला आहे, ज्यामुळे पुढील भव्यतेची आपसूकच कल्पना येते. भव्य आणि अत्यंत आरामदायक खोल्या व सुईट्ससह ओबेरॉय ग्रँड हॉटेलमधील सुविधांमध्ये हॉटेलच्या वसाहती शैलीच्या भागामधील ओबेरॉय स्पा, एक आउटडोअर स्विमिंग पूल आणि अत्याधुनिक फिटनेस सेंटर सामिल आहे. ओबेरॉय ग्रँड आपल्या रेस्टॉरंट आणि बारसाठी प्रसिद्ध आहे – ला टेरेस हा फ्रेंच शैलीचा बिस्ट्रो, बान थाई जेथे पुरस्कार प्राप्त थाई पाककृती सादर केल्या जातात आणि चौरींघी बार जो आपल्याला ब्रिटिश राजवटीच्या दिवसांत घेऊन जातो.
Book Your Stay at The Oberoi Grand
ऐतिहासिक नीमराना हॉटेलची संपत्ती असलेले, ले कोलोनियल हे 16व्या शतकातील वसाहतकालीन घर आहे ज्याला हेरिटेज हॉटेलमध्ये बदलण्यात आले आहे. जागोजागी गतकाळातील संपत्तीच्या खाणाखुणा बाळगणाऱ्या ले कोलोनियल विषयी म्हटले जाते की तेथे एकेकाळी वास्को द गामा आणि सेंट फ्रान्सिस यांचे वास्तव्य होते. महान व्यक्ती जसे टिपू सुलतान, व्हॉईसरॉय आणि मेजर पेट्री यांच्या नावे असलेल्या खोल्यांमध्ये अंतर्गत सज्जा त्या काळातील आहे, जसे सागवानी लाकडाची पॅनेलिंग, विस्तीर्ण व्हरांडा आणि मोठे पोस्टर बेड. लक्झरीसह यादीमध्ये क्रमांक सर्वात वरचा आहे, त्यामुळे गार्डन पूल आणि स्पासारख्या सुविधा आणि अंतर्गत कोर्टयार्ड पॅशिओसारख्या सुविधा व जुन्या शैलीतील भोजन कक्षांनी कोलोनियलच्या आकर्षणात आणखीनच भर पडलेली आहे.
गढवाल हिमालयाच्या डोंगराच्या कळसावर वसलेले ‘डोंगराची राणी’ मसुरी हे एकेकाळी ब्रिटिशांचे उन्हाळी विश्रामस्थान होते जे पठारावरच्या रणरणत्या उन्हापासून स्वत:ला वाचण्याकरिता येथे यायचे. शहरात ऐतिहासिक इमारतींची रेलचेल आहे जसे मसुरी लायब्ररी, गन हिल आणि कॅमल्स बॅक सिमेट्री व सोबतच खासगी इस्टेट आहेत ज्या सन 1840 पासून अस्तित्वात आहेत. इंग्रजांच्या राजवटीत बांधण्यात आलेल्या सर्वात महत्त्वाच्या आणि विलासी हॉटेलमधील एक आहे दी सेव्हॉय, ज्याला आता फॉर्च्युन द सेव्हॉय म्हणून ओळखले जाते. एका आयरिश बॅरिस्टर सेसिल डी. लिंकनद्वारे 1902मध्ये उघडण्यात आलेल्या या हॉटेलमध्ये जुन्या काळची मोहिनी आणि आधुनिक काळातील आराम यांचा सुरेख संगम आहे. इतक्या वर्षांदरम्यान पडझड झालेल्या बहुतांश मूळ इंग्लिश गोथिक वास्तूरचनेला त्याचे ऐतिहासिक वैभव पुन्हा प्रदान करण्यात आले आहे. 50 खोल्या आणि सुईट्सने सुसज्ज असलेले हे हॉटेल एक मास्टरपीस आहे ज्यामध्ये विस्तीर्ण लॉन आहे, जेथे पारंपारिक चहाचा आनंद घेता येतो. दी फॉर्च्युन द सेव्हॉय हा इतिहासाचा तो अध्याय आणि वारसा आहे जो प्रभावित आणि मंत्रमुग्ध केल्याशिवाय राहत नाही.
Book Your Stay at Fortune the Savoy
थार वाळवंटाने वेढलेले सोनेरी शहर जैसलमेर म्हणजे राजस्थानचे महान वैभव आहे. या राजसी राज्यातील इतर भागांप्रमाणेच समृद्ध वारसा आणि संस्कृतीने नटलेल्या जैसलमेरमध्ये स्थापत्यशास्त्रातील चमत्कारांची उधळण झालेली आहे, जसे उंचच उंच जैसलमेर किल्ला आणि प्राचीन हवेली. त्यातील रत्न म्हणजे सूर्यगड, हा एक विशाल किल्लेनुमा राजवाडा आहे जो आता एक लक्झरी हेरिटेज हॉटेल बनलेले आहे. प्राचीन आणि आधुनिकतेच्या तत्त्वांना एकत्र करून बनवलेल्या या हॉटेलमधील खोल्या, सुईट्स आणि हवेल्या या काव्यात्मकतेचा उत्कृष्ट नमुना आहेत ज्या राजसीपणाच्या मानकांना साजेशाच आहेत. हॉटेलच्या सुविधांमध्ये एक स्पोर्ट सेंटर, स्विमिंग पूल आणि स्पा यांचा समावेश होतो. सूर्यगडमधील भोजन चाखून बघण्यासारखे आहे आणि अस्सल राजस्थानी भोजन गर्व आणि आनंदाचा विषय आहे. पारंपारिक पाककृती आणि कोळशाच्या ग्रील्सचा वापर करून इथले शेफ राजपुताना क्षेत्राच्या विविध चवींचा नजराणा पेश करतात, जे खाद्यप्रेमींकरिता पर्वणीच आहे. सूर्यगड येथील आनंददायक आणि आतिथ्यशील पाहुणचाराने आपल्याला सुद्धा राजेशाही आतिथ्याची मेजवानी मिळेल!
Brunton Boatyard, Cochin: A Colonial Waterfront Retreat
Namrata Dhingra | Mar 15, 2018
Best Kept Secret! India's 5 Hidden Heritage Properties
Devika Khosla | Sep 26, 2017
Encounter MP’s Wildlife Wonders at These Wow Jungle Resorts!
Surangama Banerjee | Mar 3, 2020
Experience Seekers Alert! These 7 Dreamy CGH Earth Resorts Are for You
Surangama Banerjee | Dec 26, 2019
Luxury Hotels in New South Wales that Offer the Best Window Views
Namrata Dhingra | Oct 17, 2019
Your Guide to Enjoying the Best Daycation in Delhi NCR!
Devika Khosla | Mar 17, 2020
Live the Luxe Life with an Experiential Stay at the Postcard Hotels!
Tabassum Varma | Aug 9, 2019
Pick These Unconventional Properties, to Holiday in Goa the Postcard Way!
Sunny Mishra | Aug 21, 2019
Whispering Palms Beach Resort Goa: A Dreamy Beachfront Stay
Surangama Banerjee | May 6, 2019
Top Hotels in Navi Mumbai for a Splendid Stay
Tabassum Varma | Apr 30, 2019