भारतात ख्रिसमसच्या सुट्ट्यांकरिता सर्वांत लोकप्रिय 5 ठिकाणे

Ragini Mehra

Last updated: Sep 24, 2019

Author Recommends

Events

Kerela:The Cochin Carnival, one of the biggest carnivals in India, takes place on New Year’s Eve and New Year’s Day
Mumbai: The Kala Ghoda Arts Festival in winter
Shillong: Catch a live musical performance by one of the local bands during Christmas holidays

Do

Mumbai: Take a walk by the sea in the rains
Pondicherry: From boating, canoeing and kayaking, to backwater sailing and camping at the beach side; Pondicherry offers many options for adventure lovers
Shillong: Attend mid-night mass at the Cathedral Church

Click

Kerala: A selfie of you cruising along tropical backwaters
Lansdowne: A bonfire, some music and a gaggle of happy friends is the perfect picture

Filmy

Kerala: A few well-known Bollywood movies have been shot in Kerala, such as "Bombay" and "Guru"
Pondicherry: Ang Lee’s blockbuster movie, "Life of Pi" is set in this former French colony

Safety

Police 100
Fire 101
Ambulance 102

Want To Go ? 
   

मला ख्रिसमस खूप आवडतो – सजावट, उत्सव, ट्री, भेटवस्तू! आणि तो एखाद्या विशेष जागी साजरा करण्याचा आनंद काही औरच आहे. मी आवर्जून प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या शहरांमध्ये ख्रिसमस साजरा करते आणि त्याच्या अविस्मरणीय स्मृती जपून ठेवते. त्यामुळे जर आपल्याला नेहमीचे ठिकाण (अर्थातच गोवा) टाळून इतरांपेक्षा वेगळा ख्रिसमस साजरा करायचा असेल तर भारतातील या सर्वोत्तम ठिकाणांची यादी अवश्य वाचा:

शिलाँग

शिलाँगमधील कॅथेड्रल चर्च हे उत्तर पूर्व भारतातील सर्वात जुन्या चर्चपैकी एक आहे आणि संपूर्ण जगभरातून मोठ्या संख्येने श्रद्धाळू येथे मिडनाईट मासमध्ये सहभागी होण्यास येतात. ऑल सेंट्स कॅथेड्रलच्या ख्रिसमस पूर्व उत्सवाचा भाग म्हणून एक शतकाहून जुन्या फर ट्रीवर रोषणाई केली जाते आणि पादरी ख्रिसमसविषयी प्रवचन करतात. घंटा वाजवणे, प्रेमळ अभिवादन करणे, मंजुळ गाणे आणि उंच नैसर्गिक ख्रिसमस ट्री सजवणे इत्यादी उपक्रमांद्वारे हा उत्सव साजरा केला जातो.

 

christmas-decorations-shillong

आपण ख्रिसमसच्या सुट्ट्यांदरम्यान शिलाँगला भेट देताना तेथील स्थानिक बँडचा लाईव्ह संगीत कार्यक्रम बघण्यास विसरू नका. त्यातील काही बँडना चर्चमध्ये गॉस्पेल संगीताचे प्रदर्शन करताना सुद्धा आपण ऐकू शकता. स्थानिक नृत्य गटसुद्धा शहरातील समारंभांमध्ये त्यांच्या कौशल्यांचे प्रदर्शन करीत असतात. ख्रिसमसच्या या सुट्ट्यांध्ये शिलाँगच्या सहलीची योजना बनवा आणि धमाल मजा करण्यास तयार राहा!

Book Your Flight to Shillong

मुंबई

मुंबईत ख्रिसमस जल्लोषात आणि उत्साहाने साजरा केला जातो, त्यामुळे आपल्या ख्रिसमसच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्याकरिता हे आदर्श ठिकाण आहे. मॉल आणि बाजार ख्रिसमस ट्री, कलात्मक सजावट आणि दिव्यांनी झगमगलेले असतात व सोबतच खरेदीवर आकर्षक सवलतही देत असतात. इतर ठिकाणांसोबतच चर्चगेट, बांद्रा आणि हिल रोडच्या फुटपाथवर सुंदर ख्रिसमस ट्रीची सजावट केलेली असते. मागच्या ख्रिसमसला मी मुंबईमध्ये होते आणि मिडनाईट मासच्या दरम्यान माउंट मेरीज बॅसिलिका, बांद्रा येथे मेणबत्ती पेटवायला गेले होते. यामुळे आपली इच्छा पूर्ण होते अशी मान्यता आहे...आणि माझ्याबाबतीत ते खरे ठरले!

mumbai-christmas-holidays

मुंबई असे शहर आहे जेथे पार्टी व जल्लोष लोकप्रिय आहे आणि याचा अनुभव घेण्याकरिता ख्रिसमस हा निश्चितच सर्वोत्तम संधीपैकी एक आहे. या शहरात असंख्य धम्माल नाईट क्लब आहेत, त्यामुळे मौजमजा करण्याकरिता आपल्याजवळ बरेचशे पर्याय उपलब्ध असतात. मुंबईकरिता ख्रिसमस सुट्ट्यांमध्ये बऱ्याच डिल्स उपलब्ध आहेत त्यामुळे शेवटच्या क्षणी होणारी निराशा टाळण्यासाठी आगाऊ बुकिंग सुनिश्चित करा.

Book Your Flight to Mumbai

पाँडिचेरी

पारंपारिक ख्रिसमसकरिता भारतातील हे छोटेसे फ्रान्स अतिशय सुंदर असे ठिकाण आहे. या उत्सवाच्या हंगामात ‘चर्च ऑफ अवर लेडी ऑफ इमॅकुलेट कंसेप्शन’ आणि ‘बॅसिलिका ऑफ सॅक्रेड हार्ट ऑफ जीसस’ या लोकप्रिय चर्चना भेट देण्यास मुळीच विसरू नका. येथे ख्रिसमसची सुंदर सजावट व दिव्यांची रोषनाई केली जाते आणि मास तामिळ भाषेत केला जातो. समुद्रकिनाऱ्यावरच्या या शहरात ख्रिसमस दरम्यान लोकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो आणि वातावरण अपेक्षा आणि उत्साहाने भरलेले असते.

सुंदर समुद्रकिनारे आणि लज्जतदार स्थानिक पाककृती ही आणखी काही कारणे आहे ज्यासाठी आपल्याला पाँडिचेरीच्या ख्रिसमस हॉलिडेची बुकिंग करणे आवश्यक ठरते. समुद्रकिनाऱ्यावर संध्याकाळी आपल्या जीवलगासोबत समुद्राच्या अनंत लाटाकडे बघत शांतपणे उत्सव साजरा करा.

Book Your Flight to Chennai

लँसडॉउन

गर्दीपासून दूर कुठेतरी ख्रिसमस साजरा करण्याची आपली इच्छा आहे का? मग येथेच या! अज्ञात आणि अस्पर्श असे लँसडॉउन आपल्याला दैनंदिन व्यस्ततेपासून मनासारखी विश्रांती प्रदान करेल. आपल्या ख्रिसमसच्या सुट्ट्यांना अविस्मरणीय बनवण्याकरिता मित्र, कुटुंबिय किंवा त्या विशिष्ट व्यक्तीसोबत या हिल स्टेशनकडे प्रयाण करा. डोंगरावर शेकोटी, मंद संगीत, सुंदररित्या सजवलेले ख्रिसमस ट्री आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण याकरिता आपल्या छोट्याशा ख्रिसमसची आखणी करा.

landsdowne christmas india
 Plan a surprise for that special someone as you head to Lansdowne for Christmas

निसर्गरम्य डोंगर, पाईन आणि ओकची झाडे व डोंगरावरची प्रसन्न हवा आपल्या उत्सवाला जादुई बनवेल यात काहीच शंका नाही.

Book Your Flight to Dehradun

केरळ

आपला मूड प्रसन्न करण्याकरिता केरळमधील प्रत्येक रस्ता ख्रिसमसच्या सुंदर सजावटीने सजलेला असतो. सर्व चर्चमधील मिडनाईट मासमध्ये प्रभू येशूच्या जन्माचे सादरीकरण केले जाते, कॅरोल गायन आणि इतर बरेच उपक्रम साजरे केले जातात, मग आणखी काय हवे? या उत्सवामध्ये कॅथेड्रल आणि चर्चमधील वातावरण जिवंत झाले असताना, बॅकवॉटर्सचे स्वत:चे आकर्षण आहेच. उत्सवाच्या वातावरणात हाउसबोटीमधील आरामदायक वास्तव्यामुळे ख्रिसमसच्या सुट्ट्यांकरिता हे आदर्श ठिकाण आहे.

christmas-celebrations-kerala
 The Christmas decorations will brighten up your mood!

केरळमध्ये ख्रिसमसच्या जल्लोषात लज्जतदार पाककृतींचा आस्वाद घेण्याचा मोह टाळताच येत नाही. ख्रिसमसच्या मेजवानीमध्ये अच्चपम, फिश मॉलीसोबत ब्रेड, बीफ करी आणि पारंपारिक केरळी मिष्ठान्नांचा समावेश होतो. जर आपण भेट देण्याचा विचार करीत असाल तर आत्ताच ख्रिसमस हॉलिडे डिल्स शोधणे सुरू करा जेणेकरून नंतर आकाशाला भिडलेल्या किंमतींचा सामना करावा लागणार नाही!

Book Your Flight to Calicut

मी तर यापैकी कुठल्याही एका ठिकाणी माझ्या ख्रिसमसच्या सुट्ट्यांचा आनंद घेणार आहे. आपला काय विचार आहे?