दिल्लीचा हिवाळा संपूर्ण भारतात जरा हटकेपणे साजरा केला जातो. दिल्लीच्या हिवाळी संध्याकाळमध्येच असे काहीतरी आहे की ज्यामुळे लगेच रोमँटिक जाणिवा जागृत होतात. या आनंदामध्ये जेव्हा एका गरम चहाच्या कपाची अथवा जलेबी किंवा पकोड्यांची भर पडते तेव्हा गारठलेले आपले हात व मन प्रफुल्लित होते. मात्र, जर हिवाळ्याचा अविस्मरणीय अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला बाहेर पडावेच लागेल. या हिवाळ्यात भेट देण्यासाठी आम्ही आपल्यासाठी दिल्लीच्या 6 वैशिष्ट्यपूर्ण आउटडोअर रेस्टॉरंट्सची यादी संकलित केली आहे आणि आमच्यावर विश्वास ठेवा, त्यांची निवड त्यांच्या प्रतिष्ठेनुरूपच करण्यात आली आहे.
नवी दिल्लीमधील आपल्या काही स्पर्धकांच्या उलट दी पॉटबेली रूफटॉप कॅफे आपल्या पाहुण्यांसाठी अद्वितीय खाद्यप्रकार सादर करीत असतो. दी पॉटबेली रूफटॉप कॅफेचे वैशिष्ट्य म्हणजे अस्सल, तोंडाला पाणी सोडणारी बिहारी मेजवानी व कदाचित शहरातील सर्वोत्तम लिट्टी चोखा आहे. शाहपूर जाटचा हवेशीर परिसर ज्याला हौज खास व्हिलेज मुख्य प्रवाहात आल्यापासून नवीन हीपस्टर हँगआउट असे संबोधले जाते, तेथे दिल्लीच्या घाईगर्दीपासून हवीहवीशी विश्रांती मिळते. बैंगन भरता, आलू भरता आणि मटण चोखा यावर ताव मारून बघा – हे सर्व किफायतशीर किंमतीमध्ये उदारहस्ते वाढले जाते.
स्थान: शाहपूर जाट
दोघांकरीता किंमत: रु. 1200 (अंदाजे)
नावच सर्वकाही सांगत आहे – अमोर अशी जागा आहे जेथे आपण आपल्या जोडीदाराला विशेष प्रसंगी घेऊन जाऊ शकता. हौज खास व्हिलेजमधील सर्वात लोकप्रिय रोमँटिक रेस्टॉरंट म्हणून ओळखले जाणारे अमोर हे तलावाच्या दिशेने असलेल्या आपल्या आकर्षक आउटडोअर बैठकव्यवस्थेमुळे स्वत:चे वेगळे अस्तित्व राखून आहे. सर्वोत्तम अनुभवासाठी रात्रीच्या वेळेस भेट द्या व आपल्या जोडीदाराला फ्रेंच, इटालियन, कॉन्टिनेन्टल, मेडिटेरेनिअन व सीफूड खाद्यपदार्थांची मेजवानी द्या.
ठिकाण: हौज खास व्हिलेज
दोघांकरीता किंमत: रु. 2800 (अंदाजे)
दिल्लीमधला कुठलाही खाद्यप्रेमी आपल्याला सांगेल की इम्परफेक्टो हौज खास व्हिलेजमधील सर्वात शानदार हँगआउट आहे. सजावट मुद्दामहून अनाकर्षक ठेवलेली आहे आणि संपूर्ण रचना कोणत्याही क्षणी खाली कोसळेल अशा बेताची रचलेली आढळून येते. भरीस भर एक गुलाबी स्कूटर शिड्यांवर लटकवलेली आहे व त्यामुळेच आपल्याला दिसून येईल की सर्व तरूण मुले-मुली येथे सेल्फी काढण्याकरीता इतके उत्सुक का असतात. उबदार वातावरणामध्ये इटालियन व स्पॅनिश पाककृती सादर करण्याबरोबरच इम्परफेक्टो आपल्या लाइव्ह म्युझिक नाईट्ससाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. तिन्हीसांजेनंतर वातावरणाला त्याच्या सजावटीचा रंग चढतो आणि आपल्या अनुभवामध्ये काल्पनिक दिव्यांची प्रचंड भर पडते. रोमँटिक डेट व सोबतच मित्रांसमवेत चिल मारण्यासाठी उत्कृष्ठ निवड असलेले इम्परफेक्टो हे हौज खास व्हिलेजमधील सर्वात लोकप्रिय रेस्टॉरंट्सपैकी एक आहे – जे आपल्याला काहीतरी खुणवत असते.
ठिकाण: हौज खास व्हिलेज
दोघांकरीता किंमत: रु. 2000 (अंदाजे)
मध्य दिल्लीमध्ये असलेले लोधी – दी गार्डन रेस्टॉरंट हे व्यवस्थेमधील अधिकारी पदावर असणाऱ्या व्यक्तींना आपल्याकडे आकृष्ट करते जसे राजनीतिज्ञ, लेखक, प्रभावशाली पत्रकार, थिंक टँकचे मुत्सद्दी आणि यासारखे गणमान्य व्यक्ती. मात्र येथे आपल्याला बरीच जोडपी हातात हात घालून बसलेली दिसतील – यासाठी मात्र आपण इथल्या अतिशय रोमँटिक वातावरणाला जबाबदार धरू शकता. संध्याकाळी, दिवे मंद होतात आणि रेस्टॉरंटचा पर्णाच्छादित हिरवा परिसर एका अतिशय मंत्रमुग्ध वातावरणाची निर्मिती करतो. लोधी – दी गार्डन रेस्टॉरंट उत्कृष्ट लेबनीज, मुघलाई, कॉन्टिनेन्टल व युरोपियन पाककृती सादर करते.
ठिकाण: लोधी रोड
दोघांकरीता किंमत: रु. 2500 (अंदाजे)
प्रणयाची कला समजून घेण्यासाठी स्पॅनिश व्यक्तीवर विश्वास ठेवावा.
नाव जसे आपल्याला चकमा देत आहे, तसेच सेव्हिला हे एक वैशिष्ट्यपूर्ण स्पॅनिश रेस्टॉरंट आहे जे क्लॅरिजेस हॉटेलमध्ये स्थित आहे. येथे दर्जेदार स्पॅनिश लज्जतदार पाककृती सादर केल्या जातात. बजेट काहीसे जास्त आहे हे मान्य असले तरीसुद्धा आपल्या जोडीदाराला आपल्या प्रेमात पाडण्याकरीता आउटडोअर रेस्टॉरंटमधील हे एक आदर्श ठिकाण आहे. मंद दिवे, उबदार बैठकव्यवस्था ज्यामध्ये जागेचा उत्कृष्ट वापर केल्याने खासगीपणा जपला जातो व जवळीक निर्माण होण्यास पार्श्वभूमीवर वाजणारे स्पॅनिश संगीत कारणीभूत ठरते. अशा या वातावरणात कुणी भारावून न गेले तरच नवल. यात लज्जतदार तापस मेन्यू व विविध कॉकटेल्सची भर पडते आणि आपल्याला एका परिपूर्ण डेटचा अनुभव मिळतो.
ठिकाण: दी क्लॅरिजेस हॉटेल, औरंगजेब रोड
दोघांकरीता किंमत: रु. 4000 (अंदाजे)
जर आपल्याला आपल्या बजेटमध्ये अविस्मरणीय डेट साजरी करायची असेल तर सॅम्स कॅफेशिवाय इतर कुठेही जाऊ नका. हिप्पी व विद्यार्थ्यांची कायम वर्दळ असलेल्या पहाडगंजमध्ये नेमक्या जागेवर असलेले सॅम्स कॅफे एक आउटडोअर रेस्टॉरंट आहे जेथे गंभीरतेचा लवलेशही नसतो. येथे आपल्याला सर्व प्रकारचे लोक दिसतील, प्रवासाच्या कल्पनांचे आदानप्रदान करणाऱ्या प्रवाशांपासून तर मित्रांचे घोळके व डेटवर आलेली जोडपी येथे हमखास आढळतात. मेन्यू खूपच किफायतशीर आहे आणि आपल्या खिशावर फार काही ताण न देता येथे आपण मोठ्या समूहाचे खाणे-पिणे आरामात करू शकता. मात्र सॅम्स कॅफे रात्रीच जिवंत झालेले दिसते. कंदीलाच्या मंद प्रकाशात पहाडगंजचा कोलाहल आपल्या सभोवताल असतो तेव्हा सॅम्स कॅफे एक विलक्षण आश्रयस्थान बनते जेथे आपण एका अविस्मरणीय नाइट आउटचा अनुभव घेऊ शकतो (मग सोबत कुणीही का असेना!).
ठिकाण: पहाडगंज
दोघांकरीता किंमत: रु. 1000 (अंदाजे)
तर, दिल्लीच्या यापैकी कुठल्या आउटडोअर रेस्टॉरंटला आपण भेट देणार आहात?
Snowy Hills, River Streams & A Beastly Myth: Add Sironah To Your Adventure Bucket List!
MakeMyTrip Blog | Nov 22, 2021
Travel Implants Vs Robust Online Travel Platform: The Rise of Online Adaptation
MakeMyTrip Blog | Sep 16, 2021
Need of the Hour: An Agile Platform Supporting Dynamic Travel Requirements
MakeMyTrip Blog | Sep 9, 2021
Global Travel Mandates: Boon or Hindrance?
MakeMyTrip Blog | Sep 9, 2021
Implementing ERP and HRMS for Business Travel
MakeMyTrip Blog | Sep 9, 2021
Technology Is the Future Of Business Travel in India: Are You Still on an Offline Model?
MakeMyTrip Blog | Aug 24, 2021
Credits in Travel: Why Businesses Should Care?
MakeMyTrip Blog | Nov 22, 2021
Automated Billing in Travel - Why Businesses Should Care?
MakeMyTrip Blog | Aug 24, 2021
Winter Wonders: These 5 Hotels are Best Enjoyed When it’s Freezing Outside
Arushi Chaudhary | Dec 20, 2019
Best Resorts for Celebrating a White Christmas
Protima Tiwary | Dec 16, 2019
5 Sunny Destinations in India to Break Away from the Cold
Maryann Taylor | Dec 6, 2019
Best 2016 Year-End Holiday Deals Across the World!
Mayank Kumar | Apr 5, 2017
Planning a Christmas Holiday? Here's Where You Should Go!
Namrata Dhingra | Nov 5, 2019
6 Epic Outdoor Restaurants in Delhi to Visit This Winter
Mikhil Rialch | Sep 24, 2018
Head Over for The Perfect Northern Lights Experience!
Nidhi Dhingra | Sep 24, 2019
Holidays under 10k This January for an Exciting Start to the Year
Namrata Dhingra | Apr 11, 2022