जेव्हा सर्वच रस्ते रोमकडे येत असतात तेव्हा साहजिकच आहे ते इटलीमधील सर्वात महागडे शहर असेल. स्मारके आणि संग्रहालयांचे प्रवेश शुल्क महाग आहे आणि पैसा सध्या ज्याप्रमाणे घरंगळलेला आहे, त्यानुसार कोलोसियम, व्हॅटिकन म्युझियम (ज्यामध्ये सिस्टीन चॅपेलचा समावेश होतो) आणि व्हिला बोर्गीस सारखी महत्त्वाची स्थळे बघण्याकरिता चार जणांच्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणावर बचत खर्च करावी लागणार हे उघड आहे. मात्र, ते बहुमूल्य युरो खर्च करण्याऐवजी या शहरामध्ये करण्यासारख्या बऱ्याच काही गोष्टी आहेत. रोममध्ये करण्यासारख्या 5 नि:शुल्क गोष्टींची यादी आम्ही येथे देत आहोत:
निश्चितच, पियाझ्झा सॅन पिट्रो आणि दी बॅसिलिका डी सॅन पिट्रो हे व्हॅटिकन सिटीमध्येच आहे, मात्र जगातील सर्वांत लहान शहर हे रोमच्या अगदी केंद्रभागी आहे! बर्निनीद्वारा डिझाईन करण्यात आलेला आकर्षक चौक सर्वात पवित्र कॅथोलिक स्थळाकडे घेऊन जातो. नवनिर्मितीच्या काळातील हे चर्च भव्यतेने सजवण्यात आले आहे आणि येथे मायकल अँजेलोची एक अमर कलाकृती दी पीटा सुद्धा आहे. कृपया ड्रेस कोडचे पालन करावे – खांदे उघडे ठेवू नये, शॉर्ट व मिनिस्कर्ट घालू नये आणि हे नियम इटलीमधील सर्वच चर्चसाठी लागू होतात.
थ्री स्ट्रीट्सच्या जंक्शनवर असलेले भव्य फोंटाना डी ट्रेव्ही हे रोममधील सर्वात मोठे कारंजे आहे आणि जगातील सर्वात प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे. दिवसाच्या प्रत्येक तासाला पर्यटकांनी गजबजलेल्या या ठिकाणी खालच्या पायरीवर जाणे म्हणजे काहीसा संघर्षच असतो, खालच्या पायरीवर कारंज्याकडे पाठ करून उभे राहा आणि आपल्या डाव्या खांद्यावरून एक नाणे मागे फेका – या प्रकारे, आपण पुन्हा या शहरात परत याल हे निश्चित होते! कारंज्याला दिवसा लवकर आणि पुन्हा सूर्यास्ताच्या वेळी भेट देण्याचा प्रयत्न करा. रात्री कारंजे प्रकाशमान केले जातात, ज्यामुळे त्याला सोनेरी झळाळी मिळते व शिल्पकृती जिवंत झाल्यासारख्या दिसतात.
रोममध्ये बरेच प्रसिद्ध पियाझ्झा आहेत जसे पियाझ्झा नावोना, पियाझ्झा डेल पोपोलो आणि कॅम्पो डे फिओरी. मात्र, मायकल अँजेलोने डिझाईन केलेला 16व्या शतकातील पियाझ्झा सर्वात विलक्षण आहे – त्यामध्ये काय आहे यासाठी नव्हे तर तो कुठल्या दिशेने आहे यासाठी. पियाझ्झाकडे जाणाऱ्या कॅपिटोलिन डोंगराच्या पायऱ्या चढून जा आणि आपल्या नजरेस प्राचीन रोम दिसेल – मंदिरे, रोमन फोरम यांचे भग्नावशेष आणि त्याही पलिकडे पार्श्वभूमीवर उभे असलेले भव्यदिव्य कोलोसियम.
या चर्चच्या मूळ नावाने जीभ पूर्णपणे वेडीवाकडी होते – चेईसा दी सँटा मारिया डेल्ला काँसेझिओन डेई कॅप्पूचिनी किंवा दी चर्च ऑफ अवर लेडी ऑफ द कन्सेप्शन ऑफ द कॅपूचीन्स. 17व्या शतकातील हे चर्च पियाझ्झा बार्बेरिनी आणि दी ट्रेव्ही फाऊंटन जवळील विया वेनेटो (1960मधील फेलिनीच्या ला डोल्स विटा चित्रपटाने प्रसिद्धिस आलेले) मध्ये वसलेले आहे. चर्चचा आंतरिक भाग खूपच प्रेक्षणीय असला तरी सुद्धा कॅपूचीन क्रिप्ट बघणे जास्त रोमांचक आहे. जवळपास 4,000 कॅपूचीन फ्रायर्सची हाडे येथे विसावलेली आहे आणि त्यांना एका मोठ्या शिल्पकृतीमध्ये एकत्रित करण्यात आले आहे. पाचपैकी प्रत्येक क्रिप्ट्समध्ये वेगवेगळ्या हाडांची शिल्पकृती आहे – हे स्थळ त्यामुळे काहीसे चमत्कारिक बनवलेले आहे!
टिवर किंवा टीबर नदी रोममधून वाहते आणि नदीच्या दुसऱ्या बाजूच्या शहराच्या भागाला (शब्दश:) ट्रॅस्टेवर म्हटले जाते. हा फॅशनेबल भाग म्हणजे चिंचोळ्या गल्ल्या, एकमेकांत गुंतलेले रोड, सुंदर बगिचे, असंख्य चर्च आणि उत्कृष्ट रेस्टॉरंट यांचे जाळे आहे. एक नकाशा घ्या किंवा स्वत:ला रोमच्या या मध्ययुगीन भागामध्ये हरवून टाका.
या चिरंतन शहराला भेट देण्यासाठी तुम्ही तयार आहात का? मग आमच्या इटली पॅकेजेसकडे एक नजर फिरवा आणि रोमच्या फ्लाईटची तिकीटे बुक करा.
Book Your Flight to Rome Here!
Also read:
http://www.makemytrip.com/blog/when-in-rome
Unveiled: A Line-up of Exciting Events in Abu Dhabi!
Surangama Banerjee | Jul 3, 2025
5 Off-the-grid Places You Need to Visit with the Oppo Reno14
Tanya Sharma | Jul 2, 2025
Why Oppo Reno14 is the Perfect Travel Companion
Tanya Sharma | Jul 2, 2025
Experience the Wild Heart of Northern Australia: Darwin, Litchfield, and Katherine!
Swechchha Roy | Jun 10, 2025
Experience the Soul-Stirring Treasures of Kakadu National Park
Swechchha Roy | May 26, 2025
Drive, Chip and Putt in UAE’s Capital—Abu Dhabi!
Surangama Banerjee | May 1, 2025
Discover the Spiritual Heart of Australia—Uluru!
Niharika Mathur | May 1, 2025
Embark on a Spicy & Saucy Adventure Through Queensland’s Tastiest Corners!
Surangama Banerjee | Apr 10, 2025