सुट्टी म्हणजे विविध यात्रेकरूंकरिता विविध गोष्टी करणे होय, मात्र या सर्व गोष्टी मेंदूला ताजेतवाने करण्यासाठी, शरीराला शिथिल करण्यासाठी आणि दैनंदिन जीवनाचा एकसुरीपणा घालवण्यासाठी केल्या जातात. आपल्या सर्वांना ताण घालवणारी आरामदायक विश्रांती हवी असते, जेथे आपण लक्झरीचा पुरेपूर आनंद घेऊ शकतो, ताज्या हवेत भटकंती करू शकतो, स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेऊ शकतो किंवा झोपाळ्यावर मस्तपैकी ताणून देऊ शकतो.
येथे आम्ही भारतातील आघाडीच्या 6 रिसॉर्टची यादी देत आहोत जेथे विश्रांती घेण्यासाठी आपण अवश्य भेट द्यायला हवी.
निसर्गाच्या कुशीतील अनोखे स्थळ तमाराचे स्थान भारतातील सर्वात रोमँटिक रिसॉर्टमध्ये आहे आणि त्याला कारणेही तशीच आहेत. शहराच्या सिमेंटच्या जंगलापासून फार दूरवर असलेले आणि वेलदोड्याच्या बागांमधील निसर्ग पदभ्रमणाकरिता प्रसिद्ध असलेले तमारा आपल्या जीवलगासोबत काही काळ शांतपणे एकत्र घालवण्यासाठी आदर्श असे स्थळ आहे.
जवळचे शहर: बंगळुरू
वैशिष्ट्य: ‘भारतातील आघाडीचे 20 रोमँटिक रिसॉर्ट’ या काँड नास्टच्या यादीमध्ये सामिल आहे.
विशेष अनुभव: कस्टमाईज कॉफी पॅक्स, निवडक पवित्र रूद्राक्ष बेरीज, विस्तीर्ण कब्बीनकड इस्टेटमध्ये पिकनिक, धबधब्याशेजारी कँडल लाईट डिनर
भोजन: दी फॉल्स (जैविक बगिच्यामधील घटकांचा वापर करणारे विविध-खाद्यपदार्थांचे रेस्टॉरंट), दी डेक (चीक लाँज बार)
कोणासाठी: जोडपी
जवळचा विमानतळ: म्हैसूर (रिसॉर्टपासून 3 तासांच्या अंतरावर)
अंदाजे खर्च: प्रति रात्र रु. 14,000 पासून सुरू.
वायनाडच्या हिरव्यागार डोंगरावर वसलेले अनोखे इको-फ्रेंडली बानासुरा हिल रिसॉर्ट हे पूर्णपणे चिखल, बांबूचे फर्नीचर आणि नारळाच्या डहाळ्यांपासून बनलेल्या छपराने बनवण्यात आले आहे. 35 एकर जागेत चहा व काजूच्या बागा, पक्षी निरीक्षणाची ठिकाणे आणि खळाळते ओढे यांनी सुसज्ज असलेले हे रिसॉर्ट आपल्याला अगदी निसर्गाला कुशीतच घेऊन जाते.
जवळचे शहर: कोची
वैशिष्ट्य: युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमधील पश्चिमी घाटांमधले व भारताचे एकमेव ‘माती’चे रिसॉर्ट.
विशेष अनुभव: शेकोटीच्या संगे गाणे आणि खेळांनी भरलेली रात्र, वायनाडच्या सर्वात उंच चाम्ब्रा कळसावर ट्रेकिंग, आदिवासी कारागिरांनी बनवलेल्या भेटवस्तू आणि हस्तशिल्प.
भोजन: गुआडुआ, बांबू रेस्टॉरंट (आरोग्यपूर्ण भारतीय भोजन, पारंपारिक केरळी मेजवानी).
कोणासाठी: निसर्गप्रेमी, जोडपी.
जवळचा विमानतळ: कालिकत (रिसॉर्टपासून 3 तासांच्या अंतरावर).
अंदाजे खर्च: प्रति रात्र रु.8,900 पासून सुरू.
Book Your Stay at Banasura Hill Resort
समुद्रकिनाऱ्यावरच्या डच किल्ल्याच्या अवशेषांवर बांधलेले रिसॉर्ट विवांता बाय ताज – फिशरमन्स कोव्हची रचना बाह्य सौंदर्य आत सादर करण्याकरिता केलेली आहे. समुद्रकिनाऱ्यावरील लांब भटकंती, लॉबीतील लाईव्ह संगीत, झोपाळ्यावर पुस्तक वाचण्याचा आनंद – हे वाचूनच पूर्ण शांतीचा अनुभव घेतल्यासारखे वाटत आहे ना? विवांता बाय ताज म्हणजे सूर्यकिरण, वाळू आणि समुद्राच्या थंड हवेचा एक मनमोहक संगम आहे.
जवळचे शहर: चेन्नई
वैशिष्ट्य: सिग्नेचर जीवा स्पा आणि थ्री स्पेशलिटी रेस्टॉरंट
विशेष अनुभव: कॅटमरानमध्ये बंगालच्या उपसागराची भटकंती, समुद्राच्या साक्षीने वॉच टॉवरवरील कस्टमाईज फोर-कोर्स मील, नवीनच जन्मलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांचे निरीक्षण, खोल समुद्रातील मासेमारी
भोजन: बे व्ह्यू (सीफूड रेस्टॉरंट), अप्पर डेक (बंगालच्या उपसागराच्या दिशेने असलेले मेडिटेरेनिअन रेस्टॉरंट), सीगल (सर्व वेळ भोजन, विविध-खाद्यपदार्थ), अँकर बार (ताज्या फळांचे कॉकटेल आणि काँटिनेन्टल मेजवानी), सन बर्स्ट (संकन पूल बार)
कोणासाठी: समुद्रकिनाऱ्यांची आवड असणारे आणि ‘स्वत:’साठी काही काळ व्यतित करण्याची इच्छा असणार्यांसाठी
जवळचा विमानतळ: चेन्नई (रिसॉर्टपासून 1 तासाच्या अंतरावर).
अंदाजे खर्च: प्रति रात्र रु. 9,450 पासून सुरू.
Book Your Stay at Vivanta by Taj – Fisherman’s Cove
जर मुलांनी सुट्टीकरिता घर दणाणून सोडले असेल तर त्यांना पार्क हयात गोवामध्ये घेऊन जा. त्यांना अनोख्या कँप हयातमध्ये मौजमजा करीत आपला वेळ घालवता येईल. येथे 5 ते 12 वर्षांपर्यंतच्या मुलांकरिता पॉटरी क्लासेस, मुव्ही रुम, ग्रंथालय, स्विमिंग पूलावर वॉटर स्लाईड आणि बरेच काही आहे.
जवळचे शहर: मुंबई
वैशिष्ट्य: काँड नास्ट ट्रॅव्हलर इंडिया रिडर्स, यात्रा पुरस्कार 2014, द्वारे पहिल्या क्रमांकावरचे ‘भारतातील लोकप्रिय आरामदायक हॉटेल’ म्हणून गौरवलेले, पुरस्कार-प्राप्त सेरेनो स्पा
विशेष अनुभव: कूकिंग क्लासेस, जुन्या गोवन खेड्याला भेट, बोगमालो बीचवर स्कूबा डायव्हिंग, मांडवीमध्ये सनसेट क्रूज
भोजन: कासा सरीता (सिग्नेचर विशेष भोजनाचे गोवन रेस्टॉरंट)
कोणासाठी: कौटुंबिय, समुद्रकिनाऱ्यांची आवड असणारे
जवळचा विमानतळ: दाबोलिम विमानतळ (रिसॉर्टपासून 15 मिनिटे)
अंदाजे खर्च: प्रति रात्र रु. 7,700 पासून सुरू.
Book Your Stay at Park Hyatt Resort and Spa
चहाच्या बागांमधील 70 वर्षे जुना बंगलो वेलकम हेरिटेज थेंगल मॅनोर हे आसामचे गाव जालूकोनीबारी येथे राजेशाही वास्तव्याचा आनंद प्रदान करत आहे. स्वच्छ हिरवेगार लॉन, क्लासिकल पोर्टिको आणि जुन्या काळच्या फर्नीचरने सुसज्जित हा राजेशाही प्रासाद वसाहतकालीन युगाची आठवण आहे.
जवळचे शहर: कोलकाता
वैशिष्ट्य: गावातील वैशिष्ट्यपूर्ण वास्तव्य, जे मागील काही दशकांमध्ये जरासुद्धा बदललेले नाही
विशेष अनुभव: मासेमारीच्यासहली, कारागिरांना काम करताना बघणे, चायनिज चेकर्स आणि स्क्रॅबलसारखे खेळ
भोजन: इन-हाउस रेस्टॉरंट (आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ ज्यामध्ये पारंपारिक उत्तर-पूर्व भागाची मेजवानी सामिल आहे)
कोणासाठी: चहाप्रेमी, काही काळ एकट्याने राहण्याची इच्छा असलेले
जवळचा विमानतळ: जोरहाट विमानतळ, आसाम (रिसॉर्टपासून 15 मिनिटांच्या अंतरावर).
अंदाजे खर्च: प्रति रात्र रु. 12,900 पासून सुरू
Book Your Stay at Thengal Manor
केरळच्या सुस्त बॅकवॉटर्सचा आनंद घेण्याकरिता आदर्श अशी ही हाउसबोट बऱ्याच पर्यटकांच्या बकेट लिस्ट मध्ये आहे. देवांच्या स्वत:च्या देशात पारंपारिक केरळी हाउसबोटीमधील वास्तव्य म्हणजे एक रोमँटिक, आरामदायक आणि या सम हाच असा अनुभव आहे.
जवळचे शहर: कोची
वैशिष्ट्य: चकाकत्या जलमार्गांपासून तर उष्णकटिबंधीय हिरवळीपर्यंत, सेंट क्रिस्पीन हेरिटेज हाउसबोटीमधील वास्तव्य हे निसर्गाचे लपलेले सौंदर्य बघण्याकरिता आदर्श असा मार्ग आहे
विशेष अनुभव: स्थानिक भोजनाचा आनंद घ्या, बॅकवॉटर्समध्ये भटकंती करा
भोजन: ताजेतवाने करणाऱ्या स्वागतपर ड्रींकपासून तर लज्जतदार सीफूडपर्यंत, केरळच्या ताज्या खाद्यपदार्थांचा आनंद घेण्याची ही संधी आपल्याकरीता आहे
कोणासाठीः जोडपी.
जवळचा विमानतळ: कोची (कोट्टयमपासून 2 तास 30 मिनिटांच्या अंतरावर)
अंदाजे खर्च: प्रति रात्र रु. 21,250 पासून सुरू
Book Your Stay at St Crispin Heritage Houseboat Kottayam
*कृपया लक्षात घ्या की सर्व दर बदलले जाऊ शकतात.
Mayank Kumar Follow
Prefers Bukowski and Gulzar over Shakespeare and Tagore. And nights over daytime. Possesses wit that offends more than it impresses. Anti-social and friendly in the same breath. Miniature souvenir and stationery hoarder. Desperately trying to bring being nice in vogue.
Escape into the Offbeat Wilderness of Goa!
Pooja Akula | Mar 10, 2021
7 Breathtaking Pool Villas to Book Near Goa!
Sudip Dey | Nov 20, 2020
A Goa Trip Gone Crazy- Water Sports Edition!
Renita Sharel Pereira | Sep 11, 2020
Our Celebratory Town Hall in Goa Right before the Lockdown!
Amrita Tripathi | May 29, 2020
Missing Our Romantic Moments in Goa!
Namita Dave | Jan 20, 2023
College Trip to Goa through My Camera Lens!
Amlan Ghosh | Jan 20, 2023
A List of Must-visit Locales in North Goa for Couples
MakeMyTrip Holidays | Jan 20, 2023
Top Places to Visit in Goa Other than Beaches
MakeMyTrip Holidays | Mar 30, 2022
Unveiled: A Line-up of Exciting Events in Abu Dhabi!
Surangama Banerjee | Jul 3, 2025
5 Off-the-grid Places You Need to Visit with the Oppo Reno14
Tanya Sharma | Jul 2, 2025
Why Oppo Reno14 is the Perfect Travel Companion
Tanya Sharma | Jul 2, 2025
Experience the Wild Heart of Northern Australia: Darwin, Litchfield, and Katherine!
Swechchha Roy | Jun 10, 2025
Experience the Soul-Stirring Treasures of Kakadu National Park
Swechchha Roy | May 26, 2025
Drive, Chip and Putt in UAE’s Capital—Abu Dhabi!
Surangama Banerjee | May 1, 2025
Discover the Spiritual Heart of Australia—Uluru!
Niharika Mathur | May 1, 2025
Embark on a Spicy & Saucy Adventure Through Queensland’s Tastiest Corners!
Surangama Banerjee | Apr 10, 2025