हॉटेल्स जे चित्तथरारक वॉटरस्पोर्ट सादर करतात

Chandana Banerjee

Last updated: Jul 19, 2017

Author Recommends

Do

Hire a bicycle and explore the Neil Island for a totally different experience

Shop

Shop for exquisite bags and travelling cases at Nappa Dori, a boutique on Ashwem Beach in Goa

Click

Trek to the Chembra Peak, the highest point in the Wayanad Hills for some amazing photos

Eat

For the best French Toast on the planet, head to Kashi’s Art Cafe in Cochin

Events

The CariToon Kochi 2017 is a mega cartoon and caricature event being hosted in the city on May 04, 2017

Want To Go ? 
   

हो, पुन्हा वर्षाचा तोच काळ आलेला आहे! उन्हाळी महिन्यांची चाहूल लागलेली असताना समुद्रकिनारी किंवा तलावाच्या काठी असणाऱ्या रिसॉर्टवर साहसी वॉटरस्पोर्टकरिता धूम ठोकण्यासाठी हा योग्य हंगाम आहे. तर आपला स्विमसूट आणि सरोंग पॅक करा आणि तळपत्या सूर्यामध्ये मौजमजा करण्यासाठी खालीलपैकी एका ठिकाणी प्रयाण करा!

सिल्व्हर सँड बीच रिसॉर्ट, नील बेट

silver-sand-beach-resort-neil-island

अजूनही अस्पर्श असलेल्या नील बेटावरील बीच क्रमांक 5 वर वसलेला सिल्व्हर सँड बीच रिसॉर्ट आपल्या पाहुण्यांना विलासी व आरामदायक, समुद्रकिनाऱ्यावरचे कॉटेज सादर करतो, जे स्थानिक वास्तुकला शैलीने प्रेरित आहेत आणि पर्यावरण अनुकूल व रिसायकल केलेल्या सामग्रीपासून बनवण्यात आले आहे. आपले वास्तव्य येथे आरामदायक असेलच, त्यासोबत साहसी उपक्रम असतील जे आपल्या अॅड्रेलीनला पम्प करतील.

विशेष सूचना: बेटाच्या आजूबाजूचा परिसर समुद्री जैव-वैविध्याने नटलेला असल्याने जर आपल्याला स्नोरकेलिंग व स्कूबा-डायव्हिंग करायचे असेल तर या रिसॉर्टमध्ये वास्तव्य करणे आवश्यकच आहे. रिसॉर्टमधील डाइव्ह सेंटर सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी दिवसाच्या ट्रीप आणि डायव्हिंगचे अभ्यासक्रम सादर करतात. आपण काला पथेरच्या जंगलात ट्रेकसाठीही जाऊ शकता, स्थानिक कोळी लोकांसोबत फिशिंगचा आनंद घेऊ शकता आणि पांढऱ्याशुभ्र समुद्रकिनाऱ्यांवर लांब भटकंती करू शकता.

प्रारंभिक किंमत: रु. 7,612 प्रति रात्र

ठिकाण: नील बेट, अंदमान आणि निकोबार बेटे  

Book Your Stay at Silver Sand Beach Resort, Neil Island!

हॉलिडे इन रिसॉर्ट, गोवा

holiday-inn-resort-goa

गोव्यामधील मोबोर बीचवर वसलेले हॉलिडे इन रिसॉर्ट आपल्याला समुद्राच्या अद्भूत दृश्यासह 5 स्टार आराम प्रदान करतो. आधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 203 खोल्यांपैकी काहीमध्ये तर खासगी जॅकुझी आहे आणि काहींचा पोर्च बगिच्यामध्ये उघडत आहे. जेवणासाठी विविध रेस्टॉरंटची श्रृंखला उपलब्ध असल्याने आपला गोव्याचा हॉलिडे नक्कीच अविस्मरणीय होणार आहे.

विशेष सूचना: बीचवर मौजमस्ती करताना त्यामध्ये आणखी भर पडली तर? बीच ग्रील हे बीचवरचे रेस्टॉरंट आपल्याला नेमके तेच सादर करीत आहे! आपण खासगी जेवणाचा सुद्धा अनुभव घेऊ शकता, जेथे आपण आपल्या जीवलगासोबत कँडललाईट डिनरचा आनंद घेत असताना समुद्राच्या थंडगार लाटा आपल्या पायांना स्पर्श करीत असतील.

प्रारंभिक किंमत: रु. 8,166 प्रति रात्र

ठिकाण: कॅवेलोस्सिम, सालसेट, मोबोर बीच, गोवा

Book Your Stay at Holiday Inn Resort, Goa!

शारोय रिसॉर्ट, वायनाड

sharoy-resorts-wayanad

बानासुरा सागर डॅमच्या डोंगराच्या उतारावर वसलेले आणि भव्य बानासुरा पर्वत रांगांची पार्श्वभूमी लाभलेले वायनाड येथील शारोय रिसॉर्ट हे निसर्गप्रेमींकरिता अवश्य भेट देण्यासारखे ठिकाण आहे. रिसॉर्टमधील 29 सूईट्स व व्हिला हे अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आहेत आणि आसपासच्या दऱ्या-खोऱ्यांचे नयनरम्य दृश्य सादर करीत आहे. निसर्गाच्या या नंदनवनात लज्जतदार मेजवानीचा आनंद घ्या, ट्रेकिंगचा आनंद घ्या किंवा बोटिंग करताना तलाव व परिसरातील पर्वतांचे निसर्गसौंदर्य पाहा.

विशेष सूचना: जर आपल्याला खरोखरंच टवटवीत करणारा अनुभव घ्यायचा असेल तर रिसॉर्टच्या ब्लू लगून या स्विमिंग पूलामध्ये स्वत:ला झोकून द्या. तो बानासुराच्या बॅकवॉटर्स सोबत एकत्र झाला आहे व येथून आपण दूरवरच्या डोंगरांचे निरीक्षणही करू शकता.

प्रारंभिक किंमत: रु. 6,906 प्रति रात्र

ठिकाण: बायबल लँड पोस्ट, मंजूरा, वायनाड जिल्हा, कल्पेट्टा, केरळ

Book Your Stay at Sharoy Resort, Wayanad!

विवांता बाय ताज – मलबार, कोचीन

vivanta-by-taj-malabar-cochin

कोचीन येथील विलिंग्डन बेटावरील विवांता बाय ताज – मलबारमध्ये वास्तव्य करून आपला हॉलिडे थाटात घालवा. त्यांच्या कुठल्याही आधुनिक खोल्यांमध्ये राहा जेथून कोचीन बंदराचे विहंगम दृश्य नजरेस पडते, इन-हाउस रेस्टॉरंटमध्ये स्थानिक व जागतिक मेजवानीचा आनंद घ्या व शहरामध्ये भटकंती करण्यापासून तर जीव्हा स्पामध्ये विश्रांती घेण्यापर्यंत चिक्कार उपक्रमांमध्ये सहभागी व्हा.

विशेष सूचना: येथे असताना आपण ताज सिन्नामोन कोस्ट या त्यांच्या लक्झरी याचवर नौकानयन करण्याची संधी घेऊ शकता. स्वादिष्ट सीफूड जेवणाचा आनंद घेताना तीन तास बॅकवॉटर्सवर क्रूजचा आनंद घ्या. जर आपण रोमँटिक सनसेट ट्रीप निवडली असेल तर क्रूजवर कूकीज, मफीन्स व सँडविचसोबत अस्सल इंग्लिश हाय टी चा आनंद घेऊ शकता.

प्रारंभिक किंमत: रु. 11,603 प्रति रात्र

ठिकाण: विलिंग्डन बेट, कोची, केरळ

Book Your Stay at Vivanta By Taj- Malabar, Cochin!

More Travel Inspiration For Goa