आजच्या आधुनिक युगामध्ये व्यस्त जीवनशैलीने प्रत्येकाला हळू हळू आपल्या ताब्यात घेतले असल्याने तणाव हलका करण्याची आणि ध्यानधारणा करण्याची प्रत्येकालाच आत्यंतिक गरज उत्पन्न झाली आहे. प्रत्येक बाबतीत एक खरा चिकित्सक असलेल्या योगामध्ये आपल्या इंद्रियांना टवटवीत करण्याची आणि आपल्या शरीराला आरोग्य व नवचैतन्य प्रदान करण्याची महान शक्ती आहे. योगाचे फायदे सर्वसमावेशक आणि व्यापक आहेत. जगभरातून प्रत्येकाला भारतात यायचे आहे आणि आपल्या आत्म्याशी तादाम्य साधायचे आहे. आपला देशही विविध शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय योग उत्सव आयोजित करून त्यांच्या या इच्छेला प्रतिसाद देत आहे. येथे आम्ही भारतातील आघाडीच्या 5 योग केंद्रांची नावे देत आहोत जेथे निश्चितच आपल्या जीवनाला नवीन कलाटणी देणारा अनुभव आपल्याला मिळेल.
तामिळनाडूमधील या शांतचित्त शहराला भेट देऊन आपल्या वर्षाची सुरुवात करण्याचा आश्चर्यकारक मार्ग शोधा. प्रत्येक वर्षी 1 मार्च ते 7 मार्चपर्यंत आयोजित केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग उत्सवाकडे बरेचशे योगप्रेमी आकर्षित होतात, जे स्वत:चा शोध घेण्याकरिता आणि स्वत:मध्ये स्थिरचित्तता आणि शांती मिळवण्याकरिता येथे येतात. आगंतुक येथे विविध आसनांद्वारे योग आसनांच्या योग्य मुद्रा, आहार-योजना आणि श्वास घेणे व सोडण्याचे तंत्र जाणून घेतात. पाँडिचेरी पर्यटन विभागाकडून हा नवीन वर्षाचा एक विलक्षण उपहार आहे ज्यामध्ये शांती, प्रेम, प्रकाश, सामर्थ्य व आनंद सामावलेला आहे. स्वत:ला पुन्हा शोधण्याकरिता या आणि आमच्या आश्चर्यकारक पॅकेजेस द्वारे पाँडिचेरीला भेट देऊन नवीन वर्षाची अद्भूत सुरुवात करा!
Book Your Flight to Chennai Now!
उत्तराखंड पर्यटन उपक्रमाचे आयोजन ऋषिकेशमधील परमार्थ निकेतन आश्रमाच्या सहयोगाने केले जाते, हा वार्षिक योग उत्सव त्यामध्ये शिकवल्या जाणाऱ्या कुंडलिनी, पॉवर विन्यास, अय्यंगार आणि क्रिया यासारख्या विविध योग शैलींसाठी प्रसिद्ध आहे. संपूर्ण भारतातील आध्यात्मिक गुरु आणि आदरणीय संतांपासून योगाच्या आठ अवयवांविषयी जाणून घ्या! गंगेची शुद्धता आणि निरलसपणा स्वत:मध्ये सामावून घेण्याकरिता मार्चमध्ये साजरा केला जाणारा हा एक आठवड्याचा उत्सव योग्य मार्ग आहे. ऋषिकेशमध्ये असताना गंगेच्या काठावरील नयनमनोहर आरती चुकवू नका. ऋषिकेशला भेट देऊन आध्यात्मिक जागरूकतेच्या वाटेवर आगेकूच करा.
चमकदार निळे पाणी, सोनेरी वाळू आणि अगदी चित्रातल्या सारखा मनोहर सूर्यास्त! गोव्याच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर योग व ध्यान-धारणेच्या आसनांचा सराव करीत असल्याची कल्पना करा. अत्याधुनिक सोई-सुविधांनी सज्ज असलेल्या कित्येक योग केंद्रांद्वारे गोवा मोठ्या प्रमाणात भारतीय व विदेशी योगप्रेमींना आपल्याकडे आकर्षित करीत असते. अष्टांग परंपरा हा इथला सर्वात जास्त शिकवला आणि अभ्यासला जाणारा योगप्रकार आहे. आधुनिक काळातील ताण-तणावांना सामारे जाण्याकरिता काही कार्यशाळा व अभिमुखता कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा. गोव्याला भेट देण्याचे आता हे आणखी एक कारण झाले आहे. एक नवचैतन्य जागवणाऱ्या गोवन अनुभवाकरिता आत्ताच सहलीचे प्लॅनिंग करा!
आसन अंडियप्पन कॉलेज ऑफ योग अँड रिसर्च सेंटर सारख्या काही सर्वात जुन्या योग प्रशिक्षण केंद्रांचे घर असलेल्या या महानगर चेन्नईला आध्यात्मिक केंद्राचा साजही चढलेला आहे. योगाविषयी सर्वात विलक्षण, अज्ञात गोष्टी, भारतातील त्याचा आरंभ आणि शेकडो शतकांमध्ये त्याचा कशा प्रकारे विकास झाला हे जाणून घेण्याविषयी येथे भेट द्या. प्राचीन योग सरावाच्या सत्रांमध्ये सहभागी व्हा आणि निसर्गोपचार किंवा योगाच्या प्राचीन सराव अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण घ्या. चेन्नईला भेट द्या आणि जीवनात उत्साहाचा संचार करा!
Book Your Flight to Chennai Now!
भव्य राजवाडे आणि मंदिरांनी सजलेल्या म्हैसूरकडे आता योग अध्ययन आणि योग केंद्रांच्या आकर्षणाने मोठ्या प्रमाणात लोक आकृष्ठ होत आहे. जागतिक पातळीवर अष्टांग परंपरेकरिता प्रसिद्ध असलेले म्हैसूर अध्ययन व आनंद यामध्ये योग्य संतुलन राखण्यास इच्छुक असणाऱ्या सर्व योगप्रेमींना विपुल पर्याय सादर करीत आहे. या पारंपारिक शहराला भेट देण्याची संधी चुकवू नका.
Bhawna Grover Follow
Travel writer by profession, hula hoop dance instructor by coincidence, photographer by interest, and high on life by choice!
Escape into the Offbeat Wilderness of Goa!
Pooja Akula | Mar 10, 2021
7 Breathtaking Pool Villas to Book Near Goa!
Sudip Dey | Nov 20, 2020
A Goa Trip Gone Crazy- Water Sports Edition!
Renita Sharel Pereira | Sep 11, 2020
Our Celebratory Town Hall in Goa Right before the Lockdown!
Amrita Tripathi | May 29, 2020
Missing Our Romantic Moments in Goa!
Namita Dave | Jan 20, 2023
College Trip to Goa through My Camera Lens!
Amlan Ghosh | Jan 20, 2023
A List of Must-visit Locales in North Goa for Couples
MakeMyTrip Holidays | Jan 20, 2023
Top Places to Visit in Goa Other than Beaches
MakeMyTrip Holidays | Mar 30, 2022
10+ Gift Ideas for Raksha Bandhan 2024 to Celebrate the Bond of Siblings!
Pallak Bhatnagar | Jun 25, 2024
12 Best Father’s Day Gift Ideas to Surprise Him!
Sanskriti Mathur | May 28, 2024
Top 11 Places to Celebrate Holi in India 2023
Pallak Bhatnagar | Mar 3, 2023
5 Reasons to Surprise Your Valentine With a Travel Gift Card
Bhavya Bhatia | Jan 18, 2023
Here’s Why Your Dubai Trip Is Incomplete Without a Visit to Expo 2020 Dubai!
Bhavya Bhatia | Feb 3, 2023
10 Country Pavilions That You Shouldn’t Miss at Expo 2020 Dubai!
Bhavya Bhatia | Feb 3, 2023
Krishna Temples in India to Visit for Holi
Neha Sharma | Mar 6, 2020
Unique Places to Celebrate Holi in India
Neha Sharma | Mar 9, 2020