आल्हाददायक वातावरणामुळे बंगळुरू संपूर्ण वर्षभरात नेहमी भेट दिल्या जाणाऱ्या शहरांपैकी एक आहे. याचे सुंदर बाग-बगीचे, राजवाडे, भव्य मंदिर, लोकप्रिय नाइटलाईफ, संगीत समारंभ आणि भरभराटीला आलेला तंत्रज्ञान उद्योग पर्यटक व स्थानिक रहिवाशांना नेहमीच आपल्याकडे आकृष्ट करत आहे. या महानगरामध्ये एक मोहक आकर्षण आहे जे आपल्याला बराच काळ वास्तव्य करण्यास किंवा पुन्हा पुन्हा भेट देण्यास भाग पाडते.
आपण जरी कामासाठी किंवा आरामासाठी प्रवास करीत असाल तरी आपल्या ट्रिपमधून अधिकाधिक लाभ मिळवा व बंगळुरूमधील या किफायतशीर तरीही आरामदायक हॉटेलच्या यादीमधून एकाची निवड आपल्या वास्तव्यासाठी करा -
दक्षिण भारत प्रवास पुरस्कार 2016 च्या “बेस्ट ग्रीन रिसॉर्ट” पुरस्कार प्राप्त हे 4-स्टार हॉटेल किफायतशीर किंमतीमध्ये उत्कृष्ट सजावटीच्या खोल्या व सूट्स प्रस्तुत करीत आहे. याच्या आधुनिक सुविधा, मोफत वाय-फाय, मोफत नाष्टा, स्विमिंग पूल, इनडोअर व आउटडोअर गेम व जिम आणि स्पा सुविधा आरामदायक व आरामशीर मुक्कामाची खात्री प्रदान करतात.
बंगळुरूपासून थोड्याच अंतरावर असलेले व इलेक्ट्रॉनिक सिटी, होसूर इंडस्ट्रिअल हब व बोम्मसंद्राच्या सान्निध्यात असलेले हे हॉटेल विकेंडला सहलीसाठी आणि व्यावसायिक ट्रिप अशा दोन्हींसाठी उपयुक्त आहे. याचे 6 कॉन्फरन्स हॉल आणि प्रशस्त नयनरम्य बगिचे कॉन्फरन्स, लग्न-समारंभ व सामाजिक मेळाव्यांसाठी विपुल जागा व सुविधा प्रदान करतात. रामी गेस्टलाइन निवडीकरीता विविध स्टे पॅकेजेस व डील सादर करीत आहे आणि बुकिंग करताना आगाऊ रक्कम किंवा क्रेडिट कार्डचा तपशील देण्याची गरज नाही. त्यामुळे वास्तव्याचा संपूर्ण आनंद घ्या व चेकआउट करतानाच पेमेंट करा.
स्थान: प्लॉट क्र. 1 आणि 2, केआयएडीबी औद्योगिक क्षेत्र, अत्तीबेले, बंगळुरू
खर्च: रु. 3,500 प्रति रात्रपासून सुरुवात
Book Your Stay at Ramee Guestline Hotel, Bengaluru!Book Your Stay at Ramee Guestline Hotel, Bengaluru!
हे पंचतारांकित बिझनेस हॉटेल व्यावसायिक परिसराच्या मध्यभागी स्थित आहे आणि व्यावसायिक व पर्यटक अशा दोन्हींसाठी सुविधा प्रदान करीत आहे. याच्या उत्कृष्ट आशियाई वास्तुकलेचा आणि भव्यतेचा सुंदर मेळ रूफटॉप स्विमिंग पूल, फिटनेस सेंटर, दुभाषी सेवा, इन-रुम सेफ, अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली व सुनियोजित वाहतूक व्यवस्था यासारख्या आधुनिक सुविधांसोबत घालण्यात आला आहे. येथे एक 24-तास सक्षम असलेले व्यावसायिक केंद्र आहे जे सर्व आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे व बोर्डरुम, बँक्वेट हॉल आहे आणि गझेबो शैलीतील पूल एरिआ सुद्धा आहे जो कॉन्फरन्स, खासगी समारंभ व सामाजिक मेळाव्यांसाठी उपयुक्त आहे.
येथील भोजनाचे विविध पर्याय वापरून बघा. 24x7 विविध खाद्यपदार्थांचे रेस्टॉरंट व कॅफे, वॅट बार आणि एक अस्सल अरबी रेस्टॉरंट आपल्यासमोर विलक्षण चवीचा नजराणा सादर करेल.
ठिकाण: 134, एचएएल एअरपोर्ट रोड, कोडीहळ्ळी, बंगळुरू
खर्च: रु. 4,900 प्रति रात्रपासून सुरुवात
Book Your Stay at Sterlings Mac Hotel, Bengaluru!Book Your Stay at Sterlings Mac Hotel, Bengaluru!
प्रेस्टीज टेक पार्कच्या समोर वसलेले आणि एम्बॅसी टेक व्हिलेज, सेसना टेक पार्क, इकोस्पेस आणि इकोवर्ल्ड सारख्या इतर टेक्नॉलॉजी पार्कपासून काही पावलांच्या अंतरावर असलेले हॉटेल सनरे हे कॉर्पोरेट प्रवाशांसाठी एक आदर्श निवड आहे. येथे खासगी बैठकव्यवस्थेसोबत वातानुकूलित खोल्या, इंटरनेटचा वापर, मोफत ब्रेकफास्ट आणि व्हीलचेअर अॅक्सेस सारख्या आधुनिक सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत व हे आपल्या किफायतशीर किंमतीसाठी लोकप्रिय आहे. सोबतच यामध्ये एक संपूर्ण सुसज्जित फिटनेस सेंटर व नवीनतम तंत्रज्ञान आणि उपकरणांनी सुसज्जित कॉन्फरन्स रुम यांची सुद्धा भर घालण्यात आली आहे.
फेनिक्स हे जागेवरील विविध खाद्यपदार्थांचे रेस्टॉरंट हे एला कार्ट आणि लंच व डिनर बफेट असे सर्वच प्रकार सादर करीत आहे व सोबतच हे सामाजिक मेळाव्यांसाठी एक विलक्षण ठिकाणही आहे. हे बजेट हॉटेल पाळीव प्राण्यांसाठीसुद्धा अनुकूल आहे त्यामुळे आपण कामासाठी किंवा पर्यटनासाठी प्रवास करीत असाल तरीसुद्धा आपल्या केसाळ मित्रांना सोबत घेऊन जा!
स्थान: प्रेस्टीज टेक पार्कसमोर, मारतहळ्ळी आउटर रिंग रोड, काडूबिसनहळ्ळी, बंगळुरू
खर्च: रु. 2,000 प्रति रात्रपासून सुरुवात
Book Your Stay at Hotel Sunray, Bengaluru!Book Your Stay at Hotel Sunray, Bengaluru!
आपल्या मोक्याच्या जागेमुळे हे 3-स्टार हॉटेल सर्व प्रकारच्या प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे. बंगळुरू सिटी जंक्शन रेल्वे स्टेशन आणि दी मॅजेस्टीक बस स्टँडच्या सान्निध्यामुळे महत्वाची आकर्षणे, पर्यटन स्थळे आणि शहराच्या इतर भागांपर्यंत सहजतेने पोहोचता येते. लोकप्रिय दर्गा हझरत तवक्कल मस्तान शाह सहरवर्दीही अगदी समोर आहे.
या बजेट हॉटेलमध्ये निवड करण्यासाठी विविध खोल्यांचा पर्याय उपलब्ध आहे ज्या विविध गरजांच्या अनुरूप आहे व वाय-फाय, फ्लॅट स्क्रीन टीव्ही, डेस्क, बैठक व्यवस्था व बाल्कनी यासारख्या आधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहेत. याशिवाय हॉटेलमध्ये मोफत पार्किंग, लाँड्री सेवा, लाउंज एरिआ व कार्पोरेट आणि सामाजिक समारंभ व मेळाव्यांसाठी दोन बँक्वेट हॉल उपलब्ध आहेत. आपल्या उत्तर भारतीय जेवणाची भूक भागवण्यासाठी येथील उत्तर भारतीय शाकाहारी रेस्टॉरंट रिसालो पराठा हाउसला अवश्य भेट द्या.
स्थान: 415, जुना तालुका कचेरी रोड, हझरत तवक्कल मस्तान दर्ग्यासमोर, उप्पारपेटे, चिकपेठ, बंगळुरू
खर्च: रु. 1,700 प्रति रात्रपासून सुरुवात
Book Your Stay at Hotel Stay Easy Majestic, Bengaluru!Book Your Stay at Hotel Stay Easy Majestic, Bengaluru!
हे कमी खर्चातील हॉटेल फक्त आपल्या किफायतशीर किंमतीकरीताच प्रसिद्ध नाही तर शहराच्या मध्यभागातील आपल्या मोक्याच्या जागेसाठीही प्रसिद्ध आहे. रेल्वे स्टेशन व बस स्टेशन जवळच असल्याने पर्यटन स्थळांपर्यंत सहज पोहोचता येते व तसेच बरेचशे शॉपिंग मॉल व रेस्टॉरंटही जवळच आहेत. काही किरकोळ खरेदी करण्यासाठी जवळच्या मंत्री मॉलमध्ये जा किंवा जवळच्या सम्पिगे थिएटरमध्ये चित्रपट बघा. विशिष्ट दक्षिण भारतीय व्यंजनांची लज्जत चाखण्याकरीता त्याच इमारतीमधील सुप्रसिद्ध मावळ्ळी टिफीन रुम्स (एमटीआर) रेस्टॉरंटला भेट देणे अगत्याचे आहे.
फ्लॅटस्क्रीन टीव्ही, एसी, मोफत वाय-फाय, गरम पाण्याचा शॉवर, इन-रुम सेफ व कामासाठी डेस्क यासारख्या आधुनिक सुविधांसोबतच आयलॉज आरामदायक खोल्या सादर करीत आहे. याच्या स्वच्छता, आरामदायकता व किफायतशीर दरांमुळे हे हॉटेल कौटुंबिक समारंभ आणि मंदिराला भेट देण्याकरीता बंगळुरूला आलेल्या मोठ्या समूहांसाठी परिपूर्ण आहे व सोबत कार्पोरेट प्रवाशांसाठीसुद्धा उपयुक्त आहे.
स्थानः 8 सम्पिगे रोड, मंत्री मॉलजवळ, जीआरटी ज्वेलर्ससमोर, बंगळुरू
खर्च: रु. 2,000 प्रति रात्रपासून
Book Your Stay at iLodge Malleshwaram, Bengaluru!Book Your Stay at iLodge Malleshwaram, Bengaluru!
तर मग कोणाची वाट बघत आहात, आपली बॅग भरा आणि “सस्ता-सुंदर” बंगळुरू फिरण्यासाठी तयार व्हा!
Wow Weekender Hotel Deals You Simply Must Not Miss in Bangalore
Nishtha Bhatnagar | Mar 22, 2018
IPL Turns 10: Catch the Action at These Top 5 IPL 2017 Venues
Hiten Dhameja | Apr 13, 2017
Long Weekend Beach Getaways from Bengaluru
Devika Khosla | Apr 3, 2017
#BloggerContest: A Rocking New Year’s Eve at Taj Gateway, Bengaluru
Mayuri Nidigallu | Apr 3, 2017
Tick these Epic Road Trips from Bengaluru Off Your Bucket List!
Malavika Mandapati | May 28, 2020
Presenting Our Best Picks for a Hillstation Getaway from Bengaluru
Neha Mathur | Sep 24, 2019
Top 10 Places to Visit in Bengaluru
Dinkar Kamat | Aug 1, 2019
Get Your Adrenaline Rush at These Adventure Getaways from Bengaluru
Neha Mathur | Oct 1, 2019
Encounter MP’s Wildlife Wonders at These Wow Jungle Resorts!
Surangama Banerjee | Mar 3, 2020
Experience Seekers Alert! These 7 Dreamy CGH Earth Resorts Are for You
Surangama Banerjee | Dec 26, 2019
Luxury Hotels in New South Wales that Offer the Best Window Views
Namrata Dhingra | Oct 17, 2019
Your Guide to Enjoying the Best Daycation in Delhi NCR!
Devika Khosla | Mar 17, 2020
Live the Luxe Life with an Experiential Stay at the Postcard Hotels!
Tabassum Varma | Aug 9, 2019
Pick These Unconventional Properties, to Holiday in Goa the Postcard Way!
Sunny Mishra | Aug 21, 2019
Whispering Palms Beach Resort Goa: A Dreamy Beachfront Stay
Surangama Banerjee | May 6, 2019
Top Hotels in Navi Mumbai for a Splendid Stay
Tabassum Varma | Apr 30, 2019