मी जेव्हा जेव्हा प्रवास करते तेव्हा तेव्हा माझ्या उत्साहाला सीमा नसते. आणि माझा उत्साह तेव्हाच शिगेला पोहोचतो जेव्हा पर्यटनस्थळी करावयाच्या गोष्टी अगदी नि:शुल्क उपलब्ध असतात. यामुळेच मी ‘करण्यासारख्या नि:शुल्क गोष्टी’ ही श्रृंखला लिहण्यास आरंभ केला व या नि:शुल्क गोष्टींची सुरुवात बँकॉकपासून करीत आहे.
आठवड्याच्या कामाच्या दिवसांमध्ये स. 10 ते सं. 6 दरम्यान व विकेंडला स. 9 ते सं. 7 दरम्यान आपल्या पासपोर्टची एक प्रत दाखवून ‘बँकॉक स्माईल्स बाईक’कडून एक सायकल नि:शुल्कपणे भाड्याने घ्या. आपण त्यांच्या कुठल्याही केंद्रामधून सायकल घेऊ शकता. त्याकरिता रत्तनाकोसिन भागामध्ये पाच आणि नदीपलीकडे सात केंद्रांवर ही सुविधा उपलब्ध आहे. लक्षात ठेवा की, आपण ज्या केंद्रावरून सायकल घेतली आहे, तिथेच आपल्याला ती परत करायची आहे. जर सायकलिंगची आपल्याला आवड नसेल तर आपण शहराचा स्वत: मार्गदर्शन करणारा पदभ्रमण टूर सुद्धा करू शकता.
बँकॉकमध्ये बरेच पार्क आहेत जेथे आपण शांतपणे बसून विश्रांती घेऊ शकता. शहराच्या काही पार्कमध्ये व्यायामाची काही नि:शुल्क यंत्रे सुद्धा आहेत:
चायनाटाऊनला भेट देणे अगत्याचेच आहे. लहान स्टॉल्स, स्ट्रीट फूड आणि सोन्याच्या दुकानांनी गच्च भरलेल्या या जागी उत्साह ओसंडून वाहत असतो. जर आपण फेब्रुवारीच्या दरम्यान चीनी नव-वर्षाकरिता चायनाटाऊनला भेट दिली तर आपण येथील जल्लोष चरम सीमेवर असताना बघू शकता! वट चक्रावत टेम्पल कॉम्प्लेक्समधील गुप्त रहस्य म्हणजे तेथील तीन विशाल मगरी आहेत ज्या आपल्या गडद रंगाच्या तळ्यामध्ये पुढील भक्षाची वाट बघत पहुडलेल्या असतात.
जगातील सर्वात मोठा खुला बाजार म्हणून ओळखले जाणारे चाटुचक विकेंड मार्केट हे 35 एकर जागेवर पसरलेल्या 5,000 स्टॉल्सचे घर आहे, ते सकाळी 9 वाजता उघडते आणि दुपारची जेवणाची वेळ होत पर्यंत येथे चांगल्यापैकी गर्दी जमते. आपण विंडो शॉपिंग केल्यानंतर, काही स्थानिक खाद्यपदार्थांची लज्जत चाखू शकता आणि विश्रांती घेण्याकरिता चाटुचक पार्ककडे प्रयाण करू शकता.
प्राचीन वस्तूंचा विलक्षण साठा असलेल्या या बाजारात आपण भन्नाट आणि विलक्षण वस्तू बघून विस्मयचकित व्हाल, जसे सुपरमॅनचा पुतळा, हत्तीच्या आकाराची कॅरोसल कार, काही जुन्या कार आणि स्थानिक स्वस्त खाद्यपदार्थांसोबतच इतर विचित्र वस्तू येथे बघायला मिळतील. (वेळ: सं. 5 ते मध्यरात्रीपर्यंत, शुक्रवार ते रविवार | पत्ता: काम्फेंग फेट, चाटुचक मार्केटच्या मागे)
बँकॉकमधील आर्टिस्ट हाऊस सारखी खूपच कमी ठिकाणे आहेत जेथे आपण थाई पपेट्री सारख्या नामशेष होणाऱ्या कलेचा आनंद घेऊ शकता. प्रत्येक दिवशी (बुधवार व्यतिरिक्त) दु. 2 वाजता, गोष्ट सांगण्याकरिता या नाजुक बाहुल्यांच्या प्रेक्षणीय हालचाली आपण बघू शकता. सुमारे 600 वर्ष जुना स्तूप आणि भव्य आकाराचे पुतळे असलेले हे ठिकाण बघणे म्हणजेच डोळ्यांकरिता पर्वणीच आहे. (वेळ: स. 10 ते सं. 6 | पत्ता: सोई वट थाँग साला नगरम, फासी चॅरोन, वट कुहासवन मंदिराजवळ)
या गजबजलेल्या शहराच्या केंद्रभागी, बटरफ्लाय गार्डन आणि इनसेक्टीरियम अभयारण्यामध्ये 500 च्या वर फुलपाखरांच्या प्रजाती झाडे व फुलांवर भिरभिरत असतात आणि एक धबधबा नैसर्गिक वातावरणाची शोभा वाढवत असतो. (वेळ: स. 8.30 – सं. 4.30 सोमवार व्यतिरिक्त | पत्ता: चाटुचक मार्केटच्या कोपऱ्यावर, रोटफाई आणि क्विन सिरिकीट गार्डन्सच्यामध्ये)
थायलंडमधील प्रत्येक भागात एक मंदिर आहे. काही ठिकाणी विदेशी लोकांसाठी प्रवेश फी आकारली जाते, मात्र जर आपण लवकर गेलात तर तिकीट खिडकी उघडण्यापूर्वी आपण स्थानिक लोकांमध्ये मिसळू शकता. काही मंदिरे नि:शुल्क आहेत जसे वट मांगकोर्न कमलावट (चायनाटाऊन), वट पाटूम वानरम (सेंट्रल वर्ल्ड प्लाझा शॉपिंग सेंटर समोर) आणि वट इंद्रविहारन (डुसित).
सूर्य मावळताना बघणे नेहमीच उदात्त अनुभव असतो. सुदैवाने, तो नेहमीच नि:शुल्क असतो! मात्र चाओ फार्या नदीच्या मागे असणाऱ्या वट अरूणच्या मागे त्याला अस्त होताना बघणे हा अनुभव काही वेगळाच आहे.
नॅशनल थिएटरमधील नृत्य प्रदर्शन बघणे मुळीच चुकवू नका. चिडलोम स्काय ट्रेन स्टेशनसमोरील आकर्षक ईरावन मंदिरात आपण काहीही पैसे खर्च न करता याचा आनंद घेऊ शकता. मंदिरात भाविकांची गर्दी असते आणि ते मेणबत्त्यांनी उजळून निघालेले असते. धूपाच्या सुगंधाने वातावरण सुगंधित झालेले असते आणि पार्श्वभूमीला थाई संगीत वाजत असते. विशेष म्हणजे, प्रणयामध्ये आनंदाकरिता देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी केले जाणारे हे नृत्यप्रकार प्रार्थनेचेच एक स्वरूप आहे!
बँकॉक कला आणि संस्कृती केंद्र हे बँकॉकमधील सर्वोत्तम नि:शुल्क प्रदर्शन केंद्र आहे. आपण या शहरात असताना कुठले प्रदर्शन सुरू आहे हे जाणून घ्या आणि एक बाह्त (थाई चलन) सुद्धा खर्च न करता आपण याचा आनंद घेऊ शकाल!
सियाम भागातील एमबीके सेंटर बाहेर प्रत्येक बुधवारी सं. 6 वाजता थाई बॉक्सिंग सामना आपण बघू शकता.
वाय-फाय
सेंट्रल वर्ल्ड प्लाझा, सियाम डिस्कव्हरी सेंटर, ईरावन सेंटर आणि शहरातील इतर बऱ्याच मॉल्स, रेस्टॉरंट आणि कॅफेमध्ये नि:शुल्क वाय-फाय उपलब्ध आहे.
पुढच्या वेळेस बँकॉकमध्ये असताना या ‘स्वस्त रोमांचक’ गोष्टींचा आनंद घ्या! जर आपल्याला बँकॉकमध्ये करण्यासारख्या आणखी नि:शुल्क गोष्टी आढळल्या तर त्यांचा या यादीमध्ये समावेश करण्यासाठी आम्हाला कळवण्यास विसरू नका.
Book Your Flight from New Delhi To Bangkok
Mayank Kumar Follow
Prefers Bukowski and Gulzar over Shakespeare and Tagore. And nights over daytime. Possesses wit that offends more than it impresses. Anti-social and friendly in the same breath. Miniature souvenir and stationery hoarder. Desperately trying to bring being nice in vogue.
Thailand for First-time Visitors: The Perfect 7-day Itinerary
Namrata Dhingra | Jan 16, 2025
Quirky Bangkok Hotels That Will Leave You Stumped
Meena Nair | May 23, 2018
List of Countries Offering Visa on Arrival for Indians in 2020
MakeMyTrip Blog | Feb 25, 2020
Bangkok Nightlife: Top 5 Experiences to Grab
Deepa N | Jun 7, 2019
Vedika Anand | Sep 24, 2019
Vedika Anand | Sep 24, 2019
5 Restaurants Where You Can Find Amazing Vegetarian Food in Thailand
Devika Khosla | Sep 17, 2019
Retail Therapy: Hotels Across The World With The Best Malls
Devika Khosla | Apr 3, 2017
14 Days. 3 Cities. Zero Chill: A European Adventure in My 20s
Anisha Gupta | Dec 19, 2025
Milestone Moments and Memorable Escapes in Ras Al Khaimah
Swechchha Roy | Dec 11, 2025
Milestone Moments and Memorable Escapes in Ras Al Khaimah
Swechchha Roy | Dec 11, 2025
Your Guide to an Action-Packed Friends’ Holiday in Ras Al Khaimah
Swechchha Roy | Nov 17, 2025
Your Guide to an Action-Packed Friends’ Holiday in Ras Al Khaimah
Swechchha Roy | Nov 17, 2025
Holidays Made for You (and Everyone You Love) in Ras Al Khaimah
Swechchha Roy | Oct 6, 2025
Travel Light, Shoot Smart: Roshani Shah’s Guide to Travel Photography
Pallak Bhatnagar | Oct 15, 2025
Through the Lens: Capturing Global Wonders with Sony Cameras
Pallak Bhatnagar | Oct 6, 2025