सिंगापूरमधील 48 तास

Devika Khosla

Last updated: Sep 24, 2019

Want To Go ? 
   

या शहरातील सर्व रमणीय गोष्टी पाहण्यासाठी, त्यांची मजा घेण्यासाठी फक्त अठ्ठेचाळीस तासांचा कालावधी निश्चितच पुरेसा असणार नाही. तथापि, खूप काही अनुभवण्यासाठी ही वेळ पुरेशी आहे! प्रेक्षणीय स्थळांच्या भेटी, खरेदीपासून ते खाद्यपदार्थांचा आस्वाद आणि मौजमजा करणे हे सर्वकाही तुम्हाला सिंगापूरमध्ये अनुभवता येईल. पूर्व आणि पाश्चिमात्य संस्कृतींचा सुरेख संगम असलेल्या सिंगापूरची संस्कृती उठावदार आहे. अनुभव करण्यासाठी भरपूर काही असल्याने, सिंगापूरमध्ये 48 तासांमध्ये या गोष्टी तुम्ही अवश्य करू शकाल.    

दिवस 1

चायनाटाऊन

Chinatown-48-hours-in-Singapore

सकाळी चायनाटाऊनसाठी निघा आणि थकव्याला दूर पळवा. शहराच्या सर्वात मोठ्या ऐतिहासिक जिल्ह्यातील चीनी वारशाला जाणून घ्या, कारण यात परंपरा आणि आधुनिकतेचा बेजोड संगम आहे आणि येथील गल्ल्यांमध्ये असते फेरीवाल्यांची वर्दळ व रस्त्यावर हिप बार आणि बुटीक स्टोअर्सच्या बाजूला असतात परंपरेने चालत आलेले व्यवसाय. तसेच चायनाटाऊनमध्ये बुद्ध टूथ रेलिक मंदिर आणि वस्तूसंग्रहाल असल्याने जर तुमच्याकडे वेळ असलाच तर 320 किलो सोन्याने बनलेल्या भव्य स्तूपाला भेट देणे मात्र विसरू नका!

सिंगापूर रिव्हर क्रूज

चायनाटाऊनच्या फेरफटका मारल्यानंतर सिंगापूर रिव्हर क्रूजसाठी तुमचा मोर्चा बोट क्वेकडे वळवा. बोटीतून फिरत असताना उत्तुंग आधुनिक इमारतींसोबत वसाहतकालीन नमुनेदार इमारतीही डोळ्यांचे पारणे फेडतील. सिंगापूरच्या प्रशस्त पुलांबरोबर मरलायन आणि एस्प्लानेडसारख्या ऐतिहासिक स्थळांच्या दर्शनाने भारावून जाल.

मरलायन पार्क 

Merlion-Park-48-hours-in-Singapore

सिंगापूरचे गौरव असलेला प्रसिद्ध पौराणिक पशूचा मरलायन पुतळा सुमारे नऊ मीटर उंचीचा असून त्यास सिंहाचे डोके आणि माशाचे शरीर आहे. सिंगापूरचे जणू ट्रेडमार्कच समजला जाणारा मरलायन, एका मासेमारीचे खेड्यातून शहरात उगमास दर्शवितो.  

एस्प्लानेड

बंदराच्या समोर असलेल्या एका प्रीमियर प्रायोगिक कलास्थानाच्या समोर असलेल्या एस्प्लानेड येथे दुपारच्या जेवणासाठी एक विराम घ्या. अद्भुत वास्तुशिल्प असलेल्या या संकुलात त्रिकोणी काचेचे घटक आणि सनशेड असून, या संकुलाच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी तब्बल 600 दशलक्ष सिंगापूर डॉलर्स मोजले आहेत. या एस्प्लानेड मॉलमध्ये अनेक रेस्टॉरंट्स आणि कॅफे आहेत. येथील चव जिभेवर दीर्घकाळ रेंगाळणारी असून, सोबत सभोवतालच्या वर्दळीच्या दृश्याचा आनंद देखील लुटू शकता.

गार्डन्स बाय द बे

Gardens-by-the-bay-48-hours-in-singapore

एस्प्लानेडच्या लगतच 101 हेक्टर्सचे नैसर्गिक उद्यान आहे, गार्डन्स बाय द बे. मरीना बे स्कायलाईनच्या  स्तंभित करणाऱ्या परिदृश्यासह, सात विभिन्न “बागा” आणि ऑलिव्हच्या झाडीसह हे फ्लॉवर डोमला ऐटीत दाखवते. तसेच, उष्णकटिबंधीय पर्वतीय क्षेत्रातील वन्यजीवांसह क्लाऊड फॉरेस्टच्या दृश्यात ऑर्किड आणि फर्न्स आणि सोबतच तुम्ही वृक्षाप्रमाणे संरचना असलेल्या सुपरट्री संरचनेस पाहून थक्क व्हाल आणि तिथेच असलेल्या ओसीबीसी गार्डन रॅप्सोडी, प्रकाश संयोजन आणि संगीत कार्यक्रम मंत्रमुग्ध बनवितात. गडद अशा हिरवळीत फेरफटका मारा किंवा गार्डन्स बाय द बेमधील सुंदर शामियान्यात शांत बसून सभोवतालच्या निसर्गाचा आनंद लुटा.

क्लार्क क्वे

दिवसभरात शहरातील दृश्यांचा भरपूर आनंद लुटल्यानंतर, तुम्ही क्लार्क क्वेमध्ये एखाद्या बार किंवा क्लबमध्ये स्वतःला रिलॅक्स करा. जर तुम्ही कोणत्याही पार्टीत दंग नसाल, तर एकदम पहाटेच्या वेळात गुंजणाऱ्या कोलाहलात लोकांची गडबड आणि तुमच्या सभोवती घडणाऱ्या गोष्टींना पाहण्यासाठी क्लार्क क्वेपेक्षा अधिक चांगले स्थान कोणतेही होऊ शकणार नाही.

दिवस 2

सिंगापूर बोटॅनिक गार्डन्स 

Singapore-botanic-gardens-48-hours-in-singapore

तुमच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात सिंगापूर बोटॅनिक गार्डन्सने करा, जे युनेस्को वर्ल्डद्वारा घोषित एक हेरिटेज साईट आहे. हिरवळयुक्त अशा या अभयारण्यात बोन्साय गार्डन, नॅशनल ऑर्किड गार्डन आहे, ज्यात 1,000 पेक्षा जास्त प्रजाती प्रदर्शित आहेत, सोबत महाकाय अशा अॅमेझॉन वाटर लिलीजचे पूल आहे. इथे उष्णकटिबंधीय वर्षावन आणि औषधी प्रयोगांसाठी वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींच्या 400 पेक्षा जास्त प्रकारांचे संग्रह असलेले हिलिंग गार्डनही आहे.

ऑर्चर्ड रोड

ऑर्चर्ड रोडवर असलेल्या शहराच्या शॉपिंग हबमध्ये खरेदीसह स्वतःला उल्हासित करा. रिटेल दुकानांच्या दोन किलोमीटरपेक्षा लांब अंतरासोबत, उच्चभ्रू आणि कॅज्युअल ब्रँडेड स्टोअर्सच्या या क्षेत्रात सुमारे 25 मॉल आहेत, जेथे तुमच्यासाठी कपड्यांपासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत दर्जेदार गोष्टींची संपूर्ण श्रेणी प्रस्तुत आहे. तसेच, ऑर्चर्ड रोडवर खवय्यांसाठी खाद्यपदार्थाचीही अनेक दुकाने आणि कॅफे आहेत, जेथे एक कप कॉफी घेऊन तुम्ही खरेदीच्या मस्तीसाठी तरोताजा होऊ शकता!   

लिटल इंडिया

Little-India-48-hours-in-singapore

ऑर्चर्ड रोडवर तुमचे मन भरल्यावर, दुपारच्या जेवणासाठी लिटल इंडियाच्या दिशेत वाटचाल करा. इथं आल्यावर तुम्ही परदेशात आहात हे विसरूनच जाल. जेवण करण्यासाठी आपलेसे वाटणाऱ्या या जागेत भरपूर भारतीय रेस्टॉरंटस आहेत, जिथे तुम्हाला डोशापासून तंदुरी चिकनपर्यंत भारतीय पाकशैलीची संपूर्ण श्रेणी आढळून येईल. जेवण केल्यानंतर, आणखी खरेदी करण्यास इच्छुक असाल तर स्वस्त दरात खरेदीसाठी नजीकच्या प्रसिद्ध मुस्तफा सेंटरच्या दिशेत पावले वळवू शकता, तर धार्मिक वृत्तीचे लोक लिटल इंडियामधील अनेक हिंदू मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकता.

सिंगापूर फ्लायर

सूर्यास्ताची एक गिरकी सिंगापूर फ्लायरवर घ्या, जे जगातील सर्वात उंच फेरीस व्हील आहे. 28 वातानुकुलीत कॅप्स्युल्समधून प्रसिद्ध स्थळांबरोबरच शहराचे 360 अंशातील विहंगम दृश्य दिसते. सिंगापूर फ्लायरवर कमीत कमी 30 मिनिटांच्या राईडनंतर, तुमच्याकडे शहरातील अखेरच्या रात्रीचा आनंद लुटण्यासाठी पर्याप्त वेळ राहील.

क्लब स्ट्रीट

थोडी आणखी मजा करण्यासाठी चायनाटाऊनजवळच्या क्लब स्ट्रीटकडे वळा. हे सिंगापूरचे एक लोकप्रिय नाईटलाईफचे स्थळ असून, येथील बारमध्ये डीजे सेटवर संगीताचा आणि नृत्याचा आनंदही लुटू शकता.

Book Your Flight to Singapore Now!