सिंगापूरजवळच्या भन्नाट 7 सहली

Chandana Banerjee

Last updated: Sep 24, 2019

Want To Go ? 
   

सिंगापूर येथे पाहण्यास व करण्यास खूप काही असल्याने, तुम्ही त्यांचा आनंद अगोदरच लुटला असाल, तर या सिटी ऑफ गार्डन्सच्या सभोवताली असलेल्या काही रोमांचक स्थानांवर दिवसाच्या सहलीचे आपले खास प्लॅन बनवू शकता. मौजमस्ती करण्यासाठी आम्ही नजीकच्या अशाच काही आमच्या आवडत्या ठिकाणांची यादी देत आहोत.

बातम बेट     

batam-island

इंडोनेशियाचे आठवे सर्वात मोठे शहर असलेले बातम बेट, गोल्फ खेळासाठी, जुगारासाठी आणि निरुंद दऱ्यांसाठी सुपरिचित आहे. सिंगापूरहून फेरीबोटद्वारा केवळ एका तासाच्या अंतरावर असलेले बातम बेट काही वेळ कॅसिनोमध्ये मस्ती करण्यासाठी किंवा सीफूडचा आस्वाद घेण्यासाठी एकदम चपखल ठरेल. या सीफूडमध्ये गाँग-गाँग समुद्री गोगलगायसह बनविलेले पदार्थ आणि नजीकच्या पाण्यातील खेकडे तुमच्यातील खवय्यास तृप्त करतील. या सर्वांनंतरही तुमच्यात ऊर्जा वाचली असेल, तर जवळच वॉटरफ्रंट सिटी आहे, जिथे रोमांचक वॉटर स्पोर्ट्स आणि गो-कार्ट रेसिंगची सोय आहे. सुंदर स्थळांसाठी तुम्ही बातम सेंटरवर असलेले मेस्जीद रया ग्रँड मस्जिद यासह महा विहारा दूता मैत्रेया या बौद्ध मंदिर अशा ठिकाणी भेट देऊ शकता.

सिंगापूरहून अंतर: 156 किमी​

मेलाका

melaka

याला मलाक्का असेही म्हटले जाते आणि हे ठिकाण एके वेळी दक्षिण आशियातील एक महत्त्वाचे व्यापारी बंदर होते. सिंगापूरहून बसने केवळ साडेतीन तासांच्या अंतरावर असलेल्या या ठिकाणी वसाहतकालीन वास्तुशिल्पे आणि 8 हीरेन स्ट्रीटवरील 18 व्या शतकातील डच घरे निश्चितच तुम्हाला अचंभित करतील. पाहण्यासाठी बाबा अँड न्योन्या हेरिटेज म्युझियम हे आणखी एक स्थान आहे आणि त्यानंतर, तुमची थकलेली पावले तुम्ही पिंग-पाँग बॉल्सच्या आकाराच्या चिकन राईस बॉल्स या लोकप्रिय डिशच्या आस्वादासाठी एखाद्या स्थानिक रेस्टॉरंटकडे वळवू शकता.   

सिंगापूरहून अंतर: 239 किमी

पुलाऊ उबिन 

palau-ubin

वेळेत परतण्यासाठी एखाद्या बम्बोटद्वारा सिंगापूरहून केवळ 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या उर्वरित काही खेड्यांपैकी एक किंवा केमपाँगला, म्हणजेच पुलाऊ उबिनला तुम्ही भेट देऊ शकता. येथील जीवन 1960 च्या दशकात असलेल्या सिंगापूरच्या जीवनाप्रमाणेच आहे, जिथे नगरपालिकेचे पाणी येत नाही किंवा वीज नाही. येथील खेडी आजही विहिरीतून पाणी काढतात आणि लागणारी वीज जनरेटरपासून मिळवितात. खाद्यपदार्थांसाठी किराणा दुकानांची वारी करण्याऐवजी शेती व मासेमारीचा मार्ग अवलंबतात. या ठिकाणाचे वेगळेपण अनुभवायचे असेल तर या गावांमध्ये एक फेरफटका मारा किंवा चेक जावा या दलदलीच्या प्रदेशातील समुद्री जीवन पाहा किंवा या बेटावरील ओबडधोबड जागांमधून माउंटन बाईकची सवारी करा.

सिंगापूरहून अंतर: 68 किमी.

बिंतन बेट

bintan-island

ऐतिहासिकदृष्ट्या हे बेट, एके काळी भारतीय आणि चीनी व्यापारी जहाजांसाठी तुफान वादळांदरम्यान संरक्षणासाठी थांबण्यास एक सुरक्षित बंदर होते. मार्को पोलोने सन 1201 मध्ये भेट दिली होती आणि दक्षिण चीनी समुद्रात सर्फिंगच्या धाडसी खेळासाठी आणि पूर्वकालीन किनाऱ्यांवर मूल्यवान गोष्टी शोधण्यासाठी तुम्ही बिंतन बेटाला आता फेरीबोटीने भेट देऊ शकता. या निर्मल ठिकाणी बरेच आलिशान रिसॉर्ट्स असल्यामुळे, या सुंदर परिसरात आराम करण्यासाठी आणि पुनरुज्जीवित होण्यासाठीही हे बेट अनेकांना आकर्षित करते. या बेटावर एका तासात पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एखादी फेरीबोट बुक करणे किंवा एखादी तराफ्याची रोमांचक सवारी करणे हे आहेत.

सिंगापूरहून अंतर: 2,198 किमी.

जोहोर बारू

जर तुमच्या वेळापत्रकात खरेदी लिहिलेली असेल, तर जोहोर बारू या मलेशियाच्या सर्वात मोठ्या शहराला भेट द्यायला विसरू नका. सिटी स्क्वेअरमधील दुकाने सर्व प्रकारच्या उपभोक्ता वस्तू, सौंदर्य प्रसाधने आणि कपड्यांनी सुसज्ज असून ते सिंगापूरपेक्षा कमी किमतीत देखील मिळतील. सिंगापूरपासून तासाच्या अंतरावर असलेले जोहोर बारू तेथील चीनी आणि हिंदू मंदिरे व मस्जिदांसाठीही प्रसिद्ध आहे. अरुल्मिगु श्री राजकालीअम्मान ग्लास मंदिर आणि तसेच, जर सोबत मुले असली तर लेगोलँड मलेशिया तुमच्या सुंदर स्थळांना पाहण्याच्या यादीत शीर्षभागी असणे आवश्यक आहे.

सिंगापूरहून अंतर: 25 किमी

सेंटोसा बेट 

sentosa-island

जर तुमच्या प्रवासाच्या कार्यक्रमात आणखी मौजमजा हवी असेल, तर सिंगापूरहून सेंटोसा बेटाकडे जाण्यासाठी एका केबल कारची तिकिटे अवश्य बुक करा. तिथे असताना, 600 फूट उंच स्काय-ट्रेलची सवारी करा, जी तुम्हाला सिलोसो किल्ल्याकडे घेऊन जाईल. तिथे समुद्रकिनाऱ्यावर फिरा; एक समुद्री सस्तन प्राण्यांचा शो पाहा किंवा नजीकच्या फुलपाखरांच्या जतन केंद्रास भेट द्या. मन अजून भरले नसल्यास, रिसॉर्ट्स वर्ल्ड सेंटोसाकडे पावले वळवा. या भव्य संकुलात युनिव्हर्सल स्टुडिओचे थीम पार्क, शॉपिंग मॉल्स, एक कॅसिनो आणि एस.ई.ए. मत्स्यालय तुम्हाला निश्चितच तृप्त करतील.

सिंगापूरहून अंतर: 22 किमी

सुंगेई बुलो वेटलँड रिझर्व

जर तुम्ही वन्यजीवात वेळ घालविण्यासह निसर्गाचे निस्सिम चाहते असाल, तर सुंगेई बुलो वेटलँड रिझर्व तुमच्यासाठीच बनलेले आहे. तुमच्या फेरफटक्यात तुम्ही ऊद मांजर, साप, मॉनिटर लिझार्ड्स, ढोक आणि जर तुम्ही सप्टेंबर ते मार्च दरम्यान या ठिकाणी गेला, तर सायबेरिया आणि चीनमधून आलेले स्थलांतरित पक्षीही पाहू शकाल. क्रांजी जिल्ह्यात असताना जुराँग फ्रॉग फार्ममध्ये डोकावण्यास विसरू नका, जिथे टीयांजी नामक एक पारंपारिक चीनी पदार्थ बनविण्यासाठी मोठ्या बेडकांचे प्रजनन केले जाते. दी हे डेअरीज, सिंगापूरमध्ये असलेले एकमेव बकरी पालनाचे फार्म आणि फायरफ्लाय, सेंद्रिय खाद्यपदार्थांचा फार्म निश्चितच तुम्हाला रोचक वाटतील.

सिंगापूरहून अंतर: 20 किमी

तुमच्या खिशात असलेल्या या यादीमुळे, निश्चितच तुम्हाला सिंगापूरच्या भोवतालच्या ठिकाणांचा आनंद लुटण्यास मदत होईल.

Book Your Flight to Singapore Now!