भारतातील साहसी पर्यटन – याकरिता कुणीही कधीच वृद्ध असत नाही!

Rachita Verma

Last updated: Jul 17, 2017

Author Recommends

Do

Uttrakhand: Trek to the Valley of Flowers
J&K: Adventure enthusiasts should try the famous Chadar Trek
Sikkim: Take a cycling tour of the Indian North East

See

Jaipur: Experience the royalty at Amber Fort, Jal Mahal, Hawa Mahala and so many others
Bhutan: Explore nature, visit monasteries and take in the beauty of quaintness of Bhutan

Click

Jaipur: A selfie as you float with the clouds on a hot air balloon
Bhutan: You and the beauty of nature all around you

Want To Go ? 
   

असे म्हणतात की वृद्धत्वासोबत काही मर्यादासुद्धा येतात आणि यापैकी एक आहे भारतातील विस्मयकारक, रोमांचक साहसी क्रीडांपासून दूर राहणे. बहुधा, संबंधित व्यक्ती डोक्याला हलकासा झटका देऊन म्हणेल ‘धोका का पत्करावा जेव्हा आपण स्थळदर्शनाचा सुरक्षित पर्याय निवडू शकतो?’ माझे मत थोडेसे वेगळे आहे! जीवनाचा आनंद घ्यायचा असतो आणि प्रत्येक नवीन साहसच आपल्याला तरुण ठेवत असते. त्यामुळे वयाला अडसर का बनू द्यायचे? या आणि भारतामधील सर्व वयोगटांच्या लोकांसाठी अनुकूल असणाऱ्या खऱ्या साहसी उपक्रमांचा आनंद घ्या!

हॉट एअर बलूनिंग – उंच, उंच आणि दूर!

adventure travel in india
Soaring high above in a hot-air balloon

 

चित्ताकर्षक स्मारकांनी सुंदररित्या सजलेले जयपूर हे भारतातील फार पूर्वीपासूनचे अवश्य भेट देण्याजोगे ठिकाण राहिलेले आहे आणि हॉट-एअर बलूनिंग राईडकरिता अतिशय आकर्षक अशी पार्श्वभूमी प्रदान करीत आहे. अविस्मरणीय स्थळे म्हणजे अंबर फोर्ट, जल महल आणि इतर प्रेक्षणीय आकर्षणे जी अगदीच लहान दिसतात जेव्हा आपण आकाशात उंच उंच उडत जाता. क्वचित येणाऱ्या हवेचा व्यत्यय सोडल्यास अगदीच निरव शांततेचा अनुभव प्रदान करणारी जयपूरमधील स्काय वॉल्ट्झ हॉट-एअर बलून राईड ही रोमांचक आहे आणि त्याचवेळी आश्चर्यकारकरित्या शांतचित्तही आहे.

ट्रेकिंग – नवी उंची गाठणे

adventure travel in india
​ A mighty adventure - trekking on Indian soil

 

व्यायामाला नेहमीच तणाव नष्ट करणारा समजले गेले आहे, मात्र ट्रेकिंगद्वारे साहस आणि व्यायामाचा मेळ घालणे हा वेगळाच रोमांच आहे. या शब्दाने घाबरून जाऊ नका, सर्व वयोगटांकरिता ट्रेकिंग हा विलक्षण अनुभव आहे! निसर्गाच्या कुशीत आरामदायक आणि आनंददायक ट्रेकिंगसाठी हिमाचल प्रदेश आणि उत्तरांचलचा क्रमांक यादीमध्ये सर्वात वरचा आहे.

तथापि, सर्वात लोकप्रिय ट्रेकपैकी एक म्हणजे व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचा ट्रेक आहे, जे एक प्रसिद्ध जागतिक वारसा स्थळ आहे. या नंदनवनाला चिवट डोंगरांचा, अल्पाईन फुलांचा वेढा पडलेला आहे आणि हे स्नो लेपर्ड सारख्या दुर्मिळ प्रजातींचे घर सुद्धा आहे! दरम्यान, साहसप्रेमी जम्मू व काश्मीरला चादर ट्रेककरिता सुद्धा प्रयाण करू शकतात जो झंस्कारमधील गोठलेल्या नदीवरचा ट्रेक आहे.

जर आपल्याला थंडर ड्रॅगनची भूमी बघायची असेल तर आपण नयनमनोहर ड्रक पाथ ट्रेककरिता आपल्या बॅगा भरू शकता. भूतानचे खरे सौंदर्य बघण्याचा हा सुंदर मार्ग आहे, तसे बघता हा ट्रेक सोपा आहे! जंगल, कड्यांवरून पदभ्रमण करताना निसर्गाची विविध रूपे बघा आणि पांढऱ्या व निळ्या जगाचे कौतुक करा.

माउंटन बायकिंग – निसर्गाच्या कुशीत सायकलिंग करणे

adventure travel in india
​ Experience a new high with mountain biking

 

सुंदर हवा, निरभ्र आकाश आणि जीवनभराकरिता अविस्मरणीय अशी रपेट – याच शब्दांत माउंटन बायकर्स आपला अनुभव कथन करतात. आपल्याला तणाव-मुक्त सुट्टीचा आनंद घ्यायचा असेल किंवा आपण निसर्ग प्रेमी असाल तरीसुद्धा ईशान्य भारतामध्ये माउंटन बायकिंगद्वारे अपरिचित प्रदेश बघणे हा विलक्षण विस्मयजनक अनुभव आहे. सिक्कीम ते मेघालय सायकलिंगद्वारे सहलीचे पर्याय बरेच आहेत मात्र ते सर्वच एका गोष्टीचे आश्वासन देतात – अद्भूत निसर्गसौंदर्याच्या सान्निध्यात अविस्मरणीय अशी सहल.

या उपक्रमांविषयी लिहिताना मला भारतामध्ये साहसी प्रवास करण्याची इच्छा होत आहे! आपला काय विचार आहे? हिवाळ्याची चाहूल लागत असताना आपल्या कुटुंबाला घेऊन साहसी सहलीवर जा. माझ्यावर विश्वास ठेवा, ती सर्वांसाठीच एक परिपूर्ण अशी सहल असेल. तर आमच्यासोबत प्रवास करा आणि आजच आपली तिकीटे बुक करा!