बोचऱ्या थंडीस अनुभवा! भारतातील सर्वोत्कृष्ट हिवाळी प्रदेशांना भेट द्या

Pallavi Siddhanta

Last updated: Jun 28, 2017

Want To Go ? 
   

गरमीच्या दिवसांत घामाघूम आणि त्रासलेले व थंडीच्या दिवसांत डोंगरावरील फुलासारखे तेजस्वी आणि उत्साही- अशी जर तुमची स्थिती असेल, तर तुम्ही निश्चितच जीवनात एकदा तरी हिवाळ्याच्या गुलाबी थंडीसाठी या ठिकाणांना भेट दिलीच पाहिजे. भारतातील हिवाळ्यातील ही सर्वश्रेष्ठ ठिकाणे तुमच्या हिवाळ्याच्या भटकंतीच्या वेडेपणास पूर्ण करतील!

1. रूपकुंड स्केलेटन सरोवरास भेट  

Roopkund Skeleton Lake, places to visit in winter in india
Flickr Creative Commons/ Abhijeet Rane

अलौकिक स्पर्शासह, एका खास शुभ्र हिवाळ्याचा अनुभव कसा राहील? रूपकुंड हे हिमालय पर्वतश्रेणींच्या हिमरेषेवर विस्तीर्ण बुग्यालच्या (कुरणांच्या) मध्यभागी वसलेले एक लहान सरोवर आहे. त्याच्याभोवती असलेली त्रिशूल आणि नंदा गुंती ही शिखरे तुमच्या भेटीस आणखी प्रफुल्लित बनवतील. रूपकुंड सरोवराबाबतच्या दाव्यानुसार त्या सरोवराच्या काठांवर मनुष्याच्या कंकालाचे अवशेष आढळतात, जे या हिवाळी नंदनवनासाठी गूढ वलय निर्माण करतात. या कंकालांच्या उगमाबाबत संशोधकांची मते भिन्न आहेत. काही जणांच्या मते ही हिमपातात हरवलेल्या इराणी प्रवाशांचे कंकाल आहेत, तर काही शास्त्रज्ञ मानतात की यांच्या डीएनए खुणा महाराष्ट्राच्या चित्तपावन ब्राम्हणांचे असलेले दर्शवितात. हे गूढ अवशेष या आव्हानात्मक मोहिमेवर जाणाऱ्या भारतीय आणि विदेशी प्रवाशांवर भुरळ पाडत असतात.     

माहित असणे चांगले: प्रवासावर निघण्यापूर्वी पुरेसे गरम कपडे घेतल्याची खात्री करा. कडाक्याच्या थंडीचा सामना करण्यासाठी जरा जाडच कपडे असलेले बरे. तरीदेखील तुमचे सामान हलके असेल याची खात्री करा, कारण प्रवासात सामान जेवढे कमी, प्रवासाचा आनंद तेवढाच जास्त असतो. इतर सामानांमध्ये तुम्हाला उत्तम पाठीचा आधार असलेली एक बॅकपॅक आणि आरामदायक आणि थोडे वापरलेले असे प्रवासाचे शूज घ्या, जेणेकरून शूज चावणार नाहीत.

उंची: 5,029 मीटर (16,499 फूट)

दिवस: 6-7, सर्वस्वी तुमच्या फिटनेसवर अवलंबून असेल.

पायथ्याचे गाव: लोहाजंग

कसे पोहोचायचे: लोहाजंग > दिडिना > अली बुग्याल > बेडिनी > भगवाभाषा > रूपकुंड > पत्तर नौचानी > वान > लोहाजंग

2. भरतपूर पक्षी अभयारण्यात पक्षी निरीक्षण 

Bharatpur bird sanctuary, places to visit in winter in india

युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट असलेले केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान (पूर्वीचे नाव भरतपूर पक्षी अभयारण्य) अनेक जातीच्या पक्ष्यांचे निवासस्थान असून, येथे हिवाळ्यात अनेक स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होत असते. थंड हवेच्या प्रदेशांमधून सायबेरियन क्रेन, स्थलांतर करणारे वाटरफाऊल, आणि अनेक प्रकारचे बदक, हेरोन आणि करकोचे उबदार हवामानासाठी भरतपूर येथे येत असतात.

कसे पोहोचायचे: भरतपूर हे दिल्ली-आग्रा (यमुना एक्स्प्रेसवे) हायवेवर स्थित आहे आणि दिल्लीहून येथे येण्यासाठी ट्रेनने छोटासा प्रवास करावा लागतो.

खर्च:

प्रवेश शुल्क: भारतीय/विदेशी ₹50/400

व्हिडिओ कॅमेरा: ₹200

गाईडचा चार्ज: ₹150

भाड्यावरील गोष्टी:

सायकल/गियरची बाईक: ₹25/50

दुर्बीण: ₹100

वेळ:

एप्रिल-सप्टेंबर: स.6.00 ते सं.6.00

ऑक्टोबर-मार्च: स.6.30 ते सं.5.00 

3. खजुराहो नृत्यमहोत्सवाचा अनुभव 

Khajuraho dance festival, places to visit in winter in india
Flickr Creative Commons/ André Mellagi

 

सूक्ष्म कलाकुसरीने कोरीवकाम केलेली मंदिरे आणि प्रसिद्ध असा वार्षिक नृत्य महोत्सव यांमुळे खजुराहो एक आगळेवेगळे शहर ठरते. खजुराहोमध्ये आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवात भव्य आणि दिमाखदार स्वरूपात प्रकाशमान मंदिरांच्या पार्श्वभूमीवर भारताच्या पारंपारिक नृत्याच्या विविध शैलींना प्रस्तुत केले जाते. भरतनाट्यम, कुचीपुडी, कथकली, ओडिसी आणि मणिपुरी यांच्यासारख्या भारतातील अभिजात नृत्यशैली लोकप्रिय कलाकारांद्वारा सादर केल्या जातात आणि हे कार्यक्रम जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहेत.

सन 2017 साठी तारखा: 20 ते 26 फेब्रुवारी 2017

दिवस: या महोत्सवात 2 ते 3 दिवस घालवा आणि यात दिवसभरात खजुराहोच्या मध्ययुगीन शहरावर नजर टाका आणि सायंकाळी नृत्य महोत्सवास उपस्थित राहा.  

4. आशियातील सर्वात स्वच्छ गाव, मेघालयातील मावलीन्नाँगचा फेरफटका 

Mawlynnong, Meghalaya, places to visit in winter in india
Flickr Creative Commons/ Ashwin Kumar

मावलीन्नाँगचे छोटे रस्ते एखाद्या कलाकाराची चित्रकलाच वाटते! रद्दी वस्तू आणि कचरा गोळा करण्यासाठी प्रत्येक झोपडीच्या बाहेर बांबूच्या टोपल्या ठेवलेल्या असतात आणि स्थानिक समुदाय दीर्घकालीन जीवनासाठी प्रोत्साहन देत असते. या गावकऱ्यांनी स्काय व्यू नामक 85 मीटर उंचीचा एक मनोराही बांधला आहे, ज्याच्यावरून तुम्ही या गावाचे आणि दुसऱ्या बाजूस बांगलादेशाचे विहंगम दृश्य पाहू शकता!  

मावलीन्नाँग गाव शिलाँगपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर आहे. येथे तुम्हाला झाडाच्या मुळांनी बनविलेले अनेक लहान आणि मोठे पूल दिसतील. स्थानिक लोकांनी वटवृक्षाच्या पारंब्यांच्या वेण्या घालून बनविलेल्या संरचनेचा हा भाग आहे. सोबत, या गावाच्या भोवतालचे खळखळून वाहणारे नयनरम्य धबधबे तुम्हाला खिळवून ठेवतील.

दिवस: 1 दिवस. तुमच्या प्रवासाच्या कार्यक्रमात शिलाँग आणि चेरापुंजीचा समावेश करत या सुट्टीला खास बनवा!

5. उत्तराखंडमधील औली येथे बर्फाळ उतारावर स्कीईंगचा आनंद 

Auli, places to visit in winter in india
Flickr Creative Commons/ Anuj Kumar Garg

 

स्कीईंगच्या चाहत्यांसाठी हिमालय पर्वतरांगा एक रोमांचक पर्याय ठरतात. अनेक अनुभवी स्की ऑपरेटरसाठी उगमस्थान ठरणारे औरी हे शहर शिकाऊ तसेच लांब अंतरापर्यंत स्कीईंग करणाऱ्यांसाठीही एक उत्कृष्ट स्थान आहे. उतारांच्या संदर्भात गढवाल हिमालयाची तुलना आल्प्स पर्वतांबरोबर केली जाते, आणि यातील घसरण स्कियरना एक थरारक आणि अविस्मरणीय अनुभव देऊन जातो. 

दर: अंदाजे रु. 3500 प्रति व्यक्ती.

दिवस: 2-3 दिवस

सर्वोत्कृष्ट कालावधी: जर स्कीईंग करायचा विचार असेल तर औलीला भेट देण्याची योग्य वेळ जानेवारी असेल.

6. वैविध्यतेने नटलेल्या पौष मेळ्यासाठी शांतिनिकेतनला भेट 

Shantiniketan Poush Mela, places to visit in winter in india
Flickr Creative Commons/ Soumya P

टागोर कुटुंबियांनी सुरू केलेल्या शांतिनिकेतन पौष मेळ्याच्या परंपरेस स्थानिक समुदायाची साथ मिळाल्याने त्यात उन्नती झाली आणि आता या मेळ्यात जगभरातील हजारो लोक उपस्थित राहतात. हा उत्सव पौषच्या बंगाली महिन्यात देवेंद्रनाथ टागोर आणि त्यांच्या कुटुंबियांद्वारा ब्राम्हो समाजाच्या स्वीकृतीस उद्देशून साजरा केला जातो. या मेळ्यात तुम्ही विविध खाद्यान्नांचे स्टॉल पाहू शकता, विशाल फेरीस व्हीलचा रोमांच लुटू शकता व मजेदार खेळांबरोबरच स्थानिक संगीतकारांच्या संगीतामध्ये हरवून जाऊ शकता. येथील स्थानिक जमातीची नृत्ये आणि नयनरम्य आतषबाजी या मेळ्यातील मनोरंजनात भर घालतात आणि या पौष मेळ्याला भेट देण्यासाठी एक अवर्णनीय स्थान बनवितात!

तारीख: 23 ते 26 डिसेंबर 2016

7. हिमाचलच्या बीर-बिलिंगमध्ये पॅराग्लायडिंगची सैर

Paragliding at Bir Billing, places to visit in winter in india
Flickr Creative Commons/ Fredi Bach

बीर आणि बिलिंग ही हिमालयाच्या पर्वत श्रेणीतील कांगरा प्रदेशातील समोरासमोर असलेली दोन लहान शहरे आहेत. हिवाळ्यातील कांगरा खोऱ्यातील निखळ सौंदर्य बीर-बिलिंगला पॅराग्लायडिंगसाठी चपखल स्थान बनवते. बीर-बिलिंगमधील पॅराग्लायडिंग जगातील एक सर्वोत्कृष्ट अनुभव असल्यामुळे, पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप 2015 चे आयोजन याच ठिकाणी झाले होते. बिलिंगमध्ये तुम्ही टेक-ऑफ करता तर बीरमध्ये तुम्ही उतरायचे असते. या तुमच्या प्रवासात मॅकलॉडगंजचा समावेश करा आणि अस्सल तिबेटीयन रुचकर पदार्थ आणि विहारांचा निखळ आनंद लुटा.

दिवस: 1-2 दिवस

बीर-बिलिंगमधील पॅराग्लायडिंगचा खर्च: प्रति फेरी रु. 2500.

थंड हवेच्या प्रदेशांच्या साहसी सफरीवर जाण्यासाठी तुमचे पाय बैचेन होत आहेत काय? तर मग, तुमचे हॉलिडेज आत्ताच बुक करा!