थंडी आपल्या दाराशी उभी आहे, आणि जर माझ्यासारखंच तुम्हाला पण या कडाक्याच्या थंडीच्या महिन्यांमध्ये थिजायचं नसेल, तर भारतातील अशा 9 उत्तम स्थानांबद्दल विचार करा, जे उबदार वातावरणासह तुमचे भरपूर मनोरंजन करतील.
या वाळवंटाच्या कणखर सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी राजस्थानमधील थर वाळवंटातील उंटाच्या सफारीपेक्षा उत्तम गोष्ट दुसरी होऊच शकत नाही. आपली नजर जेथवर जाईल तिथवर अनेक मैल पसरलेल्या वाळूच्या सोनेरी टेकड्या थर वाळवंटाच्या भेटीस खरचं अविस्मरणीय बनवतील. सूर्यास्ताचे अद्भुत दर्शन घ्या आणि वाळवंटी तंबूत रुचकर राजस्थानी आहारासोबत लोकनृत्य आणि संगीत कार्यक्रमाचा आनंद लुटा. मंगनियार जमातीच्या लोकांच्या संगीताचा आस्वाद घेत रात्री चांदण्यांच्या खाली झोपण्याचा आगळावेगळा अनुभव तुम्हाला उत्साहित करेल. तुमचे शरीर आणि आत्मा या दोघांसाठी एक हटके अनुभव!
सूर्य, समुद्र आणि सर्फिंग यांचा संगम असलेली भूमी म्हणजेच गोवा हे हिवाळ्यासाठी एक पर्फेक्ट डेस्टिनेशन आहे. आपल्या रमणीय समुद्रकिनाऱ्यांव्यतिरिक्त गोवा त्याच्या पोर्तुगीज बारोक शैलीचे वास्तुशिल्पाने परिपूर्ण अशा वसाहतीच्या काळातील चर्च, स्वादिष्ट असे सीफूड आणि अर्थातच धुंद अशा रात्रीच्या जीवनासाठीही अतिशय परिचित आहे. गोव्यातील समुद्रकिनारी आराम करा किंवा तुम्हाला जर साहसी कृत्यांचे वेड असेल तर जेट स्कीइंग, स्पीड बोटिंग, बनाना बोट राईड्स आणि पॅरासेलिंगसारख्या पाण्यातील खेळांचा मनःपूर्वक आनंद लुटा. जुन्या गोव्यास भेट देऊन पोर्तुगीजकालीन चर्चना भेट द्या. त्यातील सर्वात प्रसिद्ध आहे बॉम जीजसचे बॅसिलिका, ज्यात सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे चिरस्थायी अवशेष आहेत. सायंकाळ मजेत घालविण्यासाठी आपल्या सेवेत आहेत, गोव्याचे अनेक नाईट क्लब, जसे टिटोज, माम्बोस, कर्लीज किंवा सेंट अँथोनीज, जे खास करून त्याच्या कराओके नाईट्ससाठी लोकप्रिय आहे.
पूर्वी फ्रेंच वसाहत असलेले स्थान, सर्वपरिचित असलेले हे छोटेसे शहर वसाहतकालीन इमारती, समुद्रकिनारे आणि अस्सल फ्रेंच खाद्य पदार्थांसाठी सर्वांना आकर्षून घेते. जर तुम्हाला पुदुच्चेरीचा आगळावेगळा अनुभव घ्यायचा असेल, तर आम्ही तुम्हाला काही दिवस औरोविलेमध्ये घालविण्यास सांगू, कारण ही जागा त्याच्या निरव आणि शांततापूर्ण सामुदायिक जीवनासाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही कुंभारकामातील कलाकुसरीबरोबरच खास अशी पेस्ट्रीदेखील शिकू शकता! औरोविलेमध्ये स्वतःची बेकरी आहे, जेथे तुम्ही पारंपारिक फ्रेंच नाश्ता आणि ब्रायोचे, कुकीज, लेमन केक, फ्रुट टारटस आणि क्रीम पफ्ससारखे अन्य फ्रेंच स्वाद चाखला नाहीत तर ही सैर निश्चितच व्यर्थ ठरेल. सुट्यांसाठी एकदम चपखल आहे की नाही!
Book Your Flight to Pondicherry
जर तुम्ही वन्यजीव पाहण्याचे शौकीन असाल, तर तुम्ही रणथंबोर राष्ट्रीय उद्यान चुकवूच शकणार नाहीत. 1,334 चौ.किलोमीटरच्या विस्तीर्ण जागेत पसरलेले हे राजस्थानमधील वन्यजीवन, भारतीय वाघ, मार्श मगरी, बिबटे आणि चिंकारा, आणि सुतारपक्षी व खंड्या पक्षी समवेत 300 पेक्षा जास्त पक्ष्यांचे घर आहे. वाघोबाचे दर्शन होण्यासाठी तुम्हाला दोन ते तीन वेळा सफारी करावीच लागेल, असे आम्हाला वाटते. वन्यजीवाव्यतिरिक्त, येथील दहाव्या शतकातील रणथंबोर किल्ला, प्राचीन मस्जिद, मंदिर आणि चत्तरीस (दफन केलेल्या कबरी) देखील पर्यटकांची आकर्षणाची ठिकाणे आहेत.
अगदी शांत असलेले नदीच्या काठावर साचलेले पाणी, सर्वत्र डुलणारी हिरवी माडाची झाडे आणि नजर जाईल तिथे हिरवेगार परिदृश्य यामुळे क्षणातच तुम्ही अलेप्पीच्या प्रेमात पडाल. अविचलीत जलमार्गांचा केटटूवेलमसाठी (हाउसबोट) सुरेखपणे वापर करण्यात आला आहे. बहुतेक हाउसबोट फर्निश असतात, ज्यात एक शयनकक्ष, सनडेक, स्नानगृह, स्वयंपाकघर आणि एसीचाही समावेश असतो. या हाउसबोटमध्ये एक कॅप्टन, लाईफगार्ड आणि स्वयंपाकी तुमच्या सेवेसाठी तत्पर असतात. ज्यावेळेस तुमचे वास्तव्य हाउसबोटमध्ये असेल तेव्हा खिचडीसह अप्पम, माशाचे सार आणि मलबार पराठा यासारख्या पारंपारिक केरळी खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला विसरू नका. या शांत असलेल्या पाण्यावर प्रवास करताना वाचन करत दिवस आरामात घालवा किंवा नजीकच्या अंतरावरील भाताच्या शेतांमध्ये आणि लहान खेड्यांमध्ये तुमच्या प्रदूषण व प्रवासाने थकलेल्या आत्म्यास निसर्गाचा आनंद देत पुनरुज्जीवित करा.
गोठविणाऱ्या वाऱ्यांपासून दूर असे महाबलीपुरमचे प्रकाशमान मंदिर असलेले हे शहर, युनेस्कोद्वारा सांस्कृतिक वारसा घोषित स्थान असून, ऐतिहासिक मंदिरांसाठी अतिशय लोकप्रिय आहे. यातील सर्वात लोकप्रिय आकर्षण म्हणजे अर्जुनाची तपश्चर्या असून, ही मूर्ती दोन समोरासमोरील विशाल शिलेवर कोरलेली आहे. या स्मारकामध्ये एका पायावर उभा राहून उपवास करत असलेल्या अर्जुनसारखी हिंदू पुराणातील दृश्यांना कोरलेले आहे. अन्य उल्लेखनीय आकर्षणांमध्ये पंचरथ (सातव्या शतकातील एक हिंदू मंदिर) आणि किनाऱ्यावरील मंदिर, जे एका खडकावर उभारलेले आठव्या शतकातील मंदिर आहे आणि तिथून समुद्राचा देखावा अप्रतिम वाटतो.
तुम्हाला रस असेल, तर तुम्ही देखील स्थानिक कारागीरांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकाम आणि कोरीवकामात आपली कला दाखवू शकता. इथं असताना सोपस्टोन्स आणि ग्रॅनाईट मूर्त्या खरेदी करायला विसरू नका. एखादी गोष्ट तुम्ही निवडल्यास, जगाच्या कोणत्याही भागात तुम्हाला पार्सल करून ती पाठवली जाईल, जेणेकरून तिला घेऊन फिरण्याच्या कटकटीतून तुम्हाला मुक्ती मिळेल!
भारताची एक सर्वाधिक मुर्तीनिष्ठ संरचना, कोणार्कचे सूर्यमंदिर शहराचे मुख्य आकर्षण आहे. तब्बल तेराव्या शतकात उभारलेले हे सूर्य मंदिर, सूर्य देवाचा रथ असे मानले जाते. 24 दगडी चाके (एका दिवसातील तासांच्या संख्येला दर्शविते) असलेल्या या भव्य दगडी संरचनेला सात सामर्थ्यशाली घोडे खेचताना दर्शविले आहे. हे मंदिर अशा रीतीने बनविले आहे की सूर्याची पहिली किरणे मंदिराचा आतील भाग आणि त्यातील देवतेस उजळून टाकतात. याची संरचना खरोखरच नेत्रदीपक आहे आणि यातील वास्तुशिल्प पाहण्यासाठी तुम्हाला एक पूर्ण दिवस काढावाच लागेल. तुम्हाला आवड असल्यास, पुरातत्त्व वस्तुसंग्रहालयाला देखील तुम्ही भेट देऊ शकता, ज्यात सूर्य मंदिराच्या उत्खननाच्या वेळी मिळालेल्या मूर्त्या आणि कलाकुसरीच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. याच्या सभोवती फिरल्याने तुमच्या शरीरातील थिजवणारी थंडी गायब होऊन तुम्ही ऊर्जेने भारावून जाल.
जगातील एक सर्वात मोठे मिठाचे वाळवंट असलेले कच्छचे रण एक नैसर्गिक चमत्कार आहे. कोरड्या हंगामात, हे मिठाचे पठार एक बेट असते, तर पावसाळ्यात यात पाणी भरते आणि याचे एका क्षारयुक्त पाण्याच्या दलदलीत रुपांतर होते. या रणचे सर्वात मोठे आकर्षण रण उत्सव असून, या काळात गुजरातचा हा भाग पारंपारिक गुजराती लोकसंगीत, नृत्य कार्यक्रम आणि राहण्यासाठी आलिशान छावण्यांनी जीवित होऊन उठतो. हे मिठाचे वाळवंट छायाचित्रणाच्या दृष्टीकोनातून देखील एक अद्भुत संधी प्रदान करते.
Book Your Flight to Rann of Kutch
मुंबईपासून दोन तासांचा प्रवास असलेले माथेरान, उबदार विकेन्ड घालविण्यासाठी एक अचूक निवड ठरू शकते. हे पर्वतीय स्थान वाहनांना अनुमती नसलेले भारतातील एकमेव क्षेत्र आहे, हे तुम्हाला माहित आहे काय? यामुळे येथील हवा स्वच्छ आणि ताजी राहण्याची सुनिश्चिती होते. सह्याद्री पर्वतांवर वसलेले माथेरान हिरव्यागार वनश्रीचे आश्रयस्थान असून याला चालत स्तंभित करणाऱ्या निसर्गदृश्यांचा आस्वाद घेण्याची गरज असेल. जरी हे एक हिल स्टेशन असले, तरी देखील हिवाळ्यात येथील हवामान उबदार आणि सुखद असते आणि अस्वस्थ करणारी थंडी नसते. या शहरात कोणत्याही वाहनांना अनुमती नसल्यामुळे, तुम्ही केवळ दस्तुरी कार पार्कपर्यंत वाहन घेऊन जाऊ शकता आणि त्यानंतर 40 मिनिटे चालल्यानंतर थक्क करणारे छोटेसे पर्वतीय शहर दिसून येते. जर तुमच्यासाठी चालणे शक्य नसेल, तर तुम्ही घोड्याची सावरी करू शकता किंवा नेरळ जंक्शन पासून माथेरानपर्यंत टॉय ट्रेनने प्रवास निवडू शकता.
तर मग, हिवाळ्यातील बोचरेपणा घालवण्यासाठी यापैकी कोणते ठिकाण तुम्ही निवडताय?
Maryann Taylor Follow
Maryann Taylor, among other things is primarily a teller of anecdotes, devourer of books, compulsive writer, dog lover, cat slave, daydreamer and traveller, who still takes delight in reading Enid Blyton and riding bicycles.
9 Incredible Places in Rajasthan to Enjoy Nature, Wildlife & Desert Landscape
Namrata Dhingra | Feb 3, 2023
9 Majestic Forts & Palaces in Rajasthan That You Absolutely Cannot Miss!
Namrata Dhingra | Feb 3, 2023
I Felt Vibrant and Royal in Rajasthan!
Monika Shruti Gupta | Jun 5, 2020
We Did It! My Husband Drove Me and the Kids from Mumbai to HP!
Ritwika Mutsuddi | May 8, 2020
Script Your next Weekend Story at Mandawa – The Open Air Art Gallery!
Surangama Banerjee | Apr 11, 2022
Bollywood Shot Its Period Movies in These Mesmerising Locations
Ashish Kumar Singh | May 7, 2019
Rajasthan Best Hotels Map: Udaipur, Jaipur, Jaisalmer
Meena Nair | Aug 21, 2020
Ever Had a Luxurious Meal by an Ancient Stepwell in Rajasthan?
Arushi Chaudhary | Jan 2, 2018
Winter Wonders: These 5 Hotels are Best Enjoyed When it’s Freezing Outside
Arushi Chaudhary | Dec 20, 2019
Best Resorts for Celebrating a White Christmas
Protima Tiwary | Dec 16, 2019
Best 2016 Year-End Holiday Deals Across the World!
Mayank Kumar | Apr 5, 2017
Planning a Christmas Holiday? Here's Where You Should Go!
Namrata Dhingra | Nov 5, 2019
6 Epic Outdoor Restaurants in Delhi to Visit This Winter
Mikhil Rialch | Sep 24, 2018
Head Over for The Perfect Northern Lights Experience!
Nidhi Dhingra | Sep 24, 2019
Holidays under 10k This January for an Exciting Start to the Year
Namrata Dhingra | Apr 11, 2022
Top 5 Places to See Snowfall in India
Gurmeet Kaur | Feb 2, 2023