हिवाळ्यातून उन्हाळ्यामधील रुपांतर सामान्यपणे निराशा घेऊन येत असते, विशेषत: भारतामध्ये, जेथे वाढणाऱ्या तापमानामुळे आपल्या सर्वांमधील उत्साह कमी होत जातो. खुशखबर ही आहे की, एप्रिल महिन्यामध्ये काही अतिशय मनोरंजक उत्सव आणि समारंभांची रेलचेल दिसून येते. आपल्या दैनंदिन कामातून मोठ्ठी सुट्टी घेण्यासाठी त्यांचा बहाणा बनवा, थेट सहलीवर निघून जा आणि नंतर आम्हाला धन्यवाद देण्यास मात्र विसरू नका. आम्ही येथे आमच्या 7 आवडत्या ठिकाणांची यादी खास आपल्यासाठी सादर केली आहे.
गोवा या एकाच शब्दामध्ये खाद्य आणि समारंभ सामावलेले आहे – मग याविषयी प्रेम वाटणार नाही का? समुद्रकिनारी पाच दिवस मौजमजा करायची आणि गोव्याच्या विविधांगी परंतु सुस्त संस्कृतीमध्ये चिंब भिजून घेत इथल्या स्थानिक पाककृतींची लज्जत चाखायची. स्वत:ला रोजच्या धकाधकीपासून विश्रांती देण्यास आपण आणखी काय करू शकता. घरी शिजवलेल्या विंडालू आणि एसरबिक फेनीचा आनंद घ्या, सांस्कृतिक प्रदर्शने पाहा आणि समुद्रकिनाऱ्यावर भव्य आतषबाजीचे प्रदर्शन बघत सुट्टी झोकदार शैलीत संपवा.
केव्हा: तारखा घोषित व्हायच्या आहेत
कुठे: NIWS मैदान, कॅरनझालेम, पणजी
प्रवेश शुल्क: मोफत
हिवाळा काश्मिरच्या अनुपम सौंदर्याला आणखी झळाळी आणतो. हीच वेळ आहे जेव्हा खोऱ्यातील कुरणांमध्ये ट्युलिप उमलायला लागतात आणि प्रसिद्ध कूकेनहॉफ गार्डनशी स्पर्धा करायला लागतात. श्रीनगरकडे प्रयाण करा जे आशियातील ट्युलिपचे सर्वात मोठे गार्डन आहे. पूर्ण बहरलेल्या एक दशलक्ष पेक्षाही जास्त ट्युलिप्सना पाहणे हे इतके नयनमनोहर दृश्य असते जे अगदी पाषाणहृदयी लोकांना सुद्धा विस्मयचकित करून सोडते. यामध्ये काश्मिरी लोकसंगीत आणि नृत्य, स्थानिक हस्तकलेच्या वस्तू आणि अर्थातच पारंपारिक काश्मिरी पाककलेची भर पडल्याने आपल्याला एका परिपूर्ण अशा उन्हाळी सुट्टीचा आनंद मिळतो.
केव्हा: एप्रिलचे पहिले दोन आठवडे
कुठे: इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन, श्रीनगर, काश्मीर
प्रवेश शुल्क: प्रौढांकरिता रु. 50, मुलांकरिता रु. 20
या बहारदार कापणी उत्सवावर कितीतरी बॉलीवूड गाणी लिहण्यात आली आहेत. बैसाखीचे फक्त नावच उच्चारल्यावर गव्हाच्या शेतामध्ये फेटा बांधलेले व परंपरागत पंजाबी पोशाखातले गबरू जवान व सुंदर पंजाबी स्त्रिया भांगडा करीत असतानाचे दृश्य नजरेसमोर येते. तथापि, बैसाखीचा उत्सव पिकांच्या समृद्धीशिवाय इतरही कारणांकरिता साजरा केला जातो. पंजाबी नव वर्षानिमित्त आणि खालसा बंधुतेचे स्मरण करण्याकरिता या काळात संपूर्ण पंजाब लोकसंगीत, यात्रा, मेजवान्या आणि भांगडा नृत्याच्या जल्लोषात न्हाऊन निघतो. या सर्व जल्लोषामध्ये अमृतसरमधील सुवर्ण मंदिरास भेट देण्यास विसरू नका, जे या काळात सर्वात दैदिप्यमान असते.
केव्हा: 14 एप्रिल 2017
कुठे: संपूर्ण पंजाब, विशेषत: अमृतसर. नवी दिल्लीमधील बैसाखी मेळा 7 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान दिल्ली हाट, पितमपुरा येथे आयोजित केला जातो.
कदाचित अमेरिकेमधील सर्वात प्रसिद्ध संगीत महोत्सवांपैकी एक असलेला कोचेल्ला संगीत आणि पॉप संस्कृतीच्या प्रेमींकरिता तीर्थयात्रेसारखाच आहे. 2017मध्ये रेडिओहेड, केंड्रीक लामर, लेडी गागा, बॉन आयव्हर, लॉर्ड, ट्रॅव्हीस स्कॉट आणि इतर डझनावारी कलाकारांच्या प्रदर्शनाकरिता सज्ज असलेला कोचेल्ला हा संगीतकल्लोळ सर्वात वेड्या पार्टी प्रेमींच्या सैर अपेक्षांच्या पलीकडे मजल मारण्याची ग्वाही देतो. कला प्रदर्शने, खेळ, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स यांची संख्या बघता आणि संगीताचा जल्लोष सुरू असताना आपल्या मित्रांसमवेत चंद्राच्या प्रकाशात कॅम्पिंगची मजा अनुभवण्याकरिता या उन्हाळ्यात आपण कॅलिफोर्नियाची फ्लाईट बुक कराल यात शंकाच नाही.
केव्हा: एप्रिल 14 ते एप्रिल 16 पर्यंत; एप्रिल 21 ते एप्रिल 23 पर्यंत (2017)
कुठे: एम्पायर पोलो क्लब, इंडिओ, कॅलिफोर्निया
प्रवेश शुल्क: रु. 26,125 प्रति व्यक्ती
जर आपल्याला आश्चर्य वाटत असेल की लोकांना चीजचे किती आकर्षण असू शकते तर मी आपल्याला सांगू इच्छितो की त्यांना एवढे आकर्षण आहे की त्यांनी एक राष्ट्रीय उत्सवच चीजसाठी समर्पित केलेला आहे. आणि का करू नये? शेवटी ते चीज आहे.
प्रत्येक वर्षी ट्रूजिल्लोमध्ये भरवण्यात येणारा हा उत्सव आता जगातील सर्वात मोठा चीज महोत्सव बनलेला आहे. चीजचे हजारो प्रकार चाखून बघा आणि आपल्या वाईन व कूकिंगसोबत कुठला प्रकार योग्य असेल हे शोधा. स्थानिक आणि राष्ट्रीय चीज उत्पादकांपासून ते निवडक प्रादेशिक ब्रँडपर्यंत आपल्याला असे प्रकार आढळतील जे कुठल्याही मार्केटमध्ये दिसणार नाहीत. येथील चीजचे निखालस प्रदर्शन खरोखरंच अद्भूत असे आहे. सोबतच जर आपल्याला मद्यपानाचा आनंदही घ्यायचा असेल तर वाईन आणि बिअरचे स्टॉलही त्याच परिसरामध्ये लावलेले असतात. आपले स्वागत आहे!
केव्हा: 28 एप्रिल ते 1 मे 2017 पर्यंत
कुठे: प्लाझा मेयर, ट्रुजिल्लो, स्पेन
सेमाना सांता (पवित्र सप्ताह) दरम्यान, दक्षिणी भाग धार्मिक मिरवणुकी, कॅथलिक उत्सव आणि बेधुंद बँडच्या धार्मिक पर्वामध्ये रुपांतरित होतो ज्यामध्ये जीसस व मेरीच्या मोठाल्या पुतळ्यांची मिरवणूक काढली जाते. 60 ब्रदरहूड आणि कितीतरी विस्मयकारक चर्चेस (ला कॅथेड्रलसहित) असलेले सेव्हिल हे या जल्लोषात सहभागी होण्याकरिता सर्वोत्तम ठिकाण आहे. हे पर्यटकांचे अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे, त्यामुळे अतिउत्साही गर्दी आणि हॉटेलच्या चढलेल्या दरांकरिता तयार राहा, मात्र आपली गुंतवणूक पूरेपूर वसूल होईल यात किंचितही शंका नाही.
केव्हा: 9 एप्रिल ते 15 एप्रिल 2017 पर्यंत
कुठे: अन्दालुसिया, स्पेन
समुद्रसपाटीपासून 8,497 फूट उंचीवरील पर्वतावर आयोजित केला जाणारा स्नोबॉम्बिंग हा प्रसिद्ध स्किइंग उत्सव आहे जो ऑस्ट्रियन अल्पाईन प्रदेशाच्या उतारांचा पूरेपूर फायदा प्रदान करतो. लक्झरी स्पा, इग्लू रेव्ह समारंभ, आनंददायक फॉरेस्ट पार्टी आणि जगातील सर्वात प्रसिद्ध डीजेंसहित इतर बऱ्याच कलाकारांच्या संगीतमय प्रदर्शनांनी सजलेला हा स्नोबॉम्बिंग उत्सव आपल्या हृदयाला नवचैतन्य प्रदान करेल.
केव्हा: 3 एप्रिल ते 8 एप्रिल 2017 पर्यंत
कुठे: मेर्होफेन, ऑस्ट्रिया
Snowy Hills, River Streams & A Beastly Myth: Add Sironah To Your Adventure Bucket List!
MakeMyTrip Blog | Nov 22, 2021
Travel Implants Vs Robust Online Travel Platform: The Rise of Online Adaptation
MakeMyTrip Blog | Sep 16, 2021
Need of the Hour: An Agile Platform Supporting Dynamic Travel Requirements
MakeMyTrip Blog | Sep 9, 2021
Global Travel Mandates: Boon or Hindrance?
MakeMyTrip Blog | Sep 9, 2021
Implementing ERP and HRMS for Business Travel
MakeMyTrip Blog | Sep 9, 2021
Technology Is the Future Of Business Travel in India: Are You Still on an Offline Model?
MakeMyTrip Blog | Aug 24, 2021
Credits in Travel: Why Businesses Should Care?
MakeMyTrip Blog | Nov 22, 2021
Automated Billing in Travel - Why Businesses Should Care?
MakeMyTrip Blog | Aug 24, 2021
10+ Gift Ideas for Raksha Bandhan 2024 to Celebrate the Bond of Siblings!
Pallak Bhatnagar | Jun 25, 2024
12 Best Father’s Day Gift Ideas to Surprise Him!
Sanskriti Mathur | May 28, 2024
Top 11 Places to Celebrate Holi in India 2023
Pallak Bhatnagar | Mar 3, 2023
5 Reasons to Surprise Your Valentine With a Travel Gift Card
Bhavya Bhatia | Jan 18, 2023
Here’s Why Your Dubai Trip Is Incomplete Without a Visit to Expo 2020 Dubai!
Bhavya Bhatia | Feb 3, 2023
10 Country Pavilions That You Shouldn’t Miss at Expo 2020 Dubai!
Bhavya Bhatia | Feb 3, 2023
Krishna Temples in India to Visit for Holi
Neha Sharma | Mar 6, 2020
Unique Places to Celebrate Holi in India
Neha Sharma | Mar 9, 2020