भारतातील समुद्रकिनाऱ्यांचा विचार करताक्षणीच नजरेसमोर येतात ती गोवा आणि केरळ ही ठिकाणे. मात्र आपल्यापैकी बरेचजण पूर्वेकडील घाटांवरच्या ज्या सोनेरी वाळू व चंदेरी फेसाळ लाटांनी चमचमणाऱ्या समुद्रकिनाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात ते समुद्रकिनारे पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आहेत. तुलनात्मक दृष्टीने पाहता ते अपरिचित आहे आणि पर्यटकांमध्ये निश्चितच खूप काही लोकप्रिय नाहीत. अशा पूर्वेकडील घाटांवरच्या सहा अपरिचित समुद्रकिनाऱ्यांविषयी जाणून घेण्यासाठी हा लेख पुढे वाचा.
बंगालच्या उपसागराला स्पर्श करणाऱ्या समुद्रकिनाऱ्यावरील एक शांत शहर दिघा हे पश्चिम बंगालमध्ये विकेंडसाठी लोकप्रिय ठिकाण आहे. उथळ पाण्याच्या “नवीन” दिघा बीचने आपल्या जुन्या सहकाऱ्यावर मात केली आहे. स्वच्छ आणि कमी गर्दीच्या या समुद्रकिनाऱ्यावरची वाळू स्वच्छ आहे आणि पाणी उथळ आहे ज्यामुळे दिवसभर पोहण्याची मजा लुटण्यासाठी हे आदर्श असे ठिकाण आहे. दिघा बीचचा खजुराच्या झाडांनी झाकलेला तट जवळपास सात किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे.
जवळचे विमानतळ: कोलकाता
अगदीच अस्पर्श वाळू आणि क्षितिजावर पसरलेली निळी आभा यासारखे चित्रमय दृश्य असणारे हे गोपालपुर ऑन सी आतापर्यंत अपरिचित आहे हेच एक आश्चर्य आहे. एकेकाळचे व्यापारी बंदर म्हणजे गोपालपुर ऑन सी हे उष्णदेशीय नंदनवन आहे जेथे बंगालच्या उपसागराने मुलायम सोनेरी वाळूचा गालिचा अंथरलेला आहे. समुद्राचे पाणी स्कूबा डायव्हिंगसाठी लोकप्रिय आहे आणि विंडसर्फिंग, पॅडल बोटिंग आणि रोविंग यासारख्या जलक्रीडांसाठी प्रसिद्ध आहे. समुद्रकिनाऱ्यावरच्या या शांतचित्त गावामध्ये पहाटेच्या वेळी सूर्योदयाचे दृश्य आणि मच्छिमार आपल्या बोटी घेऊन जाण्याचे दृश्य खूपच प्रेक्षणीय असते.
जवळचे विमानतळ: कोलकाता
मंदिरांचे शहर महाबलीपुरम समुद्रकिनाऱ्यावरील इतर साधारण शहरांसारखे नाही. बंगालच्या उपसागराच्या बाजूला असलेल्या या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये 8व्या शतकातील समुद्रकिनाऱ्यावरील प्रसिद्ध मंदिरे आहेत. महाबलीपुरमला देखण्या समुद्रकिनाऱ्याचे वरदान मिळाले आहे ज्यावर बऱ्याच हॉटेलसमूहांनी आपले समुद्रकिनाऱ्यावरचे लक्झरी रिसॉर्ट बांधले आहे. सूर्यप्रकाशात न्हाऊन निघालेला महाबलीपुरमचा समुद्रकिनारा बीच बूमिंगसोबतच जेट स्कीईंग व विंडसर्फिंग सारख्या जलक्रीडांसाठी प्रसिद्ध आहे.
जवळचे विमानतळ: चेन्नई
आंध्र प्रदेशातील ऋषिकोंडा एकेकाळी गवत आणि जंगली वनस्पतींनी झाकलेले होते. येथील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनाची शक्यता लक्षात घेता अधिकाऱ्यांनी संपूर्ण क्षेत्र स्वच्छ करण्याचे कार्य आरंभले आणि पूर्वेकडील घाटांवरील प्रस्तावित बीच कॉरिडोर प्रोग्राममध्ये याचा समावेश केला. पाम आणि आंब्याचे उपवन ते पार्श्वभूमीवरील डोंगर व सोनेरी वाळूने सजलेल्या या जागेवरील बंगालच्या उपसागराचे उबदार पाणी आपल्याला आकर्षित करते. तसेच ऋषिकोंडा या ठिकाणी साहसप्रेमी पॅरासेल आणि सर्फिंग करण्यासाठी येतात.
जवळचे विमानतळ: विशाखापट्टणम
चांदीपूर हे एकांतप्रिय शहर बंगालच्या उपसागराच्या पाण्यावर आश्रित आहे जे ओहोटीच्या वेळी काही किलोमीटर मागे सरते, ज्यामुळे प्रत्येक दिवशी हा भव्य नयनरम्य सोहळा पहायला मिळतो. येथील समुद्रकिनारा अस्पर्श आहे आणि गर्द उपवनांमुळे हे विलक्षण ठिकाण विश्रांती करण्यास व ताजेतवाने होण्यास आदर्श असे स्थान आहे. या मच्छिमार गावातील मच्छिमार आपले जाळे घेऊन दिवसभराचे ताजे मासे पकडण्यास जातानाचे दृश्य खूपच विलोभनीय असते. तसेच चांदीपूर हे जैव-वैविध्य क्षेत्र आहे आणि हॉर्सशू खेकड्यांचे हे निवासस्थान आहे, जे येथील वाळूवर सरपटताना दिसून येतात.
जवळचे विमानतळ: कोलकाता
बॅकग्राउंडला डोलणाऱ्या काजूच्या झाडांनी बहरलेल्या या निवांत मासेमारी गावावर अजूनही व्यापारीकरणाच्या पाऊलखूणा उमटलेल्या नाहीत. येथील अगदीच अस्पर्श असलेली सोनेरी वाळू गर्दी आणि कोलाहलापासून मुक्त आहे. समुद्रकिनारा प्रसन्न आणि निर्जन असला तरी येथील वाळू अगदीच मऊशार नाही, बंगालच्या उपसागरच्या लाटा येथे सौम्य आणि शांत आहेत ज्या किनाऱ्याला प्रेमाने कुरवाळतात. तलसारीमध्ये बॅकवॉटरसुद्धा आहे जे याला खरचं विलक्षण व वेगळे ठिकाण बनवते.
जवळचे विमानतळ: कोलकाता
त्यामुळे नेहमीच्या गजबजलेल्या समुद्रकिनाऱ्यांपासून दूर जा आणि भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील या अस्पर्श व मूळ स्वरूपातल्या किनाऱ्यांना भेट द्या. तर मग आपण सर्वप्रथम कुठे जाणार आहात?
Book Your Flight to Kolkata Now!
7 Exciting Weekend Getaways from Chennai for the Adventure Enthusiast
Mikhil Rialch | Sep 25, 2019
Six Undiscovered Beaches of the Eastern Ghats
Devika Khosla | Jan 2, 2020
#BloggerContest—A Short Unplanned Vacation to Mahabalipuram
Subhadip Mukherjee | Apr 3, 2017
Of Sun, Sand and Exquisite Dances: The Mamallapuram Dance Festival
Devika Khosla | Apr 3, 2017
6 Rich Experiences to Try on Saudi's Coasts
MakeMyTrip Blog | Dec 3, 2021
After Months of Probing, We Finally Decided to Take the Risk!
Harsh Manalel | Dec 5, 2020
Off-Beat Balinese Resorts for a Safe Vacay! #FromIndonesiaWithLove
Garima Jalali | Nov 19, 2020
#WonderfulIndonesia: Explore These 5 Hidden Islands!
Shubhra Kochar | Nov 19, 2020
#FromIndonesiaWithLove: 5 Balinese Experiences You Can’t Miss!
Shubhra Kochar | Nov 19, 2020
After 6 Months of Boredom, Our Trip to Pondicherry Was a Lifesaver!
Rajat Katiyar | Oct 27, 2020
Top Exotic Resorts for the Perfect Thailand Experience!
Shubhra Kochar | Nov 24, 2022
Escape the Touristy Crowd at Thailand’s Most Secluded Islands!
Shubhra Kochar | Feb 2, 2023