ईशान्य भारत हनिमूनसाठी सर्वोत्तम का आहे याची 5 कारणे

Mayank Kumar

Last updated: Sep 24, 2019

Author Recommends

See

Cherapunji: Mawsmai Caves
Shillong: Japanese Gardens at Lady Hydari Park
Yumthang Valley: The Valley of Flowers located 150 km from Gangtok
Kalimpong: Darpin Dara for scenic views
Darjeeling: Sunset (with twin peaks of Kanchenjunga) from Observatory Hill

Do

Kalimpong: Picnic by Teesta river
Darjeeing: Toy Train Ride, visit to Happy Valley Tea Estate
Shillong: Boat ride on Ward Lake, picnic at Elephant Falls

Shop

Gangtok: Sikkimese carpets, thangka wall drapes
Darjeeling: The famous Darjeeling tea

Want To Go ? 
   

विवाहित जोडप्याच्या स्वरूपात पहिल्या रोमँटिक प्रवासाला निघाल्यावर गोव्याच्या गर्दीला आणि केरळच्या महागाईला वळसा घालून ईशान्य भारताच्या धुक्याने आच्छादलेल्या पर्वतांकडे प्रयाण करा. जंगलांमधील आनंददायक भटकंतीपासून जोडप्यांकरिता उच्च दर्जाच्या कपल-स्पा, ताज्या सामग्रीपासून बनलेला कँडल-लीट स्वादिष्ट डिनर आणि साहसी क्रीडांमध्ये वेळ कसा भुर्रकन निघून जाईल! अधिक काळ हनिमूनसाठी व्यतित करण्यास ईशान्य भारत परिपूर्ण ठिकाण आहे. जर वेळ कमी असेल तर आपण यापैकी एक किंवा काही ठिकाणांना भेट देऊ शकता.

north-east-india-shillong
North East India with its stunning locales and breathtaking scenery is a honeymooners delight

 

1. कालीम्पाँग, पश्चिम बंगाल

समुद्रसपाटीपासून 4,000 फूट उंचीवर असलेले आणि उंचच उंच पर्वतांनी वेढलेले ईशान्य भारतातील कालीम्पाँग हे रोमान्स फूलण्याकरिता आवश्यक असणाऱ्या परिपूर्ण पार्श्वभूमीने सजलेले आहे. हे शांत, आरामदायक ठिकाण आपल्या फूलांकरिता प्रसिद्ध आहे – विशेषत: ऑर्चिड्स, अॅमारिलीज, गुलाब, डहलियास आणि ग्लॅडिओली. कालीम्पाँगच्या भव्य नर्सरींना भेट देताना या रोमँटिक बहाराचा आनंद घ्या किंवा मैदानांच्या भव्य दृश्यांकरिता डार्पिन डाराला आणि पिकनिकसाठी टीस्टा व रिआंग नद्यांना भेट द्या. नंतर, बेकरीचा मनमुराद उपभोग घ्या आणि या भागातील तीन महत्त्वाच्या गोम्पाजच्या (मठांच्या) शांतचित्त परिसरामध्ये काही काळ निशब्दपणे घालवा.

north-east-india-kalimpong-flickr
Soak in the serene ambience of the Buddhist monasteries or Gompas in Kalimpong

 

2. दार्जिलिंग, पश्चिम बंगाल

ऐतिहासिक टॉय ट्रेनद्वारे किंवा रस्त्याने बागडोगरा विमानतळ किंवा नवीन जलपायगुडी स्टेशनपासूनचा प्रवास आपल्याला हिरव्या रंगाच्या असंख्य चहाच्या बागांमधून हळुवारपणे कार्शिआंग आणि घूममधून उभ्या चढावावर घेऊन जातो व शेवटी थेट “थंडर ड्रॅगनच्या घरामध्ये” उतरवतो. दार्जिलिंग हे ब्रिटिश राजवटीमधील पहिल्या हील स्टेशन्सपैकी एक आहे आणि येथे अजूनही बघण्यासारखी बरीच अद्भूत आकर्षणे आहेत – ज्यामध्ये वन्यजीवांकरिता असलेले नॅचरल हिस्ट्री म्युझियम आणि एव्हरेस्ट म्युझियम (तेनसिंगसाठी प्रसिद्ध असलेले) यांचा समावेश होतो. येथे आपली सहल चहाच्या बागांना भेट दिल्याशिवाय संपणार नाही, त्यासाठी हॅपी व्हॅली सर्वात जवळ आहे. टेहळणीच्या डोंगरावरून दिसणाऱ्या जादूई सूर्यास्ताने मंत्रमुग्ध व्हा (कांचनजुंगाच्या दोन शिखरांचे मनोहर दृश्य), माउंट एव्हरेस्टच्या भव्यदिव्य दर्शनाकरिता टायगर हिलला भेट द्या आणि निसर्गाच्या सान्निध्यात सेंचल लेकवर आपल्या जोडीदारासोबत रोमँटिक वातावरणात काही काळ व्यतित करा.

north-east-india-shillong-darjeeling
Your trip to Darjeeling is incomplete without a visit to the beautiful tea gardens

Book Your Flight to Bagdogra Here!

3. गंगटोक, सिक्कीम 

एक तपापूर्वी काठमांडू हे एक लोकप्रिय हनिमून स्थळ होते. मात्र आता नैसर्गिक सौंदर्यांच्या पार्श्वभूमीवर गंगटोक काठमांडूच्या सर्व आकर्षणांसहित कॅसिनोची सुविधा सुद्धा प्रदान करीत आहे. इथल्या स्थळदर्शनामध्ये डीअर पार्क (सारनाथच्या धर्तीवर) मधून सुकलाखांग रॉयल चॅपेल आणि मठापर्यंतची वळणदार भटकंती सामिल आहे व सोबतच सचिवालयाची भेट आणि अगदीच अनोख्या अशा ऑर्चिड अभयारण्याला भेट देणे सामिल आहे. या अभयारण्यामध्ये ऑर्चिडच्या 600 प्रजाती सुखनैव नांदत आहे. हनिमूनवर आलेल्यांनी जुन्या किंवा नवीन बाजारामध्ये खरेदी करावी किंवा सिक्कीमचे गालिचे, थंगका वॉल ड्रेप्स, शर्ट, जोडे, फरच्या वस्तू आणि लाकडी कलाकुसरीच्या वस्तू घासाघीस करीत खरेदी करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कुटिर उद्योगाला भेट द्यावी. नयनरम्य शांगू लेकला भेट दिल्याशिवाय गंगटोक सोडू नका. शहरापासून दोन तासांच्या अंतरावर असलेला हा तलाव पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे आणि फोटोग्राफर्ससाठी तर पर्वणीच आहे! गंगटोकपासून 150 किमी अंतरावरील युमथांग व्हॅली ही “व्हॅली ऑफ फ्लॉवर्स” म्हणूनही प्रसिद्ध आहे आणि येथे रोडोडेंड्रॉन फुलांच्या 24 प्रजाती आहेत. मऊ हिरव्यागार कुरणांपासून तर विशाल धबधबे आणि ओढ्यांपर्यंत युमथांग व्हॅली ही निसर्गप्रेमींकरिता स्वर्गच आहे.

north-east-india-Gangtok.jpg
A yak ride is a must when you visit the gorgeous Tshangu Lake

 

4. शिल्लाँग, मेघालय

“ढगांचे घर” म्हणजेच मेघालय हे सर्वथा योग्य नाव असलेल्या राज्याची राजधानी शिल्लाँग हे खासी, जैनतिया व गारोस या उच्चशिक्षित आणि आधुनिक स्थानिक जनसमूहांचे शहर आहे. तसेच चविष्ट भोजन, नाईटलाइफ आणि कर्णकर्कश संगीताच्या शोधात असणाऱ्या पर्यटकांकरिता आदर्श स्थान आहे. वार्ड लेकमध्ये नौकाविहार करा, बोटॅनिकल गार्डन व म्युझियमला भेट द्या, जपानी गार्डन वलेडी हायद्री पार्कमध्ये भटकंती करा, ट्रेंडी भेटवस्तूंकरिता बारा बाजारात खरेदीचा आनंद घ्या आणि मेघालय राज्याच्या शिल्लाँग पीक या सर्वात उंच शिखरावर पिकनिक साजरी करा. असंख्य तिरंदाजी क्लबमधील आर्चरी स्टेक्स या नियमित स्पर्धेमध्ये भाग घ्या आणि बक्षिसे जिंका. जवळच्याच एलिफंट फॉल्सवर पिकनिक करा, जे चेरापुंजी आणि उमीयम लेकच्या रस्त्यावर आहे. गर्जना करणाऱ्या धबधब्यांचा आनंद घेण्याकरिता पावसाळा सर्वोत्तम ऋतू आहे.

north-east-india-shillong-umiam-lake
Umiam lake is among the most romantic spots in Shillong

Book Your Flight to Shillong Here!

5. चेरापुंजी, मेघालय

आधी पृथ्वीवरील सर्वात जास्त पावसाचे शहर म्हणून प्रसिद्ध असणारे खासी डोंगरांच्या कडेवर स्थित हे शहर हिरव्यागार वनराईमध्ये मौजमस्ती करण्याकरिता आदर्श असे ठिकाण आहे. आपला पोहण्याचा जामानिमा सोबत ठेवा आणि सेव्हन सिस्टर्स धबधब्यामध्ये स्वच्छंद जलक्रीडा करा. नजिकच्या मावसमई गुफांमध्ये अज्ञाताचा शोध घ्या व दोघांकरिता असलेल्या कोपऱ्यांमध्ये विश्रांती घ्या! स्थानिक इको-पार्कमध्ये एका दिवसाच्या सहलीवर जा किंवा जवळच्याच मौसीनरमला भेट द्या जेथे सध्या पृथ्वीवर सर्वात जास्त पाऊस पडतो. अधिकांश हॉटेल्स आरामदायक कपल्स मसाज प्रस्तुत करतात. पर्यटनाच्या थकव्यानंतर पुन्हा ताजेतवाने होण्यासाठी आपण यांचा आनंद घेऊ शकता. जेवणाच्या वेळी परंपरागत खासी मेजवानीचा आनंद घ्या आणि ताऱ्यांच्या छायेत मेणबत्तीच्या मंद प्रकाशात डिनर करताना फेसाळत्या पेयाचा आस्वाद घेण्यास विसरू नका!

north-east-india-cherrapunji.jpg
The crisp invigorating mountain air in Cherrapunji will make your experience come a full circle

आपल्या पर्यटनाच्या यादीमध्ये अरूणाचल प्रदेशचा समावेश आपण अवश्य करावा. हे भारताचे सर्वात कमी भेट दिले जाणारे राज्य आहे, जे आपल्या वन सौंदर्य आणि जगातील सर्वात मोठ्या मठांपैकी एक असलेल्या तंवाग मठासाठी प्रसिद्ध आहे. 10,000 फूट उंचीवर वसलेल्या या मठातून आजूबाजूच्या डोंगरदऱ्यांचे अद्भूत दृश्य नजरेस पडते. ईशान्यला भेट देण्यासाठी हा विशेष पॅकेज बघा आणि आजच आपल्या सहलीचे प्लॅनिंग करा.